Home मनोरंजन अभिनेत्री हिना खानला झाला कॅन्सर, पोस्ट शेअर करत दिली माहिती
मनोरंजन

अभिनेत्री हिना खानला झाला कॅन्सर, पोस्ट शेअर करत दिली माहिती

8
hina khan diagnosed cancer
hina khan diagnosed cancer

टेलिव्हिजन इंडस्ट्री खूप मोठी आणि अतिशय लोकप्रिय समजली जाते. चित्रपटात काम करणाऱ्या कलाकारांइतकीच किंबहुना त्याहूनही अधिक लोकप्रियता या कलाकारांना मिळते. टीव्ही आजकाल सर्वच घरांमध्ये मूलभूत गरज म्हणून असतोच असतो. या टीव्हीची पोहोच कमालीची आहे. त्यामुळेच या क्षेत्रात काम करणाऱ्या कलाकारांना मिळणारी प्रसिद्धी आणि प्रेम हे जास्तच असते. (Hina Khan Diagnosed With Breast Cancer)

याच टेलिव्हिजनमुळे प्रकाशझोतात आलेला एक लोकप्रिय चेहरा म्हणजे हिना खान. हो हो ‘अक्षरा’. ‘ये रिश्ता क्या केहलता है’ या मालिकेतून घराघरात पोहचलेली आणि अतिशय गाजलेली अभिनेत्री म्हणून हिनाला ओळखले जाते. ही मालिका सोडून हिनाला बरेच वर्ष झाले, मात्र अजूनही तिला ‘अक्षरा’ याच नावाने ओळखले जाते.

याच हिना खानबद्दल एक धक्कादायक आणि मोठी बातमी समोर आली आहे. हिनाला ब्रेस्ट कॅन्सर झाला असून, ती सध्या यावर उपचार घेत आहे. याबद्दलची माहिती खुद्द हिनानेच तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून दिली आहे. हिनाने याबद्दल एक पोस्ट शेअर केली असून, त्यात तिने याबद्दल सांगत तिच्यासाठी प्रार्थना करण्याचे सगळ्यांना आवाहन केले आहे.

hina khan diagnosed cancer
hina khan diagnosed cancer

हिना खानने तिच्या इन्स्टाग्रामवरील पोस्टमध्ये लिहिले, “सगळ्यांना माझा नमस्कार! सध्या माझ्याबद्दल आणि माझ्या तब्येतीबद्दल काही अफवा येत आहेत, त्याबद्दलच मला सांगायचे आहे. माझ्यावर प्रेम करणाऱ्या आणि माझी काळजी करणाऱ्या सर्वच लोकांना मला काहीतरी महत्त्वाचे सांगायचे आहे. मला तिसऱ्या टप्प्यातील स्तनांचा कर्करोग (ब्रेस्ट कॅन्सर) झाल्याचे निदान झाले आहे. मी या आजारावर मात करण्यासाठी पूर्णपणे तयार असून, माझे उपचार आधीच सुरू झाले आहेत. या आजारातून अधिक मजबूत आणि लवकर बरी होण्यासाठी मी शक्य तेवढे प्रयत्न करण्यास सज्ज आहे. या कठीण काळात कृपया माझ्या वैयक्तिक आयुष्याचा आदर करा. तुम्ही माझ्या या कठीण काळात आणि प्रवासात तुमचा पाठिंबा, सल्ले आणि अनुभव नक्कीच शेअर करू शकता.”

hina khan diagnosed cancer
hina khan diagnosed cancer

हे देखील वाचा : जाणून घ्या एव्हरग्रीन जोडी असणाऱ्या अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांची लव्हस्टोरी

हिनाच्या या पोस्टवर अनेक कलाकारांनी कमेंट्स करत तिला ती लवकर बरी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. यासोबतच अनेकांनी तिच्याबद्दल काळजी देखील व्यक्त केली असून, तिला नेहमी अपडेट देण्याची विनंती केली आहे. एप्रिलमध्ये हिनाने सोशल मीडियावर तिला गंभीर आरोग्य समस्या असल्याचे सांगितले होते. पण तेव्हा तिने तिला कॅन्सर असल्याचे सांगितले नव्हते.

दरम्यान हिना ही मनोरंजनविश्वातील अतिशय लोकप्रिय आणि प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने अनेक मालिकांमध्ये काम केले असून, बिग बॉस, खतरो के खिलाडी शोमध्ये देखील तिने सहभाग घेतला होता. शिवाय ती काही बॉलिवूड चित्रपटांमध्ये देखील झळकली आहे. हिनाने कान्स चित्रपट महोत्सवात देखील उपस्थिती लावली होती.

Recent Posts

Related Articles

Sulakshana Pandit
मनोरंजन

Sulakshana Pandit : अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचे निधन, ‘या’ अभिनेत्यासाठी राहिल्या आजन्म अविवाहित

ऑक्टोबर महिन्यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी आपला निरोप घेतला. हा सिलसिला नोव्हेंबरमध्ये देखील...

Cricket
क्रीडामनोरंजन

Cricket : कोण आहे स्टार क्रिकेटपटू स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छल?

भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला आणि सगळीकडे एकच जल्लोष झाला. आधी...

Tejaswini Lonari
मनोरंजन

Tejaswini Lonari : अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने गुपचूप उरकला साखरपुडा; बड्या नेत्याची होणार सून

सध्या मराठी मनोरंजनविश्वामधे लग्नसराईचे दिन आल्याचे चित्र आहे. अनेक मराठी कलाकार साखरपुडा...

Asarani
मनोरंजन

Asarani : दिग्गज हिंदी चित्रपट अभिनेते असरानी यांचे दुःखद निधन

हिंदी सिनेमात असे खूप कमी कलाकार होऊन गेले किंवा आहेत ज्यांचे केवळ...