Home मनोरंजन ‘किचन कल्लाकार’च्या मंचावर कविता मेढेकर, किशोरी शहाणे आणि सोनाली कुलकर्णी लावणार हजेरी
मनोरंजन

‘किचन कल्लाकार’च्या मंचावर कविता मेढेकर, किशोरी शहाणे आणि सोनाली कुलकर्णी लावणार हजेरी

6
किचन कल्लाकार

‘किचन कल्लाकार’ (Kitchen Kallakar) या कार्यक्रमाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. किचन आणि कलाकार हे समीकरण जुळलेलं नसताना पाककलेच्या कसोटीला उतरलेल्या कलाकारांची उडणारी तारांबळ बघताना प्रेक्षकांना खूप मजा येत आहे. ‘किचन कल्लाकार’च्या आगामी भागात कविता मेढेकर, किशोरी शहाणे आणि सोनाली कुलकर्णी धमाल किस्से ऐकवताना दिसणार आहेत. 

‘किचन कल्लाकार’च्या आगामी भागाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. आगामी भागात कविता मेढेकर, किशोरी शहाणे आणि सोनाली कुलकर्णी प्रेक्षकांसोबत धमाल किस्से शेअर करताना दिसणार आहेत.

कविता मेढेकर आणि प्रशांत दामले यांनी अनेक वर्षे नाटकांमध्ये एकत्र काम केले आहे. त्यामुळे प्रशांत दामलेंचे अनेक किस्से कविता मेढेकर प्रेक्षकांसोबत शेअर करणार आहेत.

====

हे देखील वाचा: ‘मी वसंतराव’ पाहून पुढील २० वर्षे काम करण्याची ऊर्जा मिळाली – डॉ. रघुनाथ माशेलकर

====

कविता मेढेकर एक किस्सा शेअर करणार आहेत. प्रशांत नावं विसरतो हे सगळ्यांनाच माहीत आहे. एका नाटकाच्या प्रयोगाला मी मेकअप करायला बसले होते त्यावेळी प्रशांत फोनवर कोणाशीतरी बोलत होता. त्यावेळी आपले हे आहेत ना ते आपले हे… असे म्हणत तो नावच सांगायचं विसरला.

शेवटी सतीश असे म्हटल्यावर हा हा म्हणत समोरून त्याला सतिशचे आडनाव विचारले त्यावेळी मी त्याचे आडनाव थत्ते असल्याचे सांगितले मात्र त्यानंतर खबरदार तू हा किस्सा कोणाला संगीतलास तर असे प्रशांत दामले यांनी मला बजावून सांगितले होते. 

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Sulakshana Pandit
मनोरंजन

Sulakshana Pandit : अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचे निधन, ‘या’ अभिनेत्यासाठी राहिल्या आजन्म अविवाहित

ऑक्टोबर महिन्यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी आपला निरोप घेतला. हा सिलसिला नोव्हेंबरमध्ये देखील...

Cricket
क्रीडामनोरंजन

Cricket : कोण आहे स्टार क्रिकेटपटू स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छल?

भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला आणि सगळीकडे एकच जल्लोष झाला. आधी...

Tejaswini Lonari
मनोरंजन

Tejaswini Lonari : अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने गुपचूप उरकला साखरपुडा; बड्या नेत्याची होणार सून

सध्या मराठी मनोरंजनविश्वामधे लग्नसराईचे दिन आल्याचे चित्र आहे. अनेक मराठी कलाकार साखरपुडा...

Asarani
मनोरंजन

Asarani : दिग्गज हिंदी चित्रपट अभिनेते असरानी यांचे दुःखद निधन

हिंदी सिनेमात असे खूप कमी कलाकार होऊन गेले किंवा आहेत ज्यांचे केवळ...