Home लाईफ स्टाईल Temple : जगाच्या अंताचे रहस्य असलेल्या ‘या’ मंदिरात दर्शन घेण्यासाठी जावे लागते ९० फूट खोल गुहेत
लाईफ स्टाईल

Temple : जगाच्या अंताचे रहस्य असलेल्या ‘या’ मंदिरात दर्शन घेण्यासाठी जावे लागते ९० फूट खोल गुहेत

11
Temple

भारतातील मंदिरं हा खरंतर चर्चेचा आणि अभ्यासाचा विषय आहे. कारण अगणित मंदिरं असलेल्या भारतामध्ये अनेक मंदिरं अशी आहेत, ज्याची रहस्ये, वैशिष्ट्ये आजही मनुष्याला अचंभित करताना दिसत आहे. अगदी विज्ञान आणि मोठमोठे वैज्ञानिक देखील अनेक मंदिरांची रहस्ये सोडवण्यात अपयशी ठरले आहेत. आपल्या देशात आपण पाहिले तर आपल्या पुराणांशी संबंधित अनेक खुणा, पुरावे आजही सापडतात. भूतकाळातील अनेक घटनांची साक्ष देणाऱ्या या खुणा देखील एक प्रकारचे रहस्यच आहे. भारताला तर अफाट मोठा आणि अनुत्तरित पौराणिक इतिहास लाभला आहे. या पौराणिक इतिहासाच्या खुणा आजही आपल्याला सहज पाहायला मिळतात. (Temple)

असेच एक मंदिर आहे, जे भगवान शिवाला समर्पित असून, ते जगातील एकमेव गुफा स्वरूपातील शंकराचे मंदिर असल्याचे सांगितले जाते. हे मंदिर स्वयंभू असून अतिशय चमत्कारिक आणि वैशिष्ट्यांनी भरलेले आहे. आम्ही ज्या मंदिराबद्दल बोलत आहोत ते मंदिर आहे, उत्तराखंड राज्यातील शांत पर्वतांमध्ये वसलेले ‘पाताळ भुवनेश्वर मंदिर’. हे मंदिर केवळ एक गुफा मंदिर नाही, तर ते सनातन धर्माच्या गूढ रहस्यांचा, प्राचीन श्रद्धांचा आणि अद्भुत कथांचा पुरावा आहे. (Marathi News)

पाताळ भुवनेश्वर मंदिर हे भूगर्भात ९० फूट खोल असलेले गुफा मंदिर आहे. या मंदिराचा इतिहास रहस्यमय असून त्याचा उल्लेख अनेक पुराणांत देखील सापडतो. हे मंदिर मानवनिर्मित नसून स्वयंभू आहे. उत्तराखंड राज्याच्या पिथौरागढ जिल्ह्यातील गंगोलीहाटपासून जवळपास १४ किलोमीटरवर असलेले हे भूमिगत मंदिर आपल्या नैसर्गिक रचनेमुळे आणि त्यासोबत जोडलेल्या पौराणिक कथांमुळे जगभरात प्रसिद्ध आहे. अतिशय लांबून लांबून भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. ही गुहा प्रवेशद्वारापासून 160 मीटर लांब आहे. या मंदिरात 33 कोटी देवतांचा वास असल्याचे मानले जाते. या गुहेत अनेक खडकांची रचना आणि विविध देवतांच्या गुंतागुंतीच्या प्रतिमा कोरल्या गेलेल्या आहेत. (Marathi Latest News)

Temple

उत्तराखंडमधील कुमाऊं मंडळात असलेल्या अल्मोडा शहरापासून १६० कि.मी. अंतरावर अनेक पर्वतरांगा आहेत. यामधील गंगोलीहाट पर्वतरागांमधील एका पर्वतावर पाताळ भुवनेश्वर नामक गुफा आहे. या गुहेच्या चारही बाजूला देवदाराचे घनदाट जंगल आहे. या परिसरात अनेक गुहा असल्याचे आढळून येते. यापैकी एका गुहेत भगवान महारुद्र महादेवाचे पाताल भुवनेश्वर मंदिर आहे. येथील मान्यतेनुसार, आदि गुरू शंकराचार्य प्रथम या स्थानी आले होते, असे सांगितले जाते. (Top Marathi News)

