Home आरोग्य दह्यासोबत चुकूनही खाऊ नका ह्या 5 गोष्टी, बिघडेल आरोग्य
आरोग्य

दह्यासोबत चुकूनही खाऊ नका ह्या 5 गोष्टी, बिघडेल आरोग्य

9
Curd Benefits

Things to avoid with curd : दही हे आपल्या अन्न प्रणालीतले महत्वाचा घटक आहे. हे फक्त चवच नव्हे तर आरोग्यसाठी सुद्धा उत्तम आहे. विशेष म्हणजे उन्हाळ्यात दही खाल्याने शरीराला थंडावा मिळतो. याशिवाय रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होणे, हाडांना बळकटी मिळणे, वजन कमी करण्यासाठी दह्याचे सेवन करणे फायदेशीर ठरू शकते. पण दह्यासोबत काही गोष्टींचे सेवन करणे टाळावे. अन्यथा आरोग्यासंबंधित काही समस्या उद्भवू शकतात. याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया.

फळं
फळांसोबत बहुतांशजण दह्याचे सेवन करतात. खासकरुन, संत्री, अननस किंवा द्राक्ष अशा आंबट फळांसोबत दह्याचे सेवन करणे टाळावे. यामुळे पचनक्रियेसंबंधित समस्या उद्भवू शकता. आयुर्वेदानुसार, फळांसोबत दह्याचे सेवन केल्याने अपचनाचा त्रास होऊ शकतो. अशातच पोटदुखी, पोटफुगणे किंवा पोटात गॅस होणे या समस्या होऊ शकतात.

Health Benefits of Curd

आंबट आणि मसालेदार पदार्थ
दही आंबट आणि मसालेदार पदार्थांसोबत खाणे टाळावे. या पदार्थांमुळे शरीरात उष्णता वाढली जाते. पण दही शरीराला थंडावा देते. दोन विरुद्ध गोष्टींचे एकत्रित सेवन केल्याने पचनक्रिया बिघडली जाते. अशातच पोटदुखी, पोटात जळजळ होणे अशा समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

माशांसोबत दह्याचे सेवन टाळा
आयुर्वेदानुसार, दही आणि मासे एकत्रित खाणे टाळावे. या दोन्ही गोष्टींमध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात असले तरीही पचनक्रियेवर याचा परिणाम होऊ शकतो. यामुळे आरोग्य बिघडण्यासह पोटासंबंधित समस्या होऊ शकतात.

======================================================================================================

हेही वाचा : 

आंब्यांच्या पानांचे सेवन केल्यास मिळतील हे 5 फायदे

घरच्या घरी बनवा आवळ्याचा फेस टोनर, त्वचेला येईल ग्लो

=======================================================================================================

अंडी
अंडी आणि दही प्रोटीनचा उत्तम स्रोत आहेत. पण या दोन्ही गोष्टींचे एकत्रित सेवन केल्याने पचनक्रिया बिघडली जाते. ज्यावेळेस दोन उच्च प्रोटीनयुक्त पदार्थांचे सेवन एकत्रित केले जाते तेव्हा पचनक्रिया मंदावली जाते. खाल्लेले अन्नपदार्थ पचण्यास वेळ लागतो. अशातच पोटदुखी, अपचन अशा समस्या होण्याची शक्यता वाढली जाते.(Things to avoid with curd)

टोमॅटो
टोमॅटो आणि दह्याचे सेवन करणे आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकते.. टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी असते आणि दह्यामधील पोषण तत्त्वांसोबत त्याची प्रक्रिया झाल्यास पोटासंबंधित विकार होण्याची शक्यता वाढली जाते.

Recent Posts

Related Articles

Hair Care
आरोग्य

Hair Care : ‘हे’ उपाय करून घरच्या घरी पांढऱ्या केसांना करा काळे

आजच्या काळात चुकीच्या जीवन शैलीमुळे मनुष्याचे संपूर्ण दैनंदिन जीवनच बिघडून गेले आहे....

Health
आरोग्य

Health : ‘हे’ सोपे उपाय करा आणि हिवाळ्यात ओठांना कोरडे होण्यापासून वाचवा

हिवाळा म्हणजे सर्वांचाच आवडता ऋतू. छान गुलाबी थंडीमध्ये व्यायाम करायला, काम करायला...

Skin Care | Bollywood Life
आरोग्य

Skin Care : प्रायव्हेट पार्टवरील काळेपणा दूर करायचा…? मग करा ‘हे’ सोपे उपाय

आपल्या सर्वांनाच आपल्या शरीराची, आपल्या दिसण्याची खूपच काळजी असते. कमी अधिक प्रमाणात...

Health
आरोग्य

Health : नियमित पेरू खाल्ल्याने होतील अनेक आश्चर्यकारक फायदे

फळं खाणे नेहमीच आपल्या आरोग्याच्या दृष्टीने लाभदायक मानले गेले आहे. अनेकदा तर...