Home प्रेस रिलीझ अखेर तो क्षण आलाच, ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेत संपन्न होणार नेहा आणि यशाचा साखरपुडा
प्रेस रिलीझ

अखेर तो क्षण आलाच, ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेत संपन्न होणार नेहा आणि यशाचा साखरपुडा

8
Mazhi Tuzhi Reshimgath

मालिका आणि प्रेक्षक यांचे खूपच जुने आणि खोल नाते आहे. मालिकांशिवाय मनोरंजनाची कोणी कल्पनाच करू शकत नाही, संध्याकाळ झाली आपोआप सर्वांच्या नजर टीव्ही मालिकांकडे वळतात. सध्याच्या घडीला मराठी मालिकाविश्वात गाजणारी मालिका म्हणजे ‘माझी तुझी रेशीमगाठ’. (Mazhi Tuzhi Reshimgath) प्रार्थना बेहरे आणि श्रेयस तळपदे यांची मुख्य भूमिका असलेल्या या मालिकेने खूपच कमी काळात प्रेक्षकांच्या मानवर चांगलेच गारुड निर्माण केले आहे.

प्रार्थना आणि श्रेयससोबत मालिकेत छोट्या परीची भूमिका साकारणाऱ्या मायराने देखील सगळ्याचे लक्ष वेधून घेतले आहे. एक अनोखी आणि सुंदर प्रेमकथा असणाऱ्या या मालिकेत आता एक सुखद वळण आले आहे. ज्या दिवसाची प्रेक्षकांना अनेक महिन्यांपासून प्रतीक्षा होती तो दिवस अखेर आला आहे.

मालिकेत लवकरच नेहा अर्थात प्रार्थना आणि यश अर्थात श्रेयस यांचा साखरपुडा संपन्न होणार आहे. या दोघांच्या केमिस्ट्रीने आणि आकर्षक प्रेमकहाणीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. अतिशय रंजक वळणं घेत आता या मालिकेत यश आणि नेहा साखरपुडा करणार आहे. नुकतेच आजोबानी ते परीला दत्तक घेणार असल्याचे सगळ्यांना सांगितले आणि नेहा, यशला मोठा धक्काच बसला.

====

हे देखील वाचा: ZEE5 ओरिजनल सिरीज ‘द ब्रोकन न्यूज’ चा जबरदस्त ट्रेलर रिलीज

====

आजोबांचा हा निर्णय ऐकून यश त्यांना सर्व खरं सांगत परी ही नेहाचीच मुलगी असल्याचे सत्य सांगतो. त्यानंतर काही गोष्टी घडतात आणि आजोबा यश आणि नेहाच्या लग्नाला परवानगी देत त्यांचा साखरपुडा करण्याचा निर्णय घेतात. लवकरच मालिकेत प्रेक्षकांना यश आणि नेहाचा साखरपुडा पाहायला मिळणार आहे.

सध्या सोशल मीडियावर या दोघांच्या साखरपुड्याचे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहे. चॅनेलने देखील त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून या दोघांच्या साखरपडूयाचे काही फोटो पोस्ट केले आहे. या दोघांचा लूक देखील कमालीचा चर्चेत आला आहे. दोघांचाही पारंपरिक लूक खूपच गाजत असून लोकांनाही तो खूपच आवडत आहे.

प्रार्थनाने हिरव्या रंगाची साडी आणि त्यावर सिल्वर रंगाचे दागिने घातले आहे. तर श्रेयसने मोतिया रंगाचा कुर्ता आणि त्यावर हिरव्या रंगाचे जॅकेट घातले असून, छोट्या परीने लाल रंगाचा ड्रेस घातला आहे. हे तिघेही या ड्रेसमध्ये खूपच सुरेख दिसत आहे.

====

हे देखील वाचा: करण जोहरच्या पार्टीत ब्रालेटवर ब्लेझर घालून आलेल्या मलायकाला नेटकऱ्यांनी केले ट्रोल 

====

मात्र मालिकेत नेहा आणि यश यांचा साखरपुडा होऊ नये यासाठी सिम्मी नक्कीच काहीतरी कट कारस्थान करणार आता या सर्व कट कारस्थानांमधून कसा नेहा आणि यश यांचा साखरपुडा संपन्न होतोय हे बघणे नक्कीच मजेशीर असणार आहे. मात्र नेहा लंडनला गेल्यानंतर यशने परीला पॅलेसमध्ये राहायला नेल्यावर परीने घरातील सर्वांचीच मनं जिंकून घेतली असून, प्रत्येकालाच तिच्याबद्दल एक जिव्हाळा वाटू लागला आहे.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Mohanlal
प्रेस रिलीझ

Mohanlal : मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांना ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ जाहीर

नुकताच दादासाहेब फाळके पुरस्काराची घोषणा करण्यात आली. यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जेष्ठ...

Ghibli
प्रेस रिलीझलाईफ स्टाईलव्यक्ती विशेष

Ghibli : घिबली आर्ट म्हणजे काय? कोण आहे Ghibli ॲनिमेशनचे जनक?

सध्या सोशल मीडिया उघडल्या उघडल्या आपले स्वागत करतात ते आपल्याच लोकांचे अतिशय...

Vijay Sethupathi
प्रेस रिलीझ

शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटात ‘या’ अभिनेत्याची होणार खास एन्ट्री

बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानने (Shah Rukh Khan) 2023 मध्ये आपले नाव कोरले...

Vitthala Tuch
प्रेस रिलीझ

प्रेमाचा आविष्कार घेऊन ‘विठ्ठला तूच’ चित्रपट लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीस

विठ्ठला तूच हे ऐकताच आपल्याला आठवण येते ती आपल्या भगवान विठ्ठलाची. सर्वांच्या...