Tips to reduce stress तणाव सध्या प्रत्येकाच्या आयुष्याचा एक महत्वाचा हिस्सा बनला आहे. वाढत्या वयासह जबाबदाऱ्या आणि व्यस्त लाइफस्टाइलसह भविष्यातील चिंतेमुळे तणाव अधिक वाढला जातो. तणावामुळे व्यक्तीचे आयुष्य जगणे मुश्किल होतेच. पण व्यक्तीच्या मानसिक आणि शारिरीक आरोग्यावरही मोठा प्रभाव पडला जातो. एवढेच नव्हे तणावामुळे व्यक्तीच्या मागे काही आजार लागतात. अशातच यंदाच्या वर्षात स्ट्रेस फ्री राहण्यासाठी कोणत्या गोष्टी फॉलो कराव्यात याबद्दल पुढे जाणून घेऊया…
दररोज योगा आणि मेडिटेशन करा
स्वत:ला शारिरीक आणि मानसिक रुपात स्ट्रेस फ्री ठेवण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे योगा आणि मेडिटेशन करणे. दररोज सकाळी 10-15 मिनिटे योगा किंवा मेडिटेशन करावे. यामुळे शरिरातील विषाक्त पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते. मेडिटेशनमुळे मानसिक आरोग्य हेल्दी राहते. नकारात्मक विचार दूर राहतात.
अशी करा मेडिटेशन किंवा योगाची सुरुवात
-सुरुवातीला 10 मिनिटे मेडिटेशनसाठी द्या
-मेडिटेशनवेळी मोबाइल किंवा अन्य इलेक्ट्रिक गॅजेट्सपासून दूर रहा.
-हळूहळू मेडिटेशनसाठी वेळ वाढवा आणि दीर्घ श्वासावर लक्ष क्रेंदित करा.

हेल्दी डाएट फॉलो करा
बहुतांश रिसर्चमधून समोर आले आहे की, हेल्दी डाएटमुळे मानसिक आरोग्य सुधारले जाते. याशिवाय व्यक्ती तणावापासून दूर राहू शकतो. जंक फूड, केल आणि मसालेदार पदार्थांमुळे तणाव अधिक वाढला जाऊ शकतो. ताज्या भाज्या, फळे किंवा नट्सच्या सेवनाने तणाव कमी होतो. हिरव्या पालेभाज्या आणि फळांमध्ये काही प्रकारचे व्हिटॅमिन आणि मिनिरल्स असतात, जे तणावापासून दूर ठेवण्यास मदत करतात. याशिवाय चहा ऐवजी ग्रीन टी किंवा हर्बल टी चे सेवन करावे.
हाइड्रेट रहा
शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे तणाव वाढला जाऊ शकतो. खरंतर, कमी प्रमाणात पाणी प्यायल्याने पचनासंबंधित समस्या वाढतात. याचा थेट परिणाम मानसिक आरोग्यावरही होतो. यामुळे तणाव कमी करण्यासाठी दररोज कमीतकमी 3 लीटर पाणी प्यावे.
=======================================================================================================
आणखी वाचा :
Black Raisins : काळ्या मनुका नियमित खाल्ल्याने शरीराला होतील अनेक मोठे फायदे
Thyroid ‘ही’ लक्षणे दिसताय सावधान ! कदाचित तुम्हाला थायरॉईड असू शकतो…
=======================================================================================================
वेळेचे नियोजन करा
बहुतांश वर्किंग व्यक्तींमध्ये तणावाची स्थिती दिसून येते. यामागील मुख्य कारण म्हणजे वेळेची कमतरता किंवा वेळेवर काम पूर्ण न होणे. या समस्येपासून दूर राहण्यासाठी दिवसाच्या सुरुवातीलाच कामाचे योग्य शेड्यूल तयार करा. जे काम महत्वाचे आहे ते प्रथम पूर्ण करा. तणावापासून दूर राहण्यासाठी मल्टीटास्क करू नका. एकावेळी एकाच कामावर लक्ष केंद्रीत करा. (Tips to reduce stress)
डिजिटल डिटॉक्स महत्वाचे
मोबाईल आणि सोशल मीडियाचा अत्याधिक वापर करणेही तणावाचे एक ठरू शकते. यामुळे यंदाच्या वर्षात स्ट्रेस फ्री रहायचे असल्यास स्वत: ला प्रथम डिजिटल रुपात डिटॉक्स करा. दिवसभरातील काही वेळ मोबाइल, लॅपटॉप किंवा अन्य डिजिटल प्रोडक्ट्सपासून दूर घालवा. झोपण्याच्या दोन तास आधी मोबाईल, टीव्ही पाहणे टाळा.