सध्या अमेरिका आणि ट्रम्प सरकार जगभरात चर्चेचा विषय बनले आहेत. ट्रम्प सरकारने भारतावर लादलेल्या अधिक टॅरिफमुळे ट्रम्प सार्वधिक गाजताना दिसत आहे. त्यांच्या या निर्णयामुळे अनेक देशांनी त्यांना पाठिंबा दिला तर काहींनी त्यांच्या या निर्णयाला चुकीचे म्हटले आहे. एवढेच नाही तर ते मागील काही काळापासून सतत भारताबद्दल भडकावू विधाने करताना दिसले. त्याच्या अशा वागण्यामुळे अमेरिका आणि भारतातील संबंध मात्र आता बिघडताना दिसत आहे. मात्र हे सर्व एक्किडे चालू असताना दुसरीकडे पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प चर्चेत आले आहे. यावेळेला मात्र कारण वेगळे आणि धक्कादायक आहे. झाले असे की, डोनाल्ड ट्रम्प यांच्या एकदम जवळच्या व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. (Marathi)
कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे युवा नेते चार्ली कर्क यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. ऊताह व्हॅली युनिव्हर्सिटीमधील एका कार्यक्रमात त्यांना गोळी मारण्यात आली. या घटनेने संपूर्ण अमेरिकेत मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना १० सप्टेंबर रोजी दुपारीच्या वेळेला घडली. चार्ली कर्क एका कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे देत होते. तेव्हाच त्यांच्या गळ्यावर गोळी झाडण्यात आली. (America)
चार्ली किर्क यांना गोळी लागून ते खाली पडल्याची घटना त्या परिसरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये स्पष्टपणे कैद झाली आहे. या घटनेनंतर सदर परिसरात एकच गोंधळ उडाला आणि लोक घाबरून धावू लागले. या थरारक घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये आपल्याला स्पष्ट दिसत आहे की, चार्ली माइकवर बोलत असताना अचानक गोळीचा आवाज ऐकू येतो आणि कर्क जमिनीवर पडतात. (Top Marathi headline)
‘टर्निंग पॉइंट यूएसए’ या रूढीवादी युवा गटाचे सीईओ आणि सह-संस्थापक चार्ली कर्क यांची हत्या करण्यात आली आहे. चार्ली कर्क हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे खूप जवळचे मानले जायचे. त्यामुळेच ट्रम्प यांनी स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करून कर्क यांच्या मृत्यूची माहिती दिली. दरम्यान सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताना ट्रम्प यांनी चार्लीच्या सन्मानार्थ देशभरातील सर्व राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकवण्याचे आदेश दिले आहेत. ट्रम्प यांनी कर्क यांच्या मृत्यूबाबत शोक व्यक्त केला आहे. ट्रम्प यांच्यासह कमला हॅरिस, जो बायडेन आणि बराक ओबामा यांनीही शोक व्यक्त केला आहे. (Marathi News)

दरम्यान कर्क यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले असून, अद्याप त्याची ओळख उघड झालेली नाही. या कार्यक्रमापूर्वीच काही लोकांनी सदर विद्यापीठात कर्क यांच्या उपस्थितीचा निषेध केला होता. विद्यापीठ प्रशासनाला त्यांचा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी देखील करण्यात आली होती. ही मागणी करणाऱ्या ऑनलाइन याचिकेवर १००० सह्या देखील होत्या. पण, विद्यापीठाने स्पष्ट केले होते की हा कार्यक्रम रद्द केला जाणार नाही. (Trending Headline)
चार्ली किर्क यांच्या निधनानंतर राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी एक पोस्ट शेअर करत दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले आहे, “अमेरिकेत तरुणाईचे मन चार्ली इतके चांगले कोणी समजू शकत नव्हते. माझ्या मनात त्यांच्याबद्दल खूप प्रेम आणि सन्मान होता. तो आता आपल्यामध्ये नाही. मेलानिया आणि मी त्याची पत्नी एरिका आणि त्याच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहोत. चार्ली, आम्ही तुझ्यावर प्रेम करतो!” (Todays Marathi Headline)
कर्क यांच्यावर गोळी झाडणाऱ्या आरोपीने कथितरित्या लूसी सेंटरमधून चार्ली किर्क यांच्यावर गोळी झाडली. ही बिल्डिंग कर्क यांचे भाषण सुरू असलेल्या जागेपासून अवघ्या २०० मीटर अंतरावर आहे. मारेकऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. तो युव्हीयूचा विद्यार्थी नसल्याचे विद्यापीठाने जारी केलेल्या एका निवेदनात सांगितले आहे. (Marathi Headline)

चार्ली कर्क कोण होते?
