Home आरोग्य वारंवार लघवी होणे असू शकते ‘या’ गंभीर आजारांचे संकेत
आरोग्य

वारंवार लघवी होणे असू शकते ‘या’ गंभीर आजारांचे संकेत

6
Urination Causes
Urination Causes

तुम्हाला रात्रीच्या वेळी वारंवार लघवीला जावेसे वाटत राहते का? जर तुमचे उत्तर हो असेल तर हे काही गंभीर आजारांचे संकेत असू शकतात. सुरुवातीला याबद्दल फारसे कळणार नाही. कारण तुम्हाला असेच वाटत राहिल की, तुम्ही अधिक प्रमाणात पाणी प्यायले आहे. पण वेळीच याकडे लक्ष दिले पाहिजे. त्यामुळे सर्वात प्रथम जाणून घेऊयात दिवसभरातून किती वेळा लघवी करणे नॉर्मल आहे.(Urination Causes)

तज्ञांनुसार दिवसभरात ४-७ वेळा लघवी होणे ही सामान्य बाब आबे. परंतु एखादा व्यक्ती दिवस भरात ६ पेक्षा अधिक वेळा लघवी करत असेल आणि प्रत्येक वेळी नॉर्मल पेक्षा अधिक होत असेल तर हे आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकते. अशातच तुम्ही डॉक्टरांचा सल्ला जरुर घ्या.

वारंवार लघवी होत असेल तर या आजारांचे संकेत असू शकतात

-मधुमेह
वारंवार लघवी होणे मधुमेहाचे एक मुख्य संकेत आहे. डॉक्टर असे सांगतात की, जेव्हा किडनीत ग्लुकोजचे प्रमाण वाढते तेव्हा वारंवार लघवी होते. सर्वसामान्यपणे एक व्यक्ती दिवसभरात ३ लीटर लघवी करतो. मात्र मधुमेह झाल्यास त्याचे प्रमाण वाढून २० लीटर पर्यंत असू शकते. अशातच तु्म्हाला सुद्धा वारंवार लघवी होत असेल तर तुम्ही तुमच्या फॅमिली डॉक्टरला भेटा आणि ब्लड शुगर तपासून घ्या.

-ब्लड प्रेशर
जर तुम्हाला वारंवार लघवीसाठी जावे लागत असेल तर ही ब्लड प्रेशरची समस्या असू शकते. या व्यतिरिक्त हाय ब्लड प्रेशर दरम्यान जी औषधं दिली जातात ते किडनीवर अतिरिक्त लिक्विडला बाहेर काढण्यासाठी दबाव टाकतात. हेच कारण आहे की, अशा प्रकारच्या औषधांमुळे व्यक्तीला वारंवार लघवी येत राहते.

Urination Causes
Urination Causes

-युरिनरी ट्रॅक्ट इंफेक्शन
युरिनरी टॅक्ट्र इंफेक्शन झाल्यास वारंवार लघवी होण्याची समस्या सुरु होते. युरिनमध्ये इंफेक्शन झाल्यास लघवी होताना जळजळ सुद्धा होते. खरंतर युटीआय ही सामान्य समस्या आहे. परंतु त्याकडे लक्ष न दिल्यास त्याचे इंफेक्शन किडनीत पसरु शकते. यामुळे गंभीर आजार ही होऊ शकतो.

-ओवरएक्टिव ब्लॅडर
ही अशी एक स्थिती आहे ज्यामध्ये वारंवार लघवी करावी असे वाटत राहते. यामुळे डेली अॅक्टिव्हिटीज प्रभावित होऊ शकतात.(Urination Causes)

हे देखील वाचा- तरुणांमध्ये हार्ट अटॅक येण्याचे वाढलेय प्रमाण, वेळीच अशी घ्या काळजी

या’ स्थितीत डॉक्टरांशी तातडीने संपर्क साधा
-लघवीतून रक्त येणे
-लघवी करताना जळजळ होणे किंवा दुखणे
-पोटाच्या आजूबाजूला दुखणे
-अचानक लघवी करण्याची तीव्र इच्छा होणे
-लघवी थांबवता न येणे

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Hair Care
आरोग्य

Hair Care : ‘हे’ उपाय करून घरच्या घरी पांढऱ्या केसांना करा काळे

आजच्या काळात चुकीच्या जीवन शैलीमुळे मनुष्याचे संपूर्ण दैनंदिन जीवनच बिघडून गेले आहे....

Health
आरोग्य

Health : ‘हे’ सोपे उपाय करा आणि हिवाळ्यात ओठांना कोरडे होण्यापासून वाचवा

हिवाळा म्हणजे सर्वांचाच आवडता ऋतू. छान गुलाबी थंडीमध्ये व्यायाम करायला, काम करायला...

Skin Care | Bollywood Life
आरोग्य

Skin Care : प्रायव्हेट पार्टवरील काळेपणा दूर करायचा…? मग करा ‘हे’ सोपे उपाय

आपल्या सर्वांनाच आपल्या शरीराची, आपल्या दिसण्याची खूपच काळजी असते. कमी अधिक प्रमाणात...

Health
आरोग्य

Health : नियमित पेरू खाल्ल्याने होतील अनेक आश्चर्यकारक फायदे

फळं खाणे नेहमीच आपल्या आरोग्याच्या दृष्टीने लाभदायक मानले गेले आहे. अनेकदा तर...