Home मनोरंजन नीता अंबानींची वहिनी एकेकाळी होती बॉलिवूडमधील अभिनेत्री, नेटवर्थ ऐकून बसेल धक्का
मनोरंजन

नीता अंबानींची वहिनी एकेकाळी होती बॉलिवूडमधील अभिनेत्री, नेटवर्थ ऐकून बसेल धक्का

9

Tina Ambani Net Worth : बॉलिवूडमधील काही अभिनेत्री अशा आहेत ज्यांनी मोठ्या कलाकारांसोबत काम केले. पण नंतर आयुष्यात अभिनयाला रामराम केला. अशीच एक अभिनेत्री राहिलेल्या मुकेश अंबानी यांचे धाकटे भाऊ अनिल अंबानी यांची पत्नी टीना मुनीम आहेत. टीना यांनी फिल्म इंडस्ट्रीमध्ये दीर्घकाळ काम केले. पण त्यानंतर फिल्म इंडस्ट्री सोडले. आता टीना अंबानी सामाजिक कार्ये करताना दिसून येतात. याची माहिती सोशल मीडियावरही टीना अंबानी शेअर करत राहतात. खरंतर, टीना अंबानींनी अभिनय जरी सोडला असला तरीही त्यांचे नेट वर्थ मजबूत आहे.

टीना अंबानी यांनी बॉलिवूडमधील सिनेमा देस परसेदमधून पदार्पण केले होते. टीना यांनी फिल्म इंडस्ट्रीमध्ये 13 वर्षे काम केले. याशिवाय टीना अंबानी यांना टीन प्रिंसेसचा पुरस्कारही मिळाला होता. राजेश खन्ना, संजय दत्त, ऋषी कपूर यांच्यासह अनेक कलाकारांसोबतही टीना यांनी काम केले होते.

नेटवर्थ किती
जिक्यू इंडियाच्या रिपोर्ट्सनुसार, टीना अंबानींचे नेट वर्थ 2331 कोटी रुपये आहे. त्यांच्याकडे कोट्यावधी रुपयांची संपत्ती आहे. टीना यांचे घर अत्यंत आलिशान आहे. त्या 17 व्या मजल्यावर रात असून त्याचे नाव एबोड आहे. या घराची किंमत कोट्यावधी रुपये आहे. रिपोर्ट्सनुसार, टीना यांचे एक प्रायव्हेट जेटही आहे. याशिवाय रोल्स रॉयस फँटम, ऑडी क्यू आणि मर्सिडीज अशा आलिशान कारही आहेत. (Tina Ambani Net Worth)

सध्या काय करतात टीना अंबानी 
सध्या टीना अंबानी अभिनय सोडून सामाजिक काम करतात. त्यांची वयोवृद्धांसाठी एक संघटनाही आहे. याशिवाय त्या कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयाच्या अध्यक्षाही आहेत.


आणखी वाचा :
लोकांच्या घरी धुणी-भांडी करणारी ही महिला झाली बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्री
तब्बूने जॅकी श्रॉफसोबत एकत्रित काम का केले नाहीये? जाणून घ्या कारण

Recent Posts

Related Articles

Sulakshana Pandit
मनोरंजन

Sulakshana Pandit : अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचे निधन, ‘या’ अभिनेत्यासाठी राहिल्या आजन्म अविवाहित

ऑक्टोबर महिन्यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी आपला निरोप घेतला. हा सिलसिला नोव्हेंबरमध्ये देखील...

Cricket
क्रीडामनोरंजन

Cricket : कोण आहे स्टार क्रिकेटपटू स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छल?

भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला आणि सगळीकडे एकच जल्लोष झाला. आधी...

Tejaswini Lonari
मनोरंजन

Tejaswini Lonari : अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने गुपचूप उरकला साखरपुडा; बड्या नेत्याची होणार सून

सध्या मराठी मनोरंजनविश्वामधे लग्नसराईचे दिन आल्याचे चित्र आहे. अनेक मराठी कलाकार साखरपुडा...

Asarani
मनोरंजन

Asarani : दिग्गज हिंदी चित्रपट अभिनेते असरानी यांचे दुःखद निधन

हिंदी सिनेमात असे खूप कमी कलाकार होऊन गेले किंवा आहेत ज्यांचे केवळ...