अमेरिकेतील उजव्या विचारसरणीचे नेते म्हणून ओळख असलेले चार्ली किर्क या देशातील अशा प्रभावी व्यक्तीमत्त्वांपैकी एक होते. त्यांनी रिपब्लिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा राजकीय हेतू पुढे नेण्यास मोठी मदत केली. मोठ्या संख्येनं तरुणाईला प्रभावित केलं. किर्क हे मुळचे इलिनोईसचे रहिवासी होते. ते एक कंजर्वेटिव प्रभावशाली व्यक्ती होते. ते टर्निंग पॉइंट यूएसएचे संस्थापक होते. २०१२ साली वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी त्याने टर्निंग पॉइंटची सुरुवात केली. (Top Marathi News)
टर्निंग पॉइंट ही अमेरिकन शाळा आणि महाविद्यालय परिसरात कंजर्वेटिव राजकारणाला प्रोत्साहन देणारी संघटना आहे. कर्क संपूर्ण अमेरिकेत कॉलेजमध्ये डिबेट शो साठी देशाचा दौरा सुरु करणार होते. मात्र त्या आधीच त्यांची हत्या झाली. कर्क यांनी त्यांच्या या दौऱ्याला ‘द अमेरिकन कमबॅक टूर’ नाव दिले होते. या अंतर्गत कोलोराडो स्टेट यूनिवर्सिटी, यूनिवर्सिटी ऑफ मिनेसोटा सह अन्य कॉलेज परिसरात ते थांबणार होते. त्याशिवाय कर्क यांचा २५ सप्टेंबरला डार्टमाउथ कॉलेजमध्ये प्रोग्रेसिव प्रभावशाली व्यक्ती हसन पाइकर यांच्यासोबत एक डिबेट होणार होती. (Latest Marathi News)
============
Nepal : जाणून घ्या नेपाळमधील एकमेव अब्जाधीश व्यक्तीबद्दल
Nepal : तुमच्या घरातही असतील ‘या’ नेपाळी ब्रँड्सच्या वस्तू
============
मागील १० वर्षात कर्क रिपब्लिकन पार्टीमध्ये उदयोन्मुख स्टार म्हणून पुढे आले होते. त्यांनी आपली ऑनलाइन ओळख तर मजबूत बनवली सोबतच रिपब्लिकन पार्टीच्या टर्निंग पॉइंटला एक प्रभावी संघटना देखील बनवले. वयाच्या २२ व्या वर्षी २०१६ मध्ये रिपब्लिकन कन्वेंशनमध्ये दिलेल्या एका भाषणाने त्यांना राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून दिली होती. त्यानंतर दोन राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत कर्क यांची संघटना एक राष्ट्रीय राजकीय ताकद बनली. स्विंग-स्टेट्स वाल्या राज्यात जनमत रिपब्लिकनच्या बाजूने वळवण्यासाठी ही संघटना काम करायची. (Top Trending News)
एका माहितीनुसार चार्ली कर्क यांनी २०२० च्या अध्यक्षीय निवडणुकीत झालेल्या फसवणुकीच्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या खोट्या दाव्यांचे समर्थन केले होते. या काळात त्यांनी अमेरिकेतील ट्रान्सजेंडर आणि स्थलांतरितांवरही हल्ला केला होता. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
- America
- Charlie Kirk
- Charlie Kirk death
- Charlie Kirk information in marathi
- Charlie Kirk mahiti
- Charlie Kirk murder
- Charlie Kirk news
- donald trump
- donald trump and Charlie Kirk
- india
- International news
- US
- who is Charlie Kirk?
- अमेरिका
- आंतरराष्ट्रीय बातमी
- कोणते चार्ली कर्क?
- चार्ली कर्क
- चार्ली कर्क आणि डोनाल्ड ट्रम्प
- चार्ली कर्क बातमी
- चार्ली कर्क माहिती
- चार्ली कर्क हत्या
- टर्म आणि कर्क
- ट्रम्प बातमी
- डोनाल्ड ट्रम्प