Home मनोरंजन ‘या’ अभिनेत्याची होतेय घटस्फोटाची चर्चा
मनोरंजन

‘या’ अभिनेत्याची होतेय घटस्फोटाची चर्चा

8
Divorce
There is talk of divorce of the actor marathi info

दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीत सध्या एकच विषय चर्चेचा झाला आहे. तो म्हणजे, दक्षिण भारतीय चित्रपटांचा सुपरस्टार आणि सर्वात लोकप्रिय अभिनेता विजय याच्या घटस्फोटाची (Divorce) बातमी. दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीत विजयचे नाव जेवढ्या मानानं घेतलं जातं, तेवढंच त्याच्या पत्नीला, संगीतालाही मान आहे. विजय आणि संगीता यांची लव्हस्टोरी,  श्रीलंकेपासून सुरु झालेला हा प्रवास, त्या दोघांचा 23 वर्षाचा सुखी संसार आणि यासर्वात आलेली घटस्फोटाची बातमी यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.  

दाक्षिणात्य सुपरस्टार विजय थलपथी सध्या त्याच्या आगामी ‘वारीसू’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.  यात विजय, रश्मिका मंदान्नासोबत दिसणार आहे. मात्र हे असतांनाच त्याच्या घटस्फोटाची बातमी आल्यावर सर्वत्र विजय आणि संगिता यांच्या संसारात घटस्फोट(Divorce) घेण्यासारखी कुठली घटना झाली याची चर्चा सुरु झाली आहे.  वियजची पत्नी संगीता सोरनालिंगम ही मूळ श्रीलंकेची असून,  त्या दोघांची लव्हस्टोरीही खूप गाजली होती. विजय आणि संगिताची पहिली भेट 1996 मध्ये झाली. एका कार्यक्रमात संगिता विजयला भेटली.  ती विजयची फॅन होती.  आपली ओळख तिनं स्वतः करुन दिली. विजयनं जेव्हा पहिल्यांदा संगिताला पाहिलं तेव्हाच तो तिच्या प्रेमात पडला. संगीता ही श्रीलंकेतील तमिळ उद्योगपतीची मुलगी. संगिता शिक्षणासाठी अमेरिकेत राहत होती. पण ती विजयचे चित्रपट नेहमी बघत असे. विजयचा पूव उनक्कागा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर त्याची फॅन असलेली संगिता अमेरिकेहून थेट चेन्नईला आली. तिने विजयची भेट घेतली. संगिताला पाहता क्षणी विजय तिच्या प्रेमात पडला. नंतर या दोघांनी एकमेकांच्या कुटुंबाना आपल्या प्रेमाची कबुली दिली. विजयच्या घरीही संगिता आवडली.  त्यामुळे  संगीता आणि विजय यांचा विवाह 25 ऑगस्ट 1999 रोजी थाटात संपन्न झाला. दोघांनीही त्या काळात हिंदू आणि ख्रिश्चन अशा दोन्ही धर्मात लग्न केले होते. 2000 मध्ये, या जोडप्याने जेसन संजय नावाच्या पहिल्या मुलाला जन्म दिला, तर 2005 मध्ये त्यांच्या दिव्या या मुलीचा जन्म झाला.

संगिताचे सर्व कुटुंब अमेरिकेत स्थायिक आहे. विवाहासाठी ही सर्व मंडळी चेन्नईमध्ये काही महिने मुक्कामी होती. आता विजय आणि संगिता यांच्या विवाहाला 23 वर्ष झाली आहेत. दक्षिण चित्रपटसृष्टीतील सर्वात आनंदी जोडप्यांमध्ये विजय आणि संगिता यांचे नाव येते.  मात्र त्यांच्या घटस्फोटाची (Divorce) बातमी आल्यावर चाहत्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. मात्र ही अफवा असल्याचेही बोलले जातेय. वारिसूच्या ट्रेलर लॉन्च इव्हेंटमध्येही संगिता दिसली नसल्यामुळेच ही चर्चा सुरु झाल्याचा अंदाज आहे.  