पाताळ भुवनेश्वर मंदिराच्या गुहेत चार खांब आहेत, ज्यांना आपल्या चार युगांनुसार नावे दिली आहेत. सतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. सर्व खांबांमध्ये कोणताही बदल नाही परंतु कलियुगच्या खांबाची लांबी इतर खाब्यांपेक्षा जास्त आहे. कलियुगाचा प्रतिक असणारा खांब हळूहळू वर सरकत आहे. हा दगड ज्यावेळी भिंतीला स्पर्श करेल, तेव्हा कलियुगाचा अस्त होईल, अशी मान्यता आहे. केवळ भारतातील नाही, तर देश-विदेशातील अनेक पर्यटक या गुहेला भेट देण्यासाठी येत असतात. (Marathi Top Headline)

स्वर्ग, नरक, मोक्ष आणि पापाचे असे चार दरवाजे असल्याचे सांगितले जाते. या चार दरवाज्यांपैकी पापाचे दार बंद झाले असून, आता फक्त तीनच दरवाजे उघडे आहेत. गुहेच्या प्रवेशद्वारावर शेषनागाची एक मोठी नैसर्गिक आकृती आहे. पृथ्वी त्याच्या फण्यावर विसावलेली आहे असं मानलं जातं. शेषनागाच्या फण्याची ही आकृती वेळेनुसार वाढत आहे असंही म्हटलं जातं. जेव्हा ती पूर्ण वाढेल, तेव्हा कलियुग संपेल आणि जगाचा अंत होईल अशी आख्यायिका आहे. (Social Update News)

Temple

सर्वप्रथम या गुफा मंदिराचा साक्षात्कार त्रेतायुगामध्ये राजा ऋतुपुर्ण यांना झाला होता. अयोध्येचे राजा ऋतुपर्णा भगवान शिवशंकराचे मोठे भक्त होते. त्यांनी या गुहेचा शोध लावला. द्वापरयुगामध्ये गुफा मंदिराचा साक्षात्कार पांडवांना झाला होता. कलियुगात याचा साक्षात्कार जगत् गुरू शंकराचार्यांना इ.स.पूर्व ७२२ च्या दरम्यान या गुहेबद्दल साक्षात्कार झाला. येथे येऊन त्यांनी तांब्याचे शिवलिंग स्थापन केले, असे सांगितले जाते. जगद्गुरु शंकराचार्यांनी गुफा मंदिराची माहिती चंदराजांना दिली आणि चंदराजांनी गुफा मंदिरातील पूजा-अर्चनाची व्यवस्था करायला भंडारी परिवाराला नेमले. आजही भंडारी परिवाराची १९ वी पिढी ही परंपरा नित्यनियमाने पूजा करते. (Marathi Trending News)

या मंदिराचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे मंदिरात असलेले गणेशाचे मस्तक. हिंदू धर्मात गणेशाला प्रथमेश मानले जाते. प्रथम पूजनीय गणेश हिंदू धर्मात अतिशय मोठी देवता मानली जाते. गणेश जन्माची कथा आपल्या सर्वांना माहित आहे. देवी पार्वतीने चंदनापासून एका बालकाची मूर्ती घडवली आणि त्यातून गणेश निर्माण झाले. पुढे भगवान शंकराने क्रोधीत होऊन गणपतीचे मस्तक धडापासून वेगळे केले होते. यानंतर माता पार्वतीच्या आग्रहावरून शंकराने गणपतीला हत्तीचे मस्तक गणेशाला लावले, अशी कथा सांगितली जाते. धडापासून वेगळे केलेले गणपतीचे मूळ मस्तक शिवशंकरांनी या पाताल भुवनेश्वर गुहेत ठेवले होते, अशी कथा प्रचलित आहे. (Todays Marathi HEadline)

