Home मनोरंजन 38 वर्षीय ‘या’ अभिनेत्रीच्या नवऱ्याकडे आहे 100 कोटींची संपत्ती
मनोरंजन

38 वर्षीय ‘या’ अभिनेत्रीच्या नवऱ्याकडे आहे 100 कोटींची संपत्ती

7
TV News
TV News

टेलिव्हिजनच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळालेली अभिनेत्री आज एकता कपूरची फेवरेट आहे. वयाची 38 वर्षे पूर्ण केल्यानंतर तिची आज टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. ‘पवित्र रिश्ता’ या सीरियलमधून प्रसिद्धी मिळालेली अंकिता लोखंडे हिच्याबद्दच्या चर्चा सध्या जोरदार रंगत आहेत. कारण ती तिच्या नवऱ्यासोबत बिग बॉसच्या 17 व्या सीजनमध्ये झळकत आहे. (Tv News)

अंकिता लोखंडेने 2021 मध्ये व्यावसायिक विक्की जैन याच्या सोबत विवाह केला. आता या दोघांनी सलमान खानच्या रिअॅलिटी शो मध्ये एन्ट्री केली आहे. कधी या दोघांमध्ये वाद होतात तर कधी एकमेकांशी प्रेमाने बोलताना ते दिसून येतात. असो, विक्कीला या शो मुळे खुप प्रसिद्धी मिळाली आहे.

100 कोटींचा मालक आहे अंकिताचा नवरा

विक्की जैन पेशाने व्यावसायिक आहे. त्याच्याकडे 100 कोटींची संपत्ती आहे. त्याचा व्यवसाय कोळसा, रियल इस्टेट ते अन्य काही क्षेत्रासंबंधित आहेत. आता तो हळूहळू सोशल मीडिया आणि टीव्हीवरील एक पर्सनालिटी झाला आहे. ऐवढेच नव्हे तर अंकिताच्या सासरच्या घराबद्दल बोलायचे झाल्यास तर ती लॅविश घरात राहते.

सुशांत सिंह राजपूत सोबत होते नाते

अंकिता लोखंडेचा जन्म मध्य प्रदेशातील इंदौर मधील एका महाराष्ट्रीयन परिवार 19 डिसेंबर, 1984 मध्ये झाला होता. आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर अंकिताने 2005 मध्ये मुंबईत येण्याचा निर्णय घेतला आणि अभिनय क्षेत्राची सुरुवात 2007 मध्ये आलेला शो ‘इंडियाज बेस्ट सिनेस्टार की खोज’ मुळे झआली. मात्र अंकिताच्या करियरला यश मिळवून दिले ते एकता कपूरच्या सीरियलने. (Tv News) 

अंकिता लोखंडेला टेलिव्हिजन क्षेत्रात एकता कपूरचा शो ‘पवित्र रिश्ता’ मधील अर्चना या भुमिकेमुळे प्रसिद्धी मिळाली होती. या शो मध्ये सुशांत तिच्या विरोधातील भुमिका करत होता. दोघांचे रिलेशनशिप सुद्धा होते. काही वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांचे नाते मोडले गेले. ब्रेकअपनंतर अंकिताने म्हटले होते की, ती यामुळे डिप्रेशनमध्ये गेली होती.

अंकिता लोखंडेची फिल्मी जर्नी
अंकिता लोखंडेने ‘मणिकर्णिका’ सिनेमातून डेब्यू केले होते. तेथे तिची मैत्री बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत सोबत झाली. त्यानंतर ती टायगर श्रॉफ याचा ‘बाघी-3’ मध्ये झळकली होती. आता लवकरच अभिनेता रणदीप हुड्डा याच्या ‘स्वतंत्र वीर सावरकर’सिनेमात दिसून येणार आहे.


हेही वाचा- 5 अफेअर, दोन लग्न तरीही आज एकटी आयुष्य जगतेय ‘ही’ अभिनेत्री

Recent Posts

Related Articles

Sulakshana Pandit
मनोरंजन

Sulakshana Pandit : अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचे निधन, ‘या’ अभिनेत्यासाठी राहिल्या आजन्म अविवाहित

ऑक्टोबर महिन्यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी आपला निरोप घेतला. हा सिलसिला नोव्हेंबरमध्ये देखील...

Cricket
क्रीडामनोरंजन

Cricket : कोण आहे स्टार क्रिकेटपटू स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छल?

भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला आणि सगळीकडे एकच जल्लोष झाला. आधी...

Tejaswini Lonari
मनोरंजन

Tejaswini Lonari : अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने गुपचूप उरकला साखरपुडा; बड्या नेत्याची होणार सून

सध्या मराठी मनोरंजनविश्वामधे लग्नसराईचे दिन आल्याचे चित्र आहे. अनेक मराठी कलाकार साखरपुडा...

Asarani
मनोरंजन

Asarani : दिग्गज हिंदी चित्रपट अभिनेते असरानी यांचे दुःखद निधन

हिंदी सिनेमात असे खूप कमी कलाकार होऊन गेले किंवा आहेत ज्यांचे केवळ...