अमेरिकेने H1-B व्हिसा शुल्कात लक्षणीय वाढ केली असून हा व्हिसा मिळविण्यासाठी आता एक लाख डॉलर्स शुल्क भरावे लागणार आहे. भारतीय रुपयांमध्ये ही रक्कम सुमारे 88 लाखांपर्यंत जाणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयाचा लाखो भारतीय व्यावसायिकांवर परिणाम होणार आहे. पण या निर्णयाचा अभ्यास करणा-या अमेरिकन विश्लेषकांनी ट्रम्प यांचा हा निर्णय भविष्यात अमेरिकेच्याच मुळावर येण्याचा धोका आहे. यामुळे अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅलीच्या अस्तित्वारच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ट्रम्प यांच्या या आदेशानं अमेरिकेतील अनेक मोठ्या कंपन्यांनी आपल्या कर्मचा-यांनी कुठल्याही परिस्थितीत अमेरिका सोडू नका, आणि अमेरिकेच्या बाहेर असाल तर एक दिवसात कामावर हजर व्हा, असा आदेश दिला आहे. (Donald Trump)

त्यामुळे मोठ्या प्रमाणात अस्थिरतेचे वातावरण तयार झाले आहे. ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेत काम करणाऱ्या भारतीय तरुणांवर मोठा परिणाम झाला आहे. अमेरिकेत मोठ्या संख्येने भारतीय H-1B व्हिसावर नोकरी करत आहेत. त्यांच्यामध्ये गोंधळाचे वातावरण तयार झाले आहे. H-1B व्हिसा धारकाला गैर-स्थलांतरित दर्जा असतो. हा व्हिसा तीन वर्षांसाठी वैध असतो. अभियांत्रिकी, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, गणित आणि व्यवसाय प्रशासनाशी संबंधित व्यवसायांना सामान्यतः H-1B व्हिसा दिला जातो.
अमेरिकेने H-1B व्हिसासाठी वार्षिक शुल्क एक लाख डॉलर्स पर्यंत वाढवले आहे. नॅसकॉमने इशारा दिला आहे की, या निर्णयाचा भारतीय आयटी कंपन्यांवर गंभीर परिणाम होणार असून अनेक तरुणाच्या नोकरीवर गदा येणार आहे. या निर्णयाचे भविष्यातही अनेक परिणाम होणार आहेत. नवीन आदेशानुसार, परदेशी व्यावसायिकांना नियुक्त करणाऱ्या कंपन्यांना आता दरवर्षी सरकारला एक लाख डॉलर एवढे शुल्क द्यावे लागेल. यामागचे अमेरिकन सरकारचे गणित असे आहे की, जर ग्रीन कार्ड प्रक्रिया लांबली तर कंपन्यांना अनेक वर्षे हे शुल्क भरावे लागणार आहे. यामुळे कंपन्या अन्य देशातील कर्मचाऱ्यांना कामावर ठेवण्यापासून रोखतील आणि अमेरिकन तरुणांना कामावर ठेवण्यास प्राधान्य देतील, असा उद्देश आहे. (Donald Trump)
हा नियम 21 सप्टेंबरपासून लागू होईल. यातील सर्वात मोठा धोका म्हणजे, ही अंमलबजावणीची अंतिम मुदत फक्त एक दिवस आहे. इतक्या कमी मुदतीमुळे कंपन्या, व्यावसायिक आणि विद्यार्थ्यांमध्ये अनिश्चितता निर्माण झाली आहे. अमेरिकेच्या H-1B व्हिसा कार्यक्रमाचे सर्वात मोठे लाभार्थी भारतीय तंत्रज्ञान व्यावसायिक आहेत. दरवर्षी, 650,000 व्हिसा आणि 20,000 अतिरिक्त व्हिसा जारी केले जातात. USCIS नुसार, आर्थिक वर्ष 2025 पर्यंत Amazon ला सर्वाधिक, 10,044 एवढे व्हिसा मिळाले आहेत. TCS ला 5,505, मायक्रोसॉफ्टला 5,189, मेटा 5,123 एवढे व्हिसा मिळाले आहेत. यापाठोपाठ Apple चा क्रमांक लागतो. (International News)
या सर्वांमध्ये भारतीयांची संख्या अधिक आहे. H-1B व्हिसा वरील हे शुल्क अमेरिकेतील भारतीय आयटी अभियंत्यांच्या नोकऱ्या धोक्यात आणणारे आहे. कारण 2023-24 या आर्थिक वर्षात 200000 हून अधिक भारतीयांनी H-1B व्हिसा मिळाला आहे. गेल्या वर्षी भारत हा H-1B व्हिसाचा सर्वात मोठा लाभार्थी ठरला. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, 2020 ते 2023 दरम्यान मंजूर झालेल्या व्हिसांपैकी 73.7% भारतीयांचा वाटा होता. त्यानंतर चीन 16% आणि कॅनडा 3% यांचा नंबर लागत आहे. मुळात भारतीयांचा व्हिसाचा आकडा मोठा दिसत असला तरी हे सर्व आयटी आणि अन्य क्षेत्रात कार्यरत आहेत. आता याच स्किल कामगारांच्या नोकरीवर गदा आली तर अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅलीचे अस्तित्वच संपुष्टात येईल, अशी भीती अभ्यासक व्यक्त करीत आहेत. (Donald Trump)
