Home गाजावाजा Transgender Journey : आर्यन ते अनाया बांगर स्त्री बनण्याचा प्रवास!
गाजावाजासामाजिक

Transgender Journey : आर्यन ते अनाया बांगर स्त्री बनण्याचा प्रवास!

8
Transgender Journey | Top Stories

“मला अजूनही क्रिकेट खेळण्याची इच्छा आहे. मी एवढी वर्षं क्रिकेट खेळले आहे, माझ्या बाबांना खेळताना पाहिलं आहे, माझ्या रक्तात क्रिकेट आहे. कधी ते माहिती नाही, पण देशासाठी खेळायचं आहे.” हे शब्द आहेत माजी क्रिकेटपटू आणि RCB तसेच पंजाबचे X कोच संजय बांगर यांची मुलगी अनाया संजय बांगर हिचे ! अनाया जी पूर्वी आर्यन म्हणून जगत होती. खरं तर आपलं नाव आणि आपल जेंडर आपल्याला जन्मासोबतच मिळतं. पण काहीजणांसाठी त्यांची ती ओळख खरी ओळख नसते. अशा वेळी स्वतःला स्वीकारणं खूप कठीण असतं. आणि तेव्हा स्वतःचं अस्तित्व स्वीकारण्यासाठी धाडससुद्धा दाखवावं लागतं. आर्यनने ते धाडस दाखवलं आणि आता ट्रान्सवूमन असलेली अनाया बांगर क्रिकेटमध्ये ट्रान्स महिलांच्या प्रतिनिधित्वाचा मुद्दा मांडतेय ! तिच्या या संपूर्ण प्रवासाविषयी जाणून घेऊ.(Transgender Journey)

मुंबईच्या क्रिकेटच्या मैदानावर आर्यन भारतासाठी खेळायचं स्वप्न पाहायचा. तो एक हुशार left hand बॅट्समन आणि स्पिनर होता. तो एक जबरदस्त लेफ्ट-हँड बॅट्समन आणि स्पिनर होता. इस्लाम जिमखाना, मुंबईच्या लोकल क्लबसाठी खेळताना त्यानं अनेक रन्स काढले. पण त्याच्या मनात काहीतरी खदखदत होतं. त्याचं शरीर आणि मन यांच्यात काहीतरी गडबड होती, ज्यामुळे मैदानावरही तो अस्वस्थ असायचा. जानेवारी २०२२ मध्ये त्याला खरं काय ते कळलं. त्यानं ठरवलं, आता लिंग बदलून स्त्री म्हणून जगायचं! आणि इथूनच सुरू झाला आर्यनचा अनाया बांगर बनण्याचा प्रवास! (Latest Marathi News)

Transgender Journey

जेव्हा आर्यन आठ-नऊ वर्षांचा होता, तेव्हा त्याला ला या गोष्टीची हळूहळू जाणवायला लागलं. पण हे सत्य स्वीकारायला त्याला बराच वेळ गेला. लॉकडाऊनच्या काळात जेव्हा तो 20-21 वर्षांचा असताना त्याला त्याची जेंडर आयडेंटीटी समजली, जी त्याने इतकी वर्ष दाबून ठेवली होती. मग शेवटी त्याने युकेमध्ये जायचा निर्णय घेतला. तिथल्या क्लब्जमध्ये खेळायचं, मास्टर्स डिग्री मिळवायची, शिक्षण घ्यायचं आणि सामान्य आयुष्य जगायचा प्रयत्न करायचा, असं त्यानं ठरवलं. तिथे तो मोकळेपणाने स्वतःला व्यक्त करू शकला, त्याच्या आवडीचे कपडे घालू शकला. आणि मग आर्यनने २०२३ मध्ये हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी HRT सुरू केली. ही एक मेडिकल ट्रीटमेंट आहे, ज्यात हॉर्मोन्सच्या मदतीनं शरीरातले बदल घडवले जातात. खासकरून ट्रान्सजेंडर लोकांसाठी याचा वापर होतो, जेणेकरून त्यांचं शरीर त्यांच्या जेंडर आयडेंटिटीनुसार जुळवता येतं.(Marathi News)

उदाहरणार्थ, ट्रान्सवुमनसाठी इस्ट्रोजेन आणि इतर हॉर्मोन्स दिले जातात, ज्यामुळे त्यांचं शरीर हळूहळू स्त्रीलिंगी वैशिष्ट्यं दाखवायला लागतं.यामुळे शरीरातली ताकद, त्वचा, आवाज यासारख्या गोष्टी बदलतात. या थेरपीमुळे आर्यनच्या शरीरात मोठे बदल झाले स्नायूंची ताकद कमी झाली, क्रिकेटसाठी लागणारी शारीरिक क्षमता कमी होत गेली. या थेरपी नंतर तिने स्वत:साठी नाव निवडलं अनाया… पण ज्या खेळावर तिचं प्रेम होतं, तोच खेळ आता तिच्यासाठी दूर होत होता. कारण गेल्या वर्षी आयसीसीनं आणि काही महिन्यांपूर्वी इंग्लंड क्रिकेट बोर्डानं म्हणजे ईसीबीनं ट्रान्स महिलांना महिलांच्या क्रिकेटमध्ये खेळण्यावर बंदी घातली. यामुळे अनायाला आपलं क्रिकेटचं स्वप्न सोडावं लागलं. पण तिने हार मानली नाही. पुढे भारतात परत आल्यानंतर अनायाला परत तेच अनुभव आले.

