Home राज्य Vaishnavi Hagawane : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण सुशील हगवणेला जामीन मंजूर
राज्य

Vaishnavi Hagawane : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण सुशील हगवणेला जामीन मंजूर

12
Vaishnavi Hagawane

जवळपास एक महिन्याभरापासून वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण संपूर्ण महाराष्ट्र्रात कमालीचे गाजत आहे. वैष्णवीला सासरच्यांनी दिलेल्या मानसिक आणि शारीरिक त्रासामुळे आणि सतत पैशांसाठी तिच्यावर सासरच्या लोकांकडून होणाऱ्या दबावामुळे तिने आत्महत्या केली. वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी संबंधित असल्याने या प्रकरणाला एक वेगळेच महत्व आणि वजन मिळाले. दररोज वैष्णवी हगवणे केसमध्ये नवनवीन खुलासे होताना दिसत आहे. आज या प्रकरणात एक नवीन मोठी अपडेट आली आहे. (Vaishnavi Hagawane)

वैष्णवी हगवणे आत्महत्येप्रकरणात पोलीस ताब्यात असलेल्या सुशील हगवणेला जामीन मंजूर करण्यात आला आहे. पोलिसांची दिशाभूल करून शस्त्र परवाना मिळवल्याप्रकरणी वैष्णवी हगवणेचा दीर सुशील हगवणे याला मंगळवारी न्यायालयाने जामीन मंजूर केला. शस्त्र परवाना प्रकरणात कोथरूड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या आणखी एका गुन्ह्यात वैष्णवींचा पती शशांक आणि हगवणे कुटुंबीयांचा निकटवर्तीय नीलेश चव्हाण याला वारजे पोलिसांनी मंगळवारी ताब्यात घेतले. हगवणे कुटुंबीय सध्या येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. (Marathi News)

Vaishnavi Hagawane

शस्त्र परवान्यासाठी खोटा भाडेकरार सादर करून फसवणूक केल्याच्या प्रकरणात कोथरूड पोलिसांनी सुशील राजेंद्र हगवणे याला अटक केली होती. सुशीलने स्वतः राहत नसताना देखील पौड रस्ता, कोथरूड येथे राहत असल्याचा बनावट भाडेकरार करून शस्त्र परवाना मिळवण्यासाठी अर्ज केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली होती.२९ जुलै २०२२ पासून ते आतापर्यंतच्या कालावधीत हा प्रकार घडला आहे. हगवणे याने सादर केलेला भाडेकरार बनावट असल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, त्याच्या आधारे त्याने शस्त्र परवाना मिळवण्याचा प्रयत्न केला होता. (Top Stories)

सुशील हगवणेवर भारतीय दंड संहिता कलम १७७, १९१, १९२, १९३, ४१७, ४१९ तसेच शस्त्रास्त्र प्रतिबंध कायदा कलम ३०, नियम ११(८) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही सर्व कलमे जामीनपात्र असतानाही, तपास अधिकाऱ्यांनी पोलिस कोठडीची मागणी केली होती. कोथरूड पोलिसांनी न्यायालयात अर्ज करून सुशील हगवणे याला सोमवारी अटक केली होती. त्याला न्यायालयाने मंगळवारी जमीन मंजूर केला. सरकारी वकील पल्लवी काशिद यांनी बाजू मांडली. न्यायालयाने त्याची रवानगी येरवडा कारागृहात केली. मात्र, आरोपीचे वकील अ‍ॅड. स्वानंद गोविंदवार यांनी तपास अधिकाऱ्यांच्या मागणीस आक्षेप घेतला आणि नंतर जामीन मंजूर केला. (Marathi Top Headline)

=========

हे देखील वाचा : Devendra Fadnavis : ‘फडणवीस माझे बाप नाहीत’ ठाण्यातल्या त्या बॅनरबाजीची जोरदार चर्चा

=========

वैष्णवीचा पती शशांक हगवणे आणि नणंदेचा मित्र निलेश चव्हाण यांचा ताबा आज वारजे पोलिसांनी घेतला आहे. वैष्णवी हगवणे हिने १६ मे रोजी पिंपरी-चिंचवड येथील बावधन येथे आपल्या सासरी आत्महत्या केली होती. अजित पवार यांच्या पक्षातील निलंबित नेते राजेंद्र हगवणे यांच्या कुटुंबीयांनी तिचा छळ केला. तसेच तिच्या माहेरच्या मंडळींना २ कोटी रुपये मागितले होते. वैष्णवीच्या लग्नात 51 तोळे सोने, फॉर्च्यूनर कार तसेच चांदीची भांडी अशा वस्तू देण्यात आल्या होत्या. या प्रकरणात वैष्णवीचा नवरा शशांक, तिचा दीर, राजेंद्र हगवणे, वैष्णवीची सून, तिची नणंद हे सगळेच तुरुंगात आहेत. (Marathi Latest News)

Recent Posts

Related Articles

Ashadhi Wari
राज्य

Ashadhi Wari : ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचा निरा स्नान सोहळा संपन्न

सध्या संपूर्ण महाराष्ट्राला आषाढी एकादशीचे वेध लागले आहे. वातावरण पूर्ण भक्तिमय आणि...

Monsoon
राज्य

Monsoon : महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना IMD चा रेड अलर्ट

यंदा मे महिन्यात जवळपास संपूर्ण राज्यात कमी जास्त प्रमाणात पाऊस झाला. संपूर्ण...

Indrayani River
राज्य

Indrayani River : इंद्रायणी नदीवरील लोखंडी पुल कोसळून चार जणांचा दुर्दैवी अंत

सध्या सतत विविध अपघातांच्या बातम्या कानावर येत आहे. दुर्घटनांची मालिका थांबण्याचे नावच...

Mumbai Local
राज्य

Mumbai Local : लोकल प्रवासात २० वर्षात तब्बल ५० हजारांहून अधिक लोकांनी गमावला जीव

९ जून रोजी मुंबईतील मध्य रेल्वे मार्गावर दिवा स्थानकाजवळ कसारा ते सीएसएमटी...