=======

हे देखील वाचा : एआर रहमान यांनी ‘या’ कारणास्तव बदलले होते आपले मूळ नाव, धर्म ही बदलला

======= 

या पोंगलमध्ये विजय ‘वारीसू’ या चित्रपटामध्ये दिसणार आहे. वारिसू ही एका व्यक्तीची कथा आहे. तो एका बिझनेस टायकूनचा मुलगा आहे. काही प्रतिकूल परिस्थितीत त्याला आपल्या वडिलांचे साम्राज्य ताब्यात घेणे भाग पडते. वामशी पैडिपल्ली दिग्दर्शित, हा चित्रपट या महिन्याच्या 11 तारखेला चित्रपटगृहात दाखल होणार आहे. ‘वारीसू’मध्ये विजय पुन्हा एकदा अॅक्शन किंगच्या भूमिकेत दिसणार आहे.  या चित्रपटाची उत्सुकता त्याच्या चाहत्यांना असतांनाच त्याच्या घटस्फोटाची (Divorce) बातमी आल्यानं चाहत्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.  

यासोबतच अभिनेत्री त्रिशाचेही नाव चर्चेत आले आहे. तब्बल 14 वर्षांनंतर विजय पुन्हा एकदा त्याची माजी गर्लफ्रेंड त्रिशासोबत पडद्यावर दिसणार आहे. विजय-त्रिशाने एकत्र अनेक हिट चित्रपट दिले आहेत. विजय आणि त्रिशा यांनी घिल्ली, कुरुवी, थिरुपाची आणि आथीसह अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. घिल्ली हा त्याचा सर्वात मोठा हिट चित्रपट होता. कुरुवी हा त्यांचा 2008 मधला शेवटचा एकत्र चित्रपट होता. 2005 मध्ये त्रिशा आणि थलपथी विजय यांच्या कथित अफेअरची चर्चा सर्वत्र सुरु झाली होती. हे  दोघेही त्यांच्या ‘घिली’ चित्रपटाच्या सेटवर भेटले होते.  त्रिशाची विजयसोबतची जवळीक वाढल्याने विजयची पत्नी संगीता सोरलिंगम नाराज झाल्याची बातमी होती आणि तेव्हाही त्यांच्या घटस्फोटाची (Divorce) बातमी आली होती. मात्र, यावेळी त्रिशा कृष्णन हिने पुढे येऊन मीडियामध्ये सुरू असलेल्या सर्व बातम्या खोडून काढल्या. आपण आणि विजय चांगले मित्र असल्याचे तिनं सांगितले होते. त्यानंतर आता चौदा वर्षानंतर ही जोडी पुन्हा एकदा एकत्र पडद्यावर येत आहे. त्यातच विजयच्या घटस्फोटाची बातमी आल्यामुळे चाहत्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.  

सई बने

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Sulakshana Pandit
मनोरंजन

Sulakshana Pandit : अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचे निधन, ‘या’ अभिनेत्यासाठी राहिल्या आजन्म अविवाहित

ऑक्टोबर महिन्यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी आपला निरोप घेतला. हा सिलसिला नोव्हेंबरमध्ये देखील...

Cricket
क्रीडामनोरंजन

Cricket : कोण आहे स्टार क्रिकेटपटू स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छल?

भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला आणि सगळीकडे एकच जल्लोष झाला. आधी...

Tejaswini Lonari
मनोरंजन

Tejaswini Lonari : अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने गुपचूप उरकला साखरपुडा; बड्या नेत्याची होणार सून

सध्या मराठी मनोरंजनविश्वामधे लग्नसराईचे दिन आल्याचे चित्र आहे. अनेक मराठी कलाकार साखरपुडा...

Asarani
मनोरंजन

Asarani : दिग्गज हिंदी चित्रपट अभिनेते असरानी यांचे दुःखद निधन

हिंदी सिनेमात असे खूप कमी कलाकार होऊन गेले किंवा आहेत ज्यांचे केवळ...