Home लाईफ स्टाईल fridge : ‘या’ गोष्टी फ्रिजमध्ये ठेवणे टाळा
लाईफ स्टाईल

fridge : ‘या’ गोष्टी फ्रिजमध्ये ठेवणे टाळा

13
fridge

आजच्या काळात प्रत्येक घरात फ्रिज असतेच. फ्रिजमध्ये आपण बराच काळ शिजवलेले अन्न आणि भाज्या फळं ताजी ठेऊ शकतो. मात्र हेच फ्रिज कालांतराने कपाट बनते. कारण हाताला जे लागेल ते या फ्रिजमध्ये ठेवले जाते. अनेकदा किंबहुना बऱ्याचदा गरज नसलेल्या गोष्टी देखील विनाकारण फ्रिजमध्ये ठेवल्या जातात. प्रत्येक गोष्ट फ्रिजमध्ये ठेवल्यानं ती ताजी राहते असा सर्वांचाच एक समज नव्हे गैरसमज आहे. त्यामुळे फ्रिजमध्ये गरजेच्याच वस्तू ठेवणे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने चांगले असते. मग फ्रिजमध्ये नक्की कोणत्या गोष्टी ठेवाव्या आणि कोणत्या ठेऊ नये. (Fridge)

fridge

> केळी फ्रिजमध्ये थंड तापमानात ठेवल्यास ती काळवंडते. केळी ही नैसर्गिकपद्धतीने पिकायला पाहिजे. थंड वातावरणात केळी काळी पडते आणि चवीला खराब लागते त्यामुळे चुकूनही केळी फ्रिज मध्ये ठेवू नये.

========

हे देखील वाचा : Juice : लोकप्रिय ABC ज्यूस म्हणजे काय? या ज्यूसचे फायदे कोणते?

========

fridge

> लसूण थंड वातावरणात राहू शकत नाही. फ्रिज मध्ये स्टोअर करून ठेवल्यावर लसणाला बुरशी लागू शकते. लसूण खराब होतो. त्यामुळे लसूण फ्रिज मध्ये ठेवू नये. (Marathi News)

fridge

> बटाटा सामान्य तापमानात ठेवावा. बटाटा फ्रिजमध्ये ठेवल्यानं त्यातील स्टार्चचं रूपांतर शुगरमध्ये होतं त्यामुळे चव बदलते. फ्रिजमधील बटाट्याचा उकडल्यानंतर रंगही बदलतो. (Marathi Latest News)

fridge

> कांदा फ्रिजमध्ये ठेवल्यानं त्याचा वास फ्रिजमध्ये पसरतो. त्यामुळे फ्रिजमधील अन्नपदार्थ खराब होण्याची शक्यता असते. उदा. दूध कांदा फ्रिजमध्ये ठेवल्यानंतर त्याला अधिक पाणी सुटल्यानं तो खराब व्हायला सुरुवात होते. कांदा कायम हवा असलेल्या ठिकाणी ठेवा. बंद जागी ठेवल्यानं कांदा सडायला सुरुवात होते. (Marathi Top News)

fridge

> मध हे नैसर्गिक आहे ते खोलीच्या तापमानात दीर्घकाळ साठवता येते. ते सुरक्षित ठेवण्यासाठी फक्त एक अट असते ती म्हणजे काचेच्या भांड्यात ठेवणे. फ्रीजमध्ये ठेवल्यास ते गोठते आणि त्याची चवही बदलते.

fridge

> कॉफी फ्रिजमध्ये ठेऊ नका. कॉफी फ्रिजमध्ये ठेवल्याने दुसऱ्या गोष्टींनाही त्याचा वास येतो आणि कॉफी लवकर खराब होते.

fridge

> प्रत्येक घरात फ्रिजमध्ये टोमॅटो असतोच. टोमॅटो फ्रिजमध्ये ठेवल्यानं बावतो. त्याची चवही बदलते. टोमॅटो कायम बाहेर जाळी असलेल्या भांड्यात ठेवावेत. कापलेला टोमॅटो फ्रिजमध्ये ठेवल्यानं आंबूस वास येतो. (Food)

fridge

> ॲव्हाकॅडो पिकेपर्यंत खोलीत सामान्य तापमानात ठेवणे चांगले असते. एकदा ते पिकले की काही दिवस रेफ्रिजरेटरमध्ये ठेवता येते. पण जर कच्चं ॲव्हाकॅडो फ्रीजमध्ये ठेवलं तर ते पूर्णपणे पिकत नाही. (Social News)

fridge

> फ्रिजमध्ये ब्रेड ठेवल्याने त्याचा मऊपणा कमी होतो. तसेच त्यात मोल्ड किंवा फंगस तयार होण्याची शक्यता वाढते. ब्रेड खोलीच्या तापमानात ठेवणे अधिक चांगले असते, तसेच त्याला हवाबंद कंटेनरमध्ये ठेवावे.

fridge

========

हे देखील वाचा : या एक हॅक्सच्या मदतीने घरबसल्या मिळवा फ्लाइटसंदर्भात माहिती, वाचा सोप्या स्टेप्स

========

> कलिंगडाचा गुणधर्म थंड असतो. फ्रिजमध्ये ठेवल्यानं अधिक थंडपणा फळात उतरतो. फळातील न्यूट्रिशनल व्हॅल्यू कमी होते. तुम्हाला थंड करून कलिंगड खायचं असेल तर अ‍ॅल्युमिनियम फॉईलमध्ये कलिंगडाच्या फोडी बंद करून ठेवाव्यात. (Marathi Trending News)

fridge

> ड्रायफ्रूट्स एअर टाईट बॅगमध्ये पॅक करून फ्रीजमध्ये साठवले जातात. हे करण्याची गरज नाही, ते फ्रीजशिवाय बरेच महिने चांगले राहतात. जास्त काळ ताजे ठेवण्यासाठी ड्रायफ्रूट्स हवाबंद काचेच्या बरणीत ठेवा.

Recent Posts

Related Articles

Tourism
लाईफ स्टाईल

Tourism : स्लीप टुरिझम म्हणजे काय? काय आहे हा नवा ट्रेंड?

प्रत्येक व्यक्तीच्या उत्तम आरोग्यासाठी सकस आहार, उत्तम व्यायाम जेवढा आवश्यक आहे, तेवढीच...

Chaturthi
लाईफ स्टाईल

Chaturthi : नोव्हेंबर महिन्यातील संकष्टी चतुर्थी कधी आहे? जाणून घ्या चतुर्थीचे महत्त्व आणि पूजाविधी

आपल्या सर्वांचे आराध्य दैवत म्हणजे गणपती. या गणेशाची आपण कायमच आराधना करत...

Lord Shiv
लाईफ स्टाईल

Lord Shiv : का महादेवाने सर्वेश्वर अवतार घेत केले भगवान नरसिंहाशी युद्ध?

भगवान शिव आणि भगवान विष्णू यांची एकत्र पूजा करण्याचा आणि आराधना करण्याचा...

Indian Sweets | Top Marathi Headlines
लाईफ स्टाईल

Indian Sweets : मिठाईवर लावल्या जाणाऱ्या सोने, चांदीच्या वर्खची रंजक माहिती

आपल्या देशामध्ये कोणताच लहान मोठा सण, समारंभ, पूजा मिठाईशिवाय पूर्ण होत नाही....