Home गाजावाजा Unregistered Will : मालमत्तेच्या वादांपासून वाचायचे असेल तर हे जाणून घ्या
गाजावाजा

Unregistered Will : मालमत्तेच्या वादांपासून वाचायचे असेल तर हे जाणून घ्या

0

Unregistered Will : भारतात अनेकदा मालमत्तेच्या वाटपावरून वाद निर्माण होतात आणि त्यामागील मुख्य कारण म्हणजे वसीयत (Will) स्पष्ट नसणे किंवा तिची योग्य माहिती वारसांना नसणे. अनेकांना असे वाटते की वसीयत नोंदणी (Registration) केल्याशिवाय ती वैध ठरत नाही. मात्र कायद्यानुसार हे पूर्णपणे बरोबर नाही. भारतीय कायद्यानुसार वसीयत नोंदणी करणे बंधनकारक नाही. जर वसीयत योग्य पद्धतीने तयार केली असेल आणि त्यावर वसीयत करणाऱ्या व्यक्तीची सही तसेच किमान दोन साक्षीदारांच्या सह्या असतील, तर ती नोंदणीकृत नसली तरी कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य धरली जाऊ शकते.  (Unregistered Will)

तज्ज्ञांच्या मते, वसीयत ही एखाद्या व्यक्तीने आपल्या मृत्यूनंतर मालमत्ता कशी वाटली जावी याबाबत केलेली अधिकृत लिखित घोषणा असते. वसीयत करणाऱ्या व्यक्तीला ‘टेस्टेटर’ असे म्हटले जाते. ही वसीयत साध्या कागदावरही लिहिली जाऊ शकते. मात्र त्यामध्ये व्यक्तीची स्पष्ट इच्छा, त्याची सही आणि दोन साक्षीदारांची उपस्थिती अत्यंत महत्त्वाची असते. जर या अटी पूर्ण झाल्या असतील, तर वसीयत नोंदणीकृत नसली तरी तिची कायदेशीर वैधता टिकून राहते. त्यामुळे अनेक कुटुंबांमध्ये जुन्या काळात तयार झालेल्या वसीयतीदेखील न्यायालयात ग्राह्य धरल्या जातात.  (Unregistered Will)

Unregistered Will
Unregistered Will

तथापि, वसीयत नोंदणी करणे अनिवार्य नसले तरी ते करणे फायदेशीर ठरते. नोंदणीकृत वसीयत असल्यास ती सरकारी नोंदवहीत सुरक्षित राहते आणि तिच्यात फेरफार होण्याची शक्यता कमी होते. तसेच भविष्यात वाद निर्माण झाल्यास वसीयत अस्तित्वात असल्याचे प्राथमिक पुरावे मिळू शकतात. तरीसुद्धा केवळ नोंदणी झाल्यामुळे वसीयत आपोआप वैध ठरत नाही. तिची अंमलबजावणी आणि वैधता सिद्ध करण्यासाठी योग्य पुरावे आणि साक्षीदार आवश्यक असतात, असे न्यायालयांनीही स्पष्ट केले आहे.  (Unregistered Will)

===============

हे देखिल वाचा :

Divorce Laws : घटस्फोट झाल्यानंतर पतीच्या मृत्यूनंतर मुलांचा संपत्तीत किती अधिकार असतो?

जुने घर विक्री करताना किती टॅक्स भरावा लागतो?

पैशांची बचत करण्यासाठी या ट्रिक्स येतील कामी

=================

जर वसीयत नोंदणीकृत नसेल आणि त्यावरून कुटुंबात वाद निर्माण झाला, तर वारसांनी न्यायालयात ‘प्रोबेट’ किंवा कायदेशीर पडताळणीची प्रक्रिया करावी लागते. या प्रक्रियेत वसीयत खरी आहे का, ती स्वेच्छेने लिहिली आहे का आणि ती लिहिताना संबंधित व्यक्ती शुद्धीत होती का याची तपासणी केली जाते. साक्षीदारांचे जबाब, दस्तऐवज आणि इतर पुरावे यांच्या आधारे न्यायालय निर्णय देते. त्यामुळे वसीयत करताना सर्व कायदेशीर नियमांचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे ठरते.

कायदे तज्ज्ञांच्या मते, भविष्यातील वाद टाळण्यासाठी वसीयत स्पष्ट, तपशीलवार आणि योग्य पद्धतीने तयार करणे आवश्यक आहे. शक्य असल्यास वकील किंवा कायदे तज्ज्ञांचा सल्ला घेऊन वसीयत तयार करावी. तसेच वसीयत नोंदणी करून ठेवणे, विश्वसनीय व्यक्तीला तिची माहिती देणे आणि आवश्यक ते दस्तऐवज सुरक्षित ठेवणेही महत्त्वाचे आहे. योग्य नियोजन केल्यास कुटुंबातील मालमत्ता वाटप पारदर्शक आणि वादमुक्त पद्धतीने होऊ शकते.  (Unregistered Will)

Latest Marathi News | News in Marathi |  Live news Updates in Marathi on Trending Topics

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%

पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा

Related Articles

गाजावाजा

Law Awareness : गाडीवर लाल-निळा दिवा लावण्याचा अधिकार कोणाला ?

Law Awareness : अलीकडेच मुंबईच्या महापौर Ritu Tawde यांच्या गाडीवर लाल-निळा दिवा...

गाजावाजा

Police : ‘तडीपार’ कारवाई म्हणजे नेमकं काय ? Police कशी करते अंमलबजावणी

Police :  गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पोलिसांकडून विविध उपाययोजना केल्या जातात. त्यापैकीच एक...

गाजावाजा

परंपरा की वादग्रस्त प्रथा ? ‘या’ समाजात दुसऱ्याची पत्नी पळवून लग्न करण्याची विचित्र रीत

Bride Capture Traction : जगभरात विविध संस्कृती आणि परंपरा आढळतात. काही परंपरा...

गाजावाजा

Parkinsons : तरुणांमध्ये वाढतोय Parkinson’s Disease चा धोका!

Parkinsons : पूर्वी वृद्धापकाळाशी संबंधित मानला जाणारा पार्किन्सनचा आजार आता तरुणांमध्येही वाढताना...

WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!