गुफा मंदिरात स्वयंभू शिवलिंग आणि श्री गणेशाची शिलरूपी मूर्ती आहे. तिच्यावर १०८ पाकळ्यांचे शिलारूपी ब्रह्मकमळ आहे. त्यातून भगवान गणेशाच्या मूर्तीवर सतत पाण्याच्या थेंबांचा जलाभिषेक होत असतो. या मंदिराच्या गुहेतून एक छोटासा झरा वाहत असतो, ज्याला गंगेचा गुप्त मार्ग मानलं जातं. हा झरा कुठून येतो आणि कुठे जातो हे अजूनही एक रहस्य आहे, ज्याचा शोध वैज्ञानिक घेत आहेत. या गुहेमध्ये नागाच्या आकृतीची एक मोठी शिळा आहे. असे मानले जाते की, राजा परीक्षितला मिळालेल्या शापातून मुक्ती देण्यासाठी त्यांचा मुलगा जन्मेजयने याच कुंडात सर्व नागांना जाळून भस्म केले होते. परंतु तक्षक नाग यातून वाचला आणि या नागाने परीक्षित राजाला यमसदनी पाठवले. (Top Marathi Stories)

=========

हे देखील वाचा : Badrinath : आठवे वैकुंठ असलेल्या बद्रीनाथ धामची रंजक वैशिष्ट्ये

=========

पाताळ भुवनेश्वर मंदिराला भेट देणे वाटते तितके सोपे अजिबातच नाही. धोकादायक मार्ग आणि पर्वत पार करून गेल्यानंतर या मंदिरात पोहचता येते. खोल दऱ्या, थंडी, अरुंद आणि निसरडा रास्ता यामुळे मंदिरात जाण्याचा मार्ग खूपच कठीण आहे. भाविकांना गुहेत आरामात प्रवेश करता यावा म्हणून दोन्ही बाजूंना साखळ्या बसवण्यात आल्या आहेत. तथापि इथे प्रवेश करणे आणि मंदिरात बाहेर पडणे अत्यंत कठीण आहे. मात्र या मंदिराला एकदा भेट नक्की द्या आणि इथे असलेल्या रहस्यांना आपल्या डोळ्याने पाहा. (Marathi Headline)

Recent Posts

Related Articles

Tourism
लाईफ स्टाईल

Tourism : स्लीप टुरिझम म्हणजे काय? काय आहे हा नवा ट्रेंड?

प्रत्येक व्यक्तीच्या उत्तम आरोग्यासाठी सकस आहार, उत्तम व्यायाम जेवढा आवश्यक आहे, तेवढीच...

Chaturthi
लाईफ स्टाईल

Chaturthi : नोव्हेंबर महिन्यातील संकष्टी चतुर्थी कधी आहे? जाणून घ्या चतुर्थीचे महत्त्व आणि पूजाविधी

आपल्या सर्वांचे आराध्य दैवत म्हणजे गणपती. या गणेशाची आपण कायमच आराधना करत...

Lord Shiv
लाईफ स्टाईल

Lord Shiv : का महादेवाने सर्वेश्वर अवतार घेत केले भगवान नरसिंहाशी युद्ध?

भगवान शिव आणि भगवान विष्णू यांची एकत्र पूजा करण्याचा आणि आराधना करण्याचा...

Indian Sweets | Top Marathi Headlines
लाईफ स्टाईल

Indian Sweets : मिठाईवर लावल्या जाणाऱ्या सोने, चांदीच्या वर्खची रंजक माहिती

आपल्या देशामध्ये कोणताच लहान मोठा सण, समारंभ, पूजा मिठाईशिवाय पूर्ण होत नाही....