Home लाईफ स्टाईल Financial Growth : घरात ‘ही’ झाडं लावा आणि आर्थिक सुबकता आणा
लाईफ स्टाईल

Financial Growth : घरात ‘ही’ झाडं लावा आणि आर्थिक सुबकता आणा

11
Financial Growth

झाडं आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे. या झाडांमुळेच आपण आहोत असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. पृथ्वीवर मनुष्याचे अस्तित्व असण्यामागे केवळ झाडांचा हात आहे. आपल्याला जगण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्वच मूलभूत गरजा झाडं पूर्ण करतात. अगदी जेवणापासून ते पाणी, निवारा, वस्त्र आदींपर्यंत सर्वच वस्तू आपल्याला झाडांपासून मिळतात. अशी ही झाडं प्रत्येकाने लावलीच पाहिजे. झाडं केवळ निसर्गाचाच समतोल राखतात असे नाही तर ही झाडं आपल्या घराचा देखील समतोल राखतात आणि घरात भरभराट देखील आणतात. (Financial Growth)

घरामध्ये झाडं लावणे म्हणजे केवळ घराला सुशोभित करणे नाही. तर घरात झाडं लावण्याचे अनेक चांगले आणि सकारात्मक परिणाम आपल्यावर होत असतात. घरात झाडं लावल्याने सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह तर वाढतोच शिवाय सुख-समृद्धीही कायम राहते. आपल्या वास्तुशास्त्रामध्ये तर घरात झाडं लावण्याला मोठे महत्व दिले आहे. काही झाडं आपण घरात लावली तर आपल्या आर्थिक परिस्थितीवरही त्याचा सकारात्मक परिणाम होतो. (Marathi News)

घरातील उर्जेचं संतुलन कसं आहे, याचा आपल्या आरोग्यवर, संपत्तीवर आणि सुख-शांतीवर थेट परिणाम होतो. घरात लावलेल्या रोपांचा देखील आपल्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पडतो, असं वास्तुशास्त्रामध्ये नमूद केले आहे. ही रोपं केवळ घराचं सौंदर्य वाढवत नाहीत, तर नकारात्मक ऊर्जा दूर करून सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. काही विशिष्ट रोपं तर घरातील आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी उपयुक्त ठरतात, असं मानलं जातं. त्यामुळेच, योग्य प्रकारची रोपं घरात ठेवणं अत्यंत महत्त्वाचं ठरतं. (Top Stories)

Financial Growth

हिंदू धर्मानुसार माता लक्ष्मी आणि कुबेर यांना धनाची देवता मानण्यात आलं आहे. वास्तु शास्त्रामध्ये अशा काही वनस्पती सांगितल्या आहेत, त्या जर तुमच्या घरात असतील तर तुमच्यावर सदैव माता लक्ष्मी आणि कुबेर यांची कृपा राहाते आणि तुमच्या घरामध्ये कधीही पैशांची कमतरता भासत नाही. तुमचं घर सदैव सकारात्मक ऊर्जेनं भरलेलं राहातं. या लेखात आपण अशा काही विशिष्ट रोपांबद्दल जाणून घेणार आहोत, जी घरात ठेवल्याने आर्थिक समस्या कमी होतात, समृद्धी वाढते. (Marathi Top News)

तुळस
हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाला लक्ष्मी मातेचे रूप मानले जाते. असे मानले जाते की, तुळशीचे रोप लावल्याने आणि दररोज दिवा लावल्याने आर्थिक स्थिती सुधारते. हिंदू धर्मातील सर्व लोक हे रोप आपल्या घरात नक्कीच लावतात आणि त्याची पूजा करतात. हे रोप लावण्यासाठी सर्वोत्तम दिशा उत्तरेकडे मानली जाते. यामुळे तुमच्या घरात सुख शांती आणि समृद्धी राहते.

Financial Growth

केळीचे रोप
पैशाच्या बाबतीत स्थिरता राखण्यासाठी केळीचे रोप लावावे. घरात केळीचे रोप लावल्याने सुख-समृद्धी टिकून राहते आणि प्रगती होते. केळीचे रोप उत्तर दिशेला लावणे देखील खूप शुभ मानले जाते. हे रोप लावल्यानंतर त्याचीही रोज पूजा करावी. असे केल्याने तुम्हाला भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळतो आणि तुमच्या घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही. (Marathi Top News)

Financial Growth

बांबू प्लांट
बांबूचे झाड घरासाठी खूप शुभ मानले जाते. बांबूचे झाड पूर्व दिशेला लावल्याने घरात सुख-समृद्धी टिकून राहते आणि सकारात्मक ऊर्जा पसरते. वास्तु आणि फेंगशुईमध्ये बांबू वनस्पती खूप शुभ मानली जाते. ही वनस्पती काचेच्या भांड्यात देखील ठेवू शकता. मधेच झाड खराब झाल्यास ते बदलून घ्या. लक्षात ठेवा की वाळलेली किंवा सुकलेली कोणतीही वनस्पती घरात ठेवू नये.

