Home प्रेस रिलीझ सचिनमय अल्बममधील “धनगर राजा” गीत आता अँनिमेटेड व्हिडिओ रूपात
प्रेस रिलीझमनोरंजन

सचिनमय अल्बममधील “धनगर राजा” गीत आता अँनिमेटेड व्हिडिओ रूपात

8
सचिनमय

साधारण २० वर्षांपूर्वी सागरिका म्युझिकने ‘सचिनमय ‘ नावाचा एक मराठी अल्बम रिलीज केला होता. या अल्बम मधील सर्व गाणी सचिन पिळगावकरांनी गायलेली होती आणि म्हणूनच अल्बम देखील ‘सचिनमय ‘ या नावानेच रिलीज केला गेला. 

या अल्बममधील वसंत बापट, दादा कोंडके, गो.नि.दांडेकर आणि संत नामदेव यांनी लिहिलेल्या गीतांना जितेंद्र कुलकर्णी यांनी संगीत दिलं होतं. सगळीच गाणी हि लोकसंगीताचा बाज असलेली, पण प्रत्येक गाणं हे अगदी वेगळं.

या अल्बम मधीलच गो.नि.दांडेकरांनी लिहिलेलं ‘धनगर राजा’ हे गाणं आता नव्याने सोशल मीडियावर लोकप्रिय होतंय आणि म्हंणूनच फक्त ऑडिओ स्वरूपात असलेलं हे गाणं आता व्हिडिओ स्वरूपात प्रेक्षकांसाठी आणण्याचं सागरिका म्युझिकने ठरवलं.

====

हे देखील वाचा: ११ लाखांची पैठणी पाहायची उत्सुकता – आदेश बांदेकर

====

गुढी पाडव्याला या गाण्याचा अँनिमेटेड व्हिडिओ सागरिका म्युझिकच्या मराठी युट्युब चॅनेल वर रिलीज केला गेला. मराठी मधील हा बहुतेक पहिलाच संपूर्ण अँनिमेटेड म्युझिक व्हिडीओ असेल.

सचिनजींनी पुन्हा एकदा त्यांच्यातल्या हरहुन्नरी कलाकाराचा प्रत्यय त्यांच्या गाण्यांतून दिला आहे. ‘सचिनमय’ या अल्बम मधील सर्वच गाणी हि लोकगीताच्या बाजाची आहेत.

====

हे देखील वाचा: मराठमोळ्या संदीपचा कॅनडामध्ये डंका

====

जसं शेतकरी गीत, कोळीगीत, पेंद्याने आपल्या मित्रासाठी म्हणजेच श्रीकुष्णासाठी गायलेलं बोबडा गीतं, आणि धनगर राजा हे गीत. आणि हे प्रत्यक गीत सचिनजींनी त्या त्या गाण्याच्या बाजानुसार गायलं आहे, म्हणूनच हा अल्बम  ‘सचिनमय’ आहे. सचिनजींच्या आवाजातील धनगर राजाची हि गोष्ट लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना ऐकायला आणि पाहायला नक्कीच आवडेल.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Sulakshana Pandit
मनोरंजन

Sulakshana Pandit : अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचे निधन, ‘या’ अभिनेत्यासाठी राहिल्या आजन्म अविवाहित

ऑक्टोबर महिन्यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी आपला निरोप घेतला. हा सिलसिला नोव्हेंबरमध्ये देखील...

Cricket
क्रीडामनोरंजन

Cricket : कोण आहे स्टार क्रिकेटपटू स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छल?

भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला आणि सगळीकडे एकच जल्लोष झाला. आधी...

Tejaswini Lonari
मनोरंजन

Tejaswini Lonari : अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने गुपचूप उरकला साखरपुडा; बड्या नेत्याची होणार सून

सध्या मराठी मनोरंजनविश्वामधे लग्नसराईचे दिन आल्याचे चित्र आहे. अनेक मराठी कलाकार साखरपुडा...

Asarani
मनोरंजन

Asarani : दिग्गज हिंदी चित्रपट अभिनेते असरानी यांचे दुःखद निधन

हिंदी सिनेमात असे खूप कमी कलाकार होऊन गेले किंवा आहेत ज्यांचे केवळ...