Home प्रेस रिलीझ टाइमपास ३ चा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला
प्रेस रिलीझ

टाइमपास ३ चा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला

10
Timepass 3

हम गरीब हुए तो क्या हुआ ! चला, हवा येऊ द्या ! नया है वह! आई बाबा आणि साईबाबाची शपथ यासारख्या हिट संवादांनी नटलेला, दगडू – प्राजू, कोंबडा, मलेरिया, बालभारती, शाकाल उर्फ माधव लेले अशा अतरंगी पात्रांनी सजलेला आणि मला वेड लागले प्रेमाचे, फुलपाखरू, ही पोली साजूक तुपातली सारख्या गाण्यांनी धमाल उडवून देणारा चित्रपट म्हणजे टाइमपास ! झी स्टुडिओजची निर्मिती आणि रवी जाधव यांच्या दिग्दर्शनाने सजलेले टाइमपास आणि टाइमपास २ हे दोन्ही चित्रपट कमालीचे लोकप्रिय ठरले. टाइमपासमध्ये अधुऱ्या राहिलेल्या प्रेमाची गोष्ट टाइमपास २ मध्ये पूर्ण झाली. आता या चित्रपटाचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

टाइमपास ३ (Timepass 3) ची ही गोष्ट दगडू-प्राजुच्या लग्नानंतरची नाहीये तर त्या आधीची आहे म्हणजे कुमारवयातल्या दगडूची ! आणि या कथेत आला आहे नवा ट्विस्ट ज्याचं नाव आहे ‘ पालवी दिनकर पाटील’ ! टाइमपास ३ च्या टिझरच्या केंद्रस्थानी आहे ही डॅशिंग पालवी ! जी साकारली आहे लोकप्रिय अभिनेत्री हृता दुर्गुळे हिने. याशिवाय प्रथमेश परबचा दगडू आणि वैभव मांगले यांचा माधव लेले उर्फ शाकाल हे पात्र या टिझरमध्ये दिसत आहेत.

आता ही नेमकी गोष्ट काय असणार आहे ? ही पालवी कोण आहे ? चित्रपटात प्राजू दिसणार की नाही ? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडतील पण त्याची उत्तरे हळूहळू मिळतच जातील. तूर्तास तिसऱ्या भागाच्या या टिझरने उत्सुकता वाढवली आहे हे निश्चित !

====

हे देखील वाचा: ‘प्लॅनेट मराठी शॉर्ट फिल्म फेस्टिवल’मध्ये ‘अर्जुन’ अव्वल

====

झी स्टुडिओज आणि अथांश कम्युनिकेशन्सची निर्मिती असलेल्या टाइमपास ३ चे दिग्दर्शन रवी जाधव यांचे आहे. येत्या २९ जुलैला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Mohanlal
प्रेस रिलीझ

Mohanlal : मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांना ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ जाहीर

नुकताच दादासाहेब फाळके पुरस्काराची घोषणा करण्यात आली. यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जेष्ठ...

Ghibli
प्रेस रिलीझलाईफ स्टाईलव्यक्ती विशेष

Ghibli : घिबली आर्ट म्हणजे काय? कोण आहे Ghibli ॲनिमेशनचे जनक?

सध्या सोशल मीडिया उघडल्या उघडल्या आपले स्वागत करतात ते आपल्याच लोकांचे अतिशय...

Vijay Sethupathi
प्रेस रिलीझ

शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटात ‘या’ अभिनेत्याची होणार खास एन्ट्री

बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानने (Shah Rukh Khan) 2023 मध्ये आपले नाव कोरले...

Vitthala Tuch
प्रेस रिलीझ

प्रेमाचा आविष्कार घेऊन ‘विठ्ठला तूच’ चित्रपट लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीस

विठ्ठला तूच हे ऐकताच आपल्याला आठवण येते ती आपल्या भगवान विठ्ठलाची. सर्वांच्या...