Financial Growth

मनी प्लांट
जर तुम्हाला आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत असेल, तर घरी मनी प्लांट आणा. मनी प्लांट खूप भाग्यवान मानला जातो. मनी प्लांट लावल्याने पैशाची समस्या दूर होते असे मानले जाते. ही वनस्पती चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षित करते. म्हणूनच मनी प्लांट हे रोप उत्तर दिशेला लावल्याने तुमच्या सुख-समृद्धीमध्ये वाढ होते. घरातील लोक पैसे वाचवण्यास सक्षम असतात. (Marathi Latest News)

Financial Growth

संत्र्याचे झाड
वास्तूनुसार संत्र्याची वनस्पती खूप खास मानली जाते. हे रोप लावल्याने तुमच्या घराचे सर्व प्रकारच्या वाईट नजरेपासून संरक्षण होते. हे रोप उत्तर दिशेला लावल्याने तुमच्या घरात सुख-समृद्धी वाढते आणि कुटुंबातील सर्व सदस्यांमध्ये परस्पर प्रेम वाढते.

Financial Growth

गोकर्ण
गोकर्ण फूल घरामध्ये वास्तु नियमानुसार लावावे, तर त्याचे उत्तम फायदे मिळतात. वास्तुशास्त्रानुसार गोकर्ण, उत्तर, ईशान्य दिशेला लावणे शुभ असते. घराच्या मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला हे झाड तुम्ही ठेवू शकता. गुरुवारी आणि शुक्रवारी चौघडिया मुहूर्तावर गोकर्णी लावणे खूप शुभ असते. यामुळे माता लक्ष्मी आणि भगवान कुबेर प्रसन्न राहतात आणि त्यांच्या कृपेने कुटुंबाची आर्थिक स्थिती मजबूत होते. (Marathi Top News)

Financial Growth

=========

हे देखील वाचा : Vitamin D : उन्हाळ्यात व्हिटॅमिन डी मिळवण्यासाठी खा हे पदार्थ, रहाल तंदुरुस्त

=========

स्नेक प्लांट
स्नेक प्लांट हे स्वच्छ वातावरण निर्माण करते आणि आरोग्यासाठी फायदेशीर असते. वास्तुशास्त्रानुसार, हे रोप हवेतील विषारी घटक शोषून घेतं आणि सकारात्मक ऊर्जा पसरवतं. स्नेक प्लांट घरातील संपत्ती वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतं. याला विशेषतः झोपण्याच्या खोलीत ठेवणं फायदेशीर मानलं जातं, कारण ते शांत झोपेसाठी देखील उपयोगी आहे. (Social Updates)

Financial Growth

लिंबाचे झाड
लिंबाच्या झाडाला घरात ठेवणं वास्तुशास्त्रानुसार खूप शुभ मानलं जातं. हे झाड तणाव कमी करतं आणि घरातील वातावरण प्रसन्न करतं. लिंबू झाड सकारात्मक ऊर्जा निर्माण करतं घराच्या मुख्य दरवाजाजवळ हे झाड ठेवल्यास ते आर्थिक उन्नती आणि सौख्यासाठी उपयुक्त ठरतं.

Financial Growth

(टीप : ही सर्व माहिती वाचक म्हणून आपल्यापर्यंत पोहचवत आहोत. कोणतेही उपाय करताना तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.)

Recent Posts

Related Articles

Tourism
लाईफ स्टाईल

Tourism : स्लीप टुरिझम म्हणजे काय? काय आहे हा नवा ट्रेंड?

प्रत्येक व्यक्तीच्या उत्तम आरोग्यासाठी सकस आहार, उत्तम व्यायाम जेवढा आवश्यक आहे, तेवढीच...

Chaturthi
लाईफ स्टाईल

Chaturthi : नोव्हेंबर महिन्यातील संकष्टी चतुर्थी कधी आहे? जाणून घ्या चतुर्थीचे महत्त्व आणि पूजाविधी

आपल्या सर्वांचे आराध्य दैवत म्हणजे गणपती. या गणेशाची आपण कायमच आराधना करत...

Lord Shiv
लाईफ स्टाईल

Lord Shiv : का महादेवाने सर्वेश्वर अवतार घेत केले भगवान नरसिंहाशी युद्ध?

भगवान शिव आणि भगवान विष्णू यांची एकत्र पूजा करण्याचा आणि आराधना करण्याचा...

Indian Sweets | Top Marathi Headlines
लाईफ स्टाईल

Indian Sweets : मिठाईवर लावल्या जाणाऱ्या सोने, चांदीच्या वर्खची रंजक माहिती

आपल्या देशामध्ये कोणताच लहान मोठा सण, समारंभ, पूजा मिठाईशिवाय पूर्ण होत नाही....