Home मनोरंजन सिनेरसिकांसाठी मे महिना ठरणार पर्वणी, प्रेक्षकांना मिळणार अनेक बॉलिवूड, हॉलिवूड चित्रपटांची मेजवानी 
मनोरंजन

सिनेरसिकांसाठी मे महिना ठरणार पर्वणी, प्रेक्षकांना मिळणार अनेक बॉलिवूड, हॉलिवूड चित्रपटांची मेजवानी 

4
upcoming movie
upcoming movie

कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाऊनचा फटका मनोरंजनसृष्टीला देखील बसला आणि यामुळे अनेक लहानमोठे सिनेमे प्रदर्शनासाठी अडकून पडले. मात्र आता सर्व काही सुरळीत झाले असून, प्रदर्शनाची वाट पाहणारे सर्वच सिनेमे आता एका रांगेत प्रदर्शनासाठी सज्ज झाले आहेत. एकामागोमाग एक अनेक सिनेमे आता प्रदर्शित होत आहेत. एप्रिल महिना तर सिनेप्रेमींसाठी पर्वणीच ठरला. ‘आरआरआर’, ‘केजीएफ २’, ‘जर्सी’ आदी अनेक बडे सिनेमे प्रदर्शित झाले आणि यशस्वी देखील ठरले. आता लवकरच मे महिना सुरू होणार असून या महिन्यात देखील प्रेक्षकांना उत्तमोत्तम चित्रपटांची मेजवानी अनुभवायला मिळणार आहे. चला तर जाणून घेऊया मे महिन्यात प्रदर्शित होणाऱ्या मोठ्या चित्रपटांबद्दल. (upcoming movie)

भूल भुलैया 2

Bhool Bhulaiyaa 2

अनीज बजमी दिग्दर्शित ‘भूल भुलैया 2’ चित्रपटाची निर्मिती टी-सीरिज बॅनर करत असून या सिनेमात कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांच्या मुख्य भूमिका आहेत. यासोबतच या हॉरर कॉमेडी सिनेमात तब्बू, राजपाल यादव आदी कलाकारांच्या देखील महत्वाच्या भूमिका असणार आहेत. २००७ साली आलेल्या प्रियदर्शन यांच्या ‘भूल भुलैया’ या सिनेमाचा सिक्वल असणाऱ्या ‘भूल भुलैया २’ सिनेमाची उत्सुकता प्रेक्षकांना खूपच आधीपासून आहे. हा सिनेमा येत्या १३ मे २०२२ ला प्रदर्शित होणार आहे. (upcoming movie)

जयेशभाई जोरदार

Jayeshbhai Jordaar

दिव्यांग ठक्कर दिग्दर्शित आणि रणवीर सिंग, बोमन इराणी आणि रत्ना पाठक शाह अभिनित ‘जयेशभाई जोरदार’ सिनेमात स्त्रीभ्रूण हत्येबद्दल भाष्य करतो. आजच्या आधुनिक काळातही लोकांच्या बुरसटलेल्या विचारांना बदलवण्याचा प्रयत्न असणार आहे. २०२०च्या ऑक्टोबर महिन्यातच हा सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज होता, मात्र कोरोनामुळे तो पुढे ढकलला गेला. पण आता दणक्यात हा सिनेमा प्रदर्शित होत असून, याच्या ट्रेलरला देखील चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. १३ मे २०२२ ला सिनेमा प्रदर्शित होणार आहे. (upcoming movie)

धाकड

Dhaakad

बॉलिवूडची क्वीन असणाऱ्या कंगना रणौतचा धाकड हा बॉलिवूडचा पहिला हाई-ऑक्टेन स्पाई थ्रिलर सिनेमा असणार आहे. हा सिनेमा भारतातील पहिला महिलाप्रधान सिनेमा असेल जो विविध भाषांमध्ये २० मे २०२२ ला प्रदर्शित होणारे आहे. (upcoming movie)

रॉकेट गॅंग

rocket gang

बॉस्को मार्टिस दिग्दर्शित रॉकेट गॅंग हा देखील बहुप्रतिक्षित सिनेमांपैकी एक सिनेमा असून यात आदित्य सील आणि निकिता दत्ता यांच्या मुख्य भूमिका असणार आहेत. हा सिनेमा येत्या ६ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. (upcoming movie)

मेरे देश की धरती

Mere Desh Ki Dharti

फराज हैदर दिग्दर्शित ‘मेरे देश की धरती’ सिनेमात मिर्झापूर फेम दिव्येंदु शर्मा  मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा सिनेमा देखील ६ मे ला प्रदर्शित होईल.

=====

हे देखील वाचा – पहिल्याच दिवशी जबरदस्त कमाई करूनही ‘या’ सिनेमांनी मिळवला फ्लॉपचा टॅग 

=====

डॉक्टर स्ट्रेंज इन द मल्टीवर्स ऑफ मॅडनेस

Doctor Strange in the Multiverse of Madness

डॉक्टर स्ट्रेंज इन द मल्टीवर्स ऑफ मॅडनेस हा एक अमेरिकी सुपरहिरो सिनेमा आहे. मार्वल कॉमिक मधील एका कॅरेक्टरवर हा सिनेमा आधारित आहे. हा सिनेमा मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्सची २८ वी फिल्म आहे. सॅम रायमी दिग्दर्शित आणि माइकल वाल्ड्रॉन लिखित हा सिनेमा ६ मे २०२२ ला प्रदर्शित होईल.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Sulakshana Pandit
मनोरंजन

Sulakshana Pandit : अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचे निधन, ‘या’ अभिनेत्यासाठी राहिल्या आजन्म अविवाहित

ऑक्टोबर महिन्यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी आपला निरोप घेतला. हा सिलसिला नोव्हेंबरमध्ये देखील...

Cricket
क्रीडामनोरंजन

Cricket : कोण आहे स्टार क्रिकेटपटू स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छल?

भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला आणि सगळीकडे एकच जल्लोष झाला. आधी...

Tejaswini Lonari
मनोरंजन

Tejaswini Lonari : अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने गुपचूप उरकला साखरपुडा; बड्या नेत्याची होणार सून

सध्या मराठी मनोरंजनविश्वामधे लग्नसराईचे दिन आल्याचे चित्र आहे. अनेक मराठी कलाकार साखरपुडा...

Asarani
मनोरंजन

Asarani : दिग्गज हिंदी चित्रपट अभिनेते असरानी यांचे दुःखद निधन

हिंदी सिनेमात असे खूप कमी कलाकार होऊन गेले किंवा आहेत ज्यांचे केवळ...