यापेक्षा आणखी एक धोका या सिलिकॉन व्हॅलीवर घोंगावत आहे. अमेरिकन सिनेटर बर्नी मोरेनो यांनी सादर केलेला HIRE कायदा लागू झाल्यावर परदेशी कामगारांच्या सेवांवर 25% कर लादला जाणार आहे. याचाही फटका भारतीयांना बसणार आहे. यामुळे आउटसोर्सिंग मर्यादित होऊ शकते आणि भारतीय कंपन्यांसमोरील आव्हाने आणखी वाढणार आहेत. या सर्वावर व्हाईट हाऊसचे कर्मचारी सचिव विल शार्फ यांनी सांगितले की, हे पाऊल अमेरिकन नोकऱ्यांचे संरक्षण करण्यासाठी आणि व्हिसा प्रणालीचा गैरवापर रोखण्यासाठी उचलण्यात आले आहे. H-1B हा जगातील सर्वात जास्त गैरवापर होणारा व्हिसा असून आता उच्च कुशल व्यक्तीच अमेरिकेत प्रवेश करू शकतील, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. या व्हिसा प्रक्रियेतील बदलांचा भारतावर मोठा परिणाम होणार आहे. (International News)

H-1B व्हिसाच्या या वाढीव शुल्कामुळे कमी पगाराच्या नोकऱ्यांसाठी व्हिसा मिळणार नाही. अनेक भारतीय तरुणांच्या नोक-या जाण्याची शक्यता आहे. त्यातच भारतीय विद्यार्थ्यांमध्ये अमेरिकेतील शिक्षणाचे मोठे आकर्षण आहे. पण आता अमेरिकेत शिक्षणासाठी जाणा-या विद्यार्थ्यांमध्ये मोठी घट होणार आहे. इन्फोसिस, टीसीएस आणि विप्रो सारख्या भारतीय आयटी कंपन्यांवरही या निर्णयाचा परिणाम होणार आहे. या कंपन्या कनिष्ठ आणि मध्यम-स्तरीय अभियंत्यांना अमेरिकन क्लायंट प्रकल्पांमध्ये आणि कौशल्य विकासासाठी पाठवण्यासाठी H-1B व्हिसाचा वापर करतात. या सर्वात प्रसिद्ध अमेरिकन शास्त्रज्ञ आणि लेखक मिचियो काकू यांची एक भविष्यवाणी व्हायरल होत आहे. मिचियो काकू यांनी H1-B व्हिसा अमेरिकेच्या प्रगतीचे गुप्त शस्त्र असल्याचे सांगितले होते. मिचियो काकू यांनी एका व्हिडिओमध्ये सांगितले आहे की,परदेशी उच्च-कुशल कामगारांशिवाय अमेरिकेतील गुगलसारख्या कंपन्यांचे अस्तित्व धोक्यात येईल. (Donald Trump)
============
हे देखील वाचा : Donald Trump : ‘ट्रम्प इज डेड’ या ट्रेंडने उडवली ट्रम्प प्रशासनाची झोप !
==============
सिलिकॉन व्हॅलीच उद्धवस्त होईल. H1-B हा प्रतिभावान व्हिसा आहे. जगातील सर्वात मौल्यवान विचार अमेरिकेत येतात. पण जर तुम्ही H1-B व्हिसावर बंदी घातली तर ते परत जातील. H1-B व्हिसाधारक तुमच्या नोकऱ्या घेत नाहीत, ते तुमच्यासाठी एक उद्योग उभारत आहेत, असे मिचिया काकू यांनी आपल्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे. आता ट्रम्प प्रशासानानं H1-B शुल्कात वाढ केल्यापासून अमेरिकेत मिचियो काकू यांचा हा व्हिडिओ सर्वाधिक व्हायरल होत आहे. अर्थात ट्रम्प सरकारच्या अनेक निर्णयाविरोधात कोर्टात धाव घेण्यात आली आहे. आत्ताही या निर्णयाविरोधात तेथील आयटी क्षेत्रातील कंपन्या काय भूमिका घेणार आहेत, याकडे जगाचे लक्ष लागले आहे. (International News)
सई बने
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
- America
- biology
- BJP
- Bloomberg
- Business
- Canada
- china
- congress
- cricket
- donald trump
- eknath shinde
- engineering
- H1-B visa
- india
- information
- infosys
- International news
- Latest International News
- latest marathi news
- latest marathi updates
- latest social updates
- Maharashtra
- maharashtra politics
- Marathi News
- Mathematics
- Michio Kaku
- Mumbai
- Narendra Modi
- News
- physics
- Political News
- political updates
- Politician
- Politics
- Silicon Valley
- Social News
- Social Updates
- TCS
- Temple
- todays marathi headlines
- Todays Marathi News
- Top Marathi Headlines
- Top Stories
- Uddhav Thackery
- Wipro