Home गाजावाजा स्पेशल क्लस्टर बॉम्बची दहशत…
गाजावाजा स्पेशल

क्लस्टर बॉम्बची दहशत…

7
Cluster Bomb
the-terror-of-cluster-bombs-marathi-info

रशिया-युक्रेन युद्धाला 500 दिवस पूर्ण झाले आहेत.  सुरुवातीला अगदी आठवडाभर चालेल असा अंदाज असलेल्या या युद्धानं भल्याभल्या राजकीय तज्ञांनाही खोटं ठरवलं आहे. सध्या रशिया आणि युक्रेनमधील युद्ध हे कधी संपेल याची खात्री जगातला कुठलाही देश देऊ शकत नाही. उलट दिवंसेंदिवस या युद्धाची दाहकता वाढतच जाणार आहे, हे स्पष्ट झाले आहे. कारण या युद्धात अमेरिकेनं युक्रेनला मोठ्या प्रमाणात युद्ध सामुग्री देण्यात आघाडी घेतली आहे. त्यातच ज्या बॉम्बवर सर्व जगानं बंदी घातली आहे, असा क्लस्टर बॉम्ब अमेरिकेनं युक्रेनला देण्याचा निर्णय घेतला आहे. विमान, क्षेपणास्त्रे, रॉकेट यामधून हा क्लस्टर बॉम्ब टाकता येतो. या एका बॉम्बमधून अनेक लहान बॉम्ब बाहेर पडतात. या क्लस्टर बॉम्बमुळे (Cluster Bomb) आतापर्यंत अनेक नागरिकांचा बळी गेला आहे. त्यामुळे या बॉम्बवर जगभर बंदी घालण्यात आली आहे. असे असले तरी अमेरिकेने युक्रेनला हे बॉम्ब देण्याचा निर्णय घेतला आहे.

जगभरातील शेकडो देशांमध्ये क्लस्टर बॉम्बवर बंदी आहे. मात्र अमेरिकेच्या जो बायडेन प्रशासनानं मोठ्या प्रमाणात युक्रेनला क्लस्टर बॉम्ब (Cluster Bomb) देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. आपल्या या निर्णयाचे समर्थन करण्यासाठी अमेरिकेने युक्रेनला आपल्या भूभागाचे आणि नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी या बॉम्बची गरज असल्याचे सांगितले आहे. मात्र अमेरिकेच्या या निर्णयावर अनेक देशांनी नाराजी व्यक्त केली आहे.  मुख्य म्हणजे, ज्या देशाविरुद्ध हा बॉम्ब वापरण्यात येणार आहे, त्या रशियाची अद्यापही प्रतिक्रीया आली नाही. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची ही शांतीच अतिशय घातक असल्याचे मत राजकीय तज्ञांनी व्यक्त केले आहे.  

क्लस्टर बॉम्ब (Cluster Bomb) म्हणजे, या बॉम्बचा स्फोट झाल्यावर त्यातून अनेक छोटे बॉम्ब फेकले जातात. हे छोटे बॉम्ब आजूबाजूच्या भूभागावर पडतात आणि त्यातून एकापाठोपठ स्फोट होतात. काही सेकंदाच्या अंतरानं होणा-या या अनेक स्फोटांपासून शत्रूला आपला बचाव करता येत नाही.  परिणामी शत्रू पक्षाचे मोठे नुकसान होते. पण हा बॉम्ब नागरी वस्तीवर पडला तर त्यात नागरिकांचाही मोठ्या प्रमाणात मृत्यू होतो. या बॉम्बच्या बाबतीत असेही सांगण्यात येते की, यातील 30 टक्के बॉम्ब हे लगेच फुटत नाहीत. ते कधी फुटतील हे सांगता येत नाही. त्यामुळे हे जिवंत बॉम्ब अधिक धोकादायक ठरतात. अफगाणिस्तानमध्ये अशा जिवंत क्लस्टर बॉम्बनी अनेकांचा बळी घेतला आहे. हजारो नागरिक अपंग झाले आहेत. क्लस्टर बॉम्बच्या (Cluster Bomb) हल्ल्यात आतापर्यंत नागरिकांचाच अधिक बळी गेल्याचे आढळून आले आहे. यामुळे रेडक्रॉस आणि अनेक संस्थांनी या क्लस्टर बॉम्बला विरोध केला होता. परिणामी जगातील अनेक देशांनी या बॉम्बवर बंदी घालून क्लस्टर बॉम्बचा (Cluster Bomb) वापर बंद केला. 2008 मध्ये क्लस्टर बॉम्बवर बंदी घालण्यासाठी 108 देशांनी संयुक्त राष्ट्रांच्या करारावर स्वाक्षरी केली आहे. तोच क्लस्टर बॉम्ब आता युक्रेनला मिळणार असून त्याचा रशियावर वापर झाल्यास या युद्धाला वेगळा रंग मिळण्याची शक्यता आहे. अमेरिकेनं आधीच युक्रेनला हॉवित्झर तोफांचा पुरवठा केला आहे.  या तोफेमधूनही हे क्लस्टर बॉम्ब (Cluster Bomb) डागले जाऊ शकतात.  

