Home मनोरंजन Dasavi Trailer: अभिषेक बच्चनचा ‘दसवी’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
मनोरंजन

Dasavi Trailer: अभिषेक बच्चनचा ‘दसवी’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

9
'दसवी'

अभिषेक बच्चन पुन्हा एकदा ओटीटीवर धूम ठोकण्यासाठी सज्ज झाला आहे. अभिषेक बच्चनचा ‘दसवी’ हा चित्रपट लवकरच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे आणि आज म्हणजेच २३ मार्च रोजी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अभिषेक बच्चनशिवाय यामी गौतम आणि निम्रत कौर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

आज म्हणजेच बुधवारी अभिषेक बच्चनने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. ट्रेलर व्हिडिओबद्दल सांगायचे तर, चित्रपटात तुम्हाला अभिषेक बच्चनचा जबरदस्त अवतार पाहायला मिळेल.

या चित्रपटाची कथा गंगाराम चौधरी नावाच्या मुख्यमंत्र्यांची आहे. तो आठवीच्या वर्गात शाळा सोडतो आणि नंतर भ्रष्ट राजकारणी बनतो. त्याच्या भ्रष्ट वागणुकीमुळे तो तुरुंगात पोहोचतो आणि त्यानंतर त्याची जागा पत्नी सांभाळते.

Abhishek Bachchan wraps up Agra schedule of upcoming film Dasvi |  Celebrities News – India TV

=====

हे देखील वाचा: जॉन अब्राहम दिसणार फुल ऑन अॅक्शन मध्ये, भारताचा पहिला ‘सुपर सोल्जर’ चित्रपट

====

या चित्रपटात अभिषेकच्या पत्नीची भूमिका निम्रत कौरने केली आहे. तुरुंगात गेल्यावर तिथे त्याला सीएमचा दर्जा दाखवण्याची संधी मिळत नाही, कारण तिथे कडक जेलर असतो.

यामी गौतमला तुम्ही या चित्रपटात कठोर जेलरच्या भूमिकेत पाहू शकता. तुरुंगात गेल्यावर गंगारामला समजले की अभ्यासाशिवाय आपले आयुष्य अपूर्ण आहे आणि तो तुरुंगातूनच आपला अभ्यास पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. त्याला दहावी उत्तीर्ण व्हायचे आहे, पण जेलर यामी गौतम त्याच्या मार्गात येते.

गंगाराम दहावी पास होऊ शकतो की नाही, हे आता हा चित्रपट पाहिल्यानंतरच कळेल. मात्र, दहावी उत्तीर्ण होण्याच्या गंगारामच्या प्रयत्नांमध्ये प्रेक्षकांना चांगल काहीतरी पाहायला मिळणार, हे निश्चित. कॉमेडीसोबतच हा चित्रपट सामाजिक संदेशही देतो.

====

हे देखीील वाचा: विजय थलपथी यांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, ‘बीस्ट’ चित्रपट ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

====

अभिषेक बच्चन स्टारर या चित्रपटाच्या ट्रेलरला त्याचे चाहते खूप सकारात्मक प्रतिक्रिया देत आहेत. या चित्रपटाची निर्मिती दिनेश विजन यांनी केली आहे, तर तुषार जलोटा यांनी दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवरून ७ एप्रिलपासून प्रसारित होणार आहे.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Sulakshana Pandit
मनोरंजन

Sulakshana Pandit : अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचे निधन, ‘या’ अभिनेत्यासाठी राहिल्या आजन्म अविवाहित

ऑक्टोबर महिन्यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी आपला निरोप घेतला. हा सिलसिला नोव्हेंबरमध्ये देखील...

Cricket
क्रीडामनोरंजन

Cricket : कोण आहे स्टार क्रिकेटपटू स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छल?

भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला आणि सगळीकडे एकच जल्लोष झाला. आधी...

Tejaswini Lonari
मनोरंजन

Tejaswini Lonari : अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने गुपचूप उरकला साखरपुडा; बड्या नेत्याची होणार सून

सध्या मराठी मनोरंजनविश्वामधे लग्नसराईचे दिन आल्याचे चित्र आहे. अनेक मराठी कलाकार साखरपुडा...

Asarani
मनोरंजन

Asarani : दिग्गज हिंदी चित्रपट अभिनेते असरानी यांचे दुःखद निधन

हिंदी सिनेमात असे खूप कमी कलाकार होऊन गेले किंवा आहेत ज्यांचे केवळ...