Home लाईफ स्टाईल Mahabharat : महाभारतातील ‘या’ आहेत शक्तिशाली महिला
लाईफ स्टाईल

Mahabharat : महाभारतातील ‘या’ आहेत शक्तिशाली महिला

20
Mahabharat

भारतातील सर्वात मोठे काव्य म्हणून ‘महाभारत’ या काव्याला ओळखले जाते. महाभारत आपल्याला धर्म, कर्तव्य, न्याय, सत्यता, आत्म-नियंत्रण, सहानुभूती, दया, संघर्ष, ज्ञान, कौटुंबिक संबंध, प्रेम, त्याग, निष्ठा, आणि सहनशीलता आदी अनेक मूल्यांची शिकवण देते. महाभारतातील सर्वच पात्र ही कथा पुढे नेण्यास आपले महत्वाचे योगदान देताना दिसतात. (Mahabharat)

वाईटाचा शेवट हा वाईटच होतो आणि अखेरीस सत्याचा विजय होतो हेच महाभारतातून आपल्या लक्षात येते. महाभारतामध्ये सर्वच पात्र अतिशय महत्वाची एका एकमेकांशी विविध माध्यमातून जोडलेली होती. मात्र याच महाभारतामध्ये महिलांची देखील भूमिका खूपच महत्वाची आणि मोठी होती. किंबहुना याच महिलांमुळे महाभारत घडल्याचे सांगितले जाते. महाभारतातील महिलांकडे देखील दैवी शक्ती होती. त्यांच्यापुढे मोठमोठे योद्धे देखील काहीही करु शकले नाहीत. आज आपण या लेखातून जाणून घेऊया महाभारतातील शक्तिशाली महिलांबद्दल. (Marathi News)

गांधारी
हस्तिनापूरच्या महाराज धृतराष्ट्र यांच्या गांधारी पत्नी होत्या. धृतराष्ट्र जन्मापासूनच आंधळे होते. आणि म्हणूनच गांधारी यांनी देखील आयुष्यभर डोळ्यावर पट्टी बांधली होती. गांधारी यांनी धृतराष्ट्र यांची पत्नी म्हणून राज्याचा ताबा घेतला होता. गांधारी यांच्या शब्दला राज्यात मोठे वजन होते. महाभारताच्या युद्धात गांधारी यांनी दुर्योधनाला विजय मिळावा यासाठी त्याचे शरीर वज्राचे बनवायचे होते. त्यामुळे त्यांनी दुर्योधनाला त्यांच्याकडे नग्नावस्थेत येण्यास सांगितलं होतं. (Marathi Latest News)

Mahabharat

द्रौपदी
असे म्हटले जाते की, द्रौपदीचा जन्म यज्ञातून झाला होता, त्यामुळेच तिला याज्ञनी असे देखील म्हटले जायचे. द्रौपदी पंचकन्यांमधील एका प्रमुख कन्या आहेत. पंचकन्या अर्थात विवाहित असून देखील कुमारिका कन्येप्रमाणे पवित्र असणाऱ्या पाच स्त्रियांपैकी एक. पांडवांशी विवाह झाल्यानंतर ती हस्तिनापूरच्या राजकारणाशी जोडली गेली. कृष्णभक्तीमुळे द्रौपदी अधिक ताकदवर झाली होती. राज्यसभेत द्रौपदीचा अपमान झाल्यामुळे महाभारत युद्ध झालं. अर्जुन, भीम, नकुल, सहदेव आणि युधिष्ठिर यांनी द्रौपदीच्या शब्दांकडे कधीही दुर्लक्ष केले नाही. महाभारताच्या युद्धामध्ये द्रौपदीने दुशासनाचा भीमाने वध केल्यानंतर त्यांच्या रक्ताने केस धुतले होते. (Marathi Trending News)