ह्युमन राइट्स वॉचच्या अहवालानुसार रशिया आणि युक्रेन या युद्धात क्लस्टर बॉम्बचा (Cluster Bomb) वापर सुरुवातीपासून सुरु आहे. 2022 मध्ये, युक्रेनने रशियाच्या ताब्यातील प्रदेशात क्लस्टर बॉम्ब फेकल्याची माहिती या अहवालात देण्यात आली आहे. त्यामुळे झेलेन्स्की यांना आधीपासूनच अमेरिकेकडून क्लस्टर बॉम्बचा (Cluster Bomb) पुरवठा करण्यात आला आहे, हे स्पष्ट आहे. अमेरिकेने युक्रेनला आतापर्यंत 800 दशलक्ष डॉलर एवढे सुरक्षा पॅकेज दिले आहे. 

=========

हे देखील वाचा : ब्रिटेन मधील शाही परिवारातील ही परंपरा बंद होणार ?

=========

क्लस्टर बॉम्बच्या (Cluster Bomb) निर्मितीवर आणि वापरावर बंदी असतानाही अमेरिका, इराक, उत्तर कोरिया, इस्रायलसह अनेक देश त्यांचा वापर करत असल्याचा आरोप होत आहे. मानवाधिकार संघटना या बॉम्बचा विरोध करीत आहेत. मात्र अमेरिका सारख्या सुपरपॉवर देशांवर या भूमिकाचा परिणाम होत नसून त्यांच्याकडे क्लस्टर बॉम्बची निर्मिती होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. दुसऱ्या महायुद्धात 1943 मध्ये तत्कालीन सोव्हिएत युनियन आणि जर्मनीच्या सैन्याने प्रथम क्लस्टर बॉम्बचा (Cluster Bomb) वापर केला होता. एक अहवालानुसार आतापर्यंत 200 प्रकारचे क्लस्टर बॉम्ब बनवले गेले आहेत. दुस-या महायुद्धानंतर आखाती युद्धात अमेरिकेने या बॉम्बचा मोठ्या प्रमाणावर वापर केला. अफगाणिस्तान युद्धादरम्यान, अमेरिकेने टेकड्यांमध्ये लपलेल्या तालिबानी सैनिकांना मारण्यासाठी आपल्या लढाऊ विमानांमधून बरेच क्लस्टर बॉम्ब सोडले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात दहशतवादी मारले गेले. क्लस्टर बॉम्बचा वापर जाहीरपणे युक्रेननं रशियाच्या विरोधात केला तर रशिया युक्रेन आणि सोबतच अमेरिकेविरुद्ध अत्यंत कडक पाऊल उचलेल असा इशारा राजकीय तज्ञांनी दिला आहे.  

सई बने

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Sade Sati
गाजावाजा स्पेशल

Sade Sati : जाणून घ्या नक्की शनीची साडेसाती म्हणजे काय?

भारतात ज्योतिषशास्त्राचे मोठे महत्त्व आहे. ज्योतिष्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची संख्या भारतात सर्वाधिक...

Vande Mataram
गाजावाजा स्पेशल

Vande Mataram : ‘वंदे मातरम्’ गीताला १५० वर्षे पूर्ण

भारत जगातील सर्वात लोकप्रिय देश. आज भारताचा संपूर्ण जगामध्ये डंका वाजत आहे. ...

Royal Stories
गाजावाजा स्पेशल

Royal Stories : 365 राण्या आणि न्यूड पार्टी करणारा भारतीय राजा!

एक असा राजा ज्याच्या वर्षात जितके दिवस असतात तितक्या राण्या होत्या, त्याच्यासोबत...

Ganpati
गाजावाजा स्पेशल

Ganpati : ‘या’ गावात भाद्रपदात नाही तर चक्क लक्ष्मीपूजनाला होते गणेशाची स्थापना

भाद्रपद महिना जवळ येऊ लागला की, सगळ्यांना वेध लागतात ते गणेश चतुर्थीचे....