सोशल मीडियावर तिच्या Harmonal Transformation वरून अनेकांनी तिची थट्टा केली. एका Interview मध्ये अनायाने सांगितलं की काही क्रिकेटपटूंनी तिला न्यूड फोटो पाठवले, तिला अश्लील मेसेज केले या सगळ्यामुळे तिला मानसिक त्रास झाला, पण ति या ट्रोलिंगला हिमतीनं सामोरं गेली. तिने आपल्या इन्स्टाग्रामवर आपला एक व्हिडिओ शेअर केला ज्यात तिचा संपूर्ण प्रवास होता , यावर काहींनी तिचं कौतुक केलं, तर काहींनी तिच्यावर टीका केली. पण अनायाने ठरवलं की, माझं सत्य सर्वांसमोर आणायचचं! (Transgender Journey)

=============

हे देखील वाचा : Raja Shivaji : रितेश देशमुखचा बहुप्रतीक्षित ‘राजा शिवाजी’ ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित 

=============

अनायासारखे अनेक जण सध्या Hormonal Transformation करून घेत आहेत. लिंग बदलणाऱ्या व्यक्तींची संख्या भारतात आणि जगभरात वाढतेय. २०२३ च्या एका रिपोर्टनुसार, भारतात दरवर्षी सुमारे १,००० ते १,५०० व्यक्ती लिंग बदलण्याची प्रक्रिया करतात, पण याची खरी संख्या यापेक्षा जास्त असू शकते, कारण अनेकजण याबाबत उघडपणे बोलत नाहीत. समाजात अजूनही ट्रान्सजेंडर व्यक्तींना स्वीकारण्याची मानसिकता नाही. अनेकांना त्यांच्या कुटुंबाकडून, मित्रमंडळींकडून, आणि समाजाकडून नकार आणि अपमान सहन करावा लागतो. ट्रान्सजेंडर व्यक्तींना नोकरी, शिक्षण, आणि समाजात मान मिळवण्यासाठी त्यांना खूप झगडावं लागतं. तरीही, काही ठिकाणी बदल दिसतोय. आता अनायाचंच बाबतीतच बघितलं तर तिच्या लहान भावाने तिला त्याची बहीण म्हणून स्वीकारलंय. (Latest Marathi News)

अनायाचा प्रवास हा केवळ लिंग बदलण्याचा नाही, तर स्वतःला स्वीकारण्याचा आणि समाजाच्या दबावाला न घाबरता आपलं सत्य जगण्याचा आहे. ती सध्या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे, आणि तिच्या अनुभवातून इतरांना प्रेरणा देतेय. ती म्हणते, “मला क्रिकेट खेळायचं होतं, पण आता मी माझ्या आयुष्याचं नवं मैदान शोधलं आहे.” अनाया सारखं आपण आपली खरी ओळख ओळखून ती जपली पाहिजे. त्यामुळे स्वतःवर प्रेम करा, स्वतःला स्वीकारा, मग जग आपोआप तुम्हाला स्वीकारेल.

Recent Posts

Related Articles

Johran Mamdani
आंतरराष्ट्रीयगाजावाजा

Johran Mamdani : ममदानींचा मागचा चेहरा…रामा दुवाजी !

न्यू यॉर्कचे नवे महापौर जोहरान ममदानी यांच्या विजयामागे असलेला खरा चेहरा त्यांच्या...

Pak Vs Afghan
आंतरराष्ट्रीयगाजावाजा

Pak Vs Afghan : ग्रेटर अफगाणिस्तानच्या नकाशामुळे पाकिस्तानमध्ये पळापळ !

अफगाणिस्तान आणि पाकिस्तामधील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. आता या तणावात आणखी भर...

Devark Mandir
सामाजिक

Devark Mandir : या सूर्यमंदिरापुढे औरंगजेबानंही मानली हार !

देशभर सध्या छटपूजा उत्साहात सुरु आहे. छठ पूजेचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे...

Prince Andrew
आंतरराष्ट्रीयगाजावाजा

Prince Andrew : एक राजकुमार अखेर जमिनीवर आला !

ब्रिटीश राजे चार्ल्स तिसरे यांचे धाकटे भाऊ प्रिन्स अँड्र्यू यांना अखेर जमिनीवर...