Mahabharat

​राणी सत्यवती​
महाभारतातील राणी सत्यवती यांचे व्यक्तिमत्त्वही खूप प्रभावी होते. असे म्हटले जाते की, राणी सत्यवतीमुळेच हस्तिनापूरमधून कुरुवंशाचा नाश झाला. राणी सत्यवती ही महाराज शांतूनची दुसरी पत्नी आणि भीष्म यांची सावत्र आई होती. त्यांचा शब्दही कोणी टाळला नाही. सत्यवती यांच्या सांगण्यावरूनच महर्षी व्यासांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग करत पांडू, धृतराष्ट्र आणि विदुर यांना जन्मास घातले होते. भीष्म पितामहांनी देखील राणी सत्यवती यांचे म्हणणे कधी टाळले नाही. भीष्म पितामहा यांनी देखील राणी सत्यवती यांची प्रत्येक गोष्ट ऐकली. (Social News)

Mahabharat

कुंती
कुंतीला वरदान होते की, ती कोणत्याही देवासोबत नियोग करून पुत्र जन्माला घालू शकत होती. कुंती पांडू यांच्या पत्नी आणि पाच पांडवांच्या आई होत्या. पाचही पांडव कधीच आईचा शब्द खाली पडू देत नव्हते. म्हणूनच जेव्हा स्वयंवरामध्ये अर्जुनाने द्रौपदीशी विवाह केला, तेव्हा कुंतीने अर्जुनाने आणलेली वस्तू पाचही पांडवांमध्ये वाटून घेण्यास सांगितले, कुंतीच्या याच आदेशावरून द्रौपदीचा विवाह पाचही पांडवांसोबत झाला होता.(Marathi Top News)

Mahabharat

सुभद्रा
सुभद्रा श्रीकृष्णची बहीण होती. सुभद्राच प्रेम अर्जुनवर होतं. पण अर्जुन यांचा विवाह द्रौपदीसोबत झाल्यामुळे तिने सुभद्र यांच्यासोबत विवाह करण्यास नकार दिला. द्रौपदीशी विवाह होऊनही सुभद्राने अर्जुनासोबत लग्न करण्याची इच्छा सोडली नाही. तिने तिचा भाऊ कृष्णाकडे अर्जुनाशी विवाह करण्याचा हट्ट केला. त्यामुळे बहिणीचा हट्ट श्रीकृष्ण यांना मानावा लागला. अखेर सुभद्रा आणि अर्जुन यांचा विवाह झाला. सुभद्रा आणि अर्जुन यांचा अभिमन्यू नावाचा एक मुलगा होता, ज्याचा महाभारताच्या शेवटच्या युद्धात चक्रव्युहामध्ये अडकून मृत्यू झाला होता. (Marathi Latest Trending News)

Mahabharat

 

Recent Posts

Related Articles

Tourism
लाईफ स्टाईल

Tourism : स्लीप टुरिझम म्हणजे काय? काय आहे हा नवा ट्रेंड?

प्रत्येक व्यक्तीच्या उत्तम आरोग्यासाठी सकस आहार, उत्तम व्यायाम जेवढा आवश्यक आहे, तेवढीच...

Chaturthi
लाईफ स्टाईल

Chaturthi : नोव्हेंबर महिन्यातील संकष्टी चतुर्थी कधी आहे? जाणून घ्या चतुर्थीचे महत्त्व आणि पूजाविधी

आपल्या सर्वांचे आराध्य दैवत म्हणजे गणपती. या गणेशाची आपण कायमच आराधना करत...

Lord Shiv
लाईफ स्टाईल

Lord Shiv : का महादेवाने सर्वेश्वर अवतार घेत केले भगवान नरसिंहाशी युद्ध?

भगवान शिव आणि भगवान विष्णू यांची एकत्र पूजा करण्याचा आणि आराधना करण्याचा...

Indian Sweets | Top Marathi Headlines
लाईफ स्टाईल

Indian Sweets : मिठाईवर लावल्या जाणाऱ्या सोने, चांदीच्या वर्खची रंजक माहिती

आपल्या देशामध्ये कोणताच लहान मोठा सण, समारंभ, पूजा मिठाईशिवाय पूर्ण होत नाही....