Home लाईफ स्टाईल The Mystery of Dhanatrayodashi: समुद्र मंथनातून प्रकटले भगवान धन्वंतरी, वाचा ही पौराणिक कथा
लाईफ स्टाईल

The Mystery of Dhanatrayodashi: समुद्र मंथनातून प्रकटले भगवान धन्वंतरी, वाचा ही पौराणिक कथा

14
The Mystery of Dhanatrayodashi
The Mystery of Dhanatrayodashi

The Mystery of Dhanatrayodashi : दिवाळीच्या सणातील पहिला आणि सर्वात शुभ दिवस म्हणजे धनत्रयोदशी, ज्याला आपण धनतेरस म्हणूनही ओळखतो. हा दिवस केवळ सोनं,चांदी किंवा भांडी खरेदीसाठी नाही, तर त्यामागं एक अतिशय सुंदर पौराणिक कथा दडलेली आहे. हिंदू धर्मग्रंथांनुसार, धनत्रयोदशीचा दिवस आरोग्य, संपत्ती आणि दीर्घायुष्याचं प्रतीक आहे. या दिवशी भगवान धन्वंतरी यांचा जन्म झाल्याचं मानलं जातं आणि म्हणूनच या दिवसाला विशेष महत्त्व दिलं जातं. (The Mystery of Dhanatrayodashi )

Dhanvantari
Dhanvantari

पुराणांनुसार, एके काळी देव आणि दानव यांच्यात समुद्र मंथन झालं. या मंथनातून अनेक अद्भुत वस्तू आणि देवता प्रकट झाल्या. त्यापैकीच एक होते भगवान धन्वंतरी, जे हातात अमृताचा कलश घेऊन प्रकट झाले. ते भगवान विष्णूंचं अवतार मानले जातात आणि आरोग्याचे अधिपती आहेत. या घटनेमुळे धनत्रयोदशीला आरोग्य व अमरत्वाचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळेच या दिवशी लोक आरोग्य, समृद्धी आणि दीर्घायुष्यासाठी भगवान धन्वंतरि यांची पूजा करतात.

या दिवसाचं आणखी एक विशेष कारण म्हणजे धन म्हणजे संपत्तीचं पूजन. धनतेरस या शब्दातच धन म्हणजे संपत्ती आणि तेरस म्हणजे तेरावा दिवस. दिवाळीपूर्वीच्या या तेराव्या दिवशी सुवर्ण, चांदी, भांडी किंवा नवीन वस्तू खरेदी केल्यास वर्षभर समृद्धी लाभते, असा विश्वास आहे. म्हणूनच या दिवशी बाजारपेठा आणि सोनारांच्या दुकानांमध्ये मोठी गर्दी दिसते. अनेक घरांमध्ये कुबेर आणि लक्ष्मी देवी चीही पूजा केली जाते.

पौराणिक कथेनुसार, समुद्र मंथनातून धन्वंतरी देवांनी अमृतासोबत आयुर्वेदाचं ज्ञान ही मानवजातीला दिलं. म्हणूनच त्यांना वैद्यांचा देवता म्हटलं जातं. या दिवशी अनेक ठिकाणी आरोग्यदिवस म्हणूनही साजरा केला जातो. काही लोक भगवान धन्वंतरि यांची प्रतिमा ठेवून त्यांना तुलसीदल, दीपदान आणि आरोग्यवर्धक वस्तू अर्पण करतात. या दिवशी शरीर आणि मनाचं शुद्धीकरण करण्याचंही विशेष महत्त्व सांगितलं जातं.

==================

हे देखील वाचा :

Indian stock market : भारतीय शेअर बाजाराचा पहिला बिगबुल प्रेमचंद रॉयचंद जैन यांची प्रेरणादायी कहाणी                                    

 Dhanteras : जाणून घ्या धनत्रयोदशी या सणाचे महत्व                                    

Diwali : जाणून घ्या अभ्यंगस्नानाची माहिती आणि उटणे लावण्याचे फायदे            

=====================

धनतेरस हा फक्त खरेदीचा सण नाही, तर आरोग्य आणि आयुष्याचा उत्सव आहे. घरात दीप प्रज्वलित करून आणि भगवान धन्वंतरी यांचं स्मरण करून आपण आरोग्य, आनंद आणि समृद्धीची प्रार्थना करतो. दिवाळीच्या आनंदयात्रेला सुरूवात करणारा हा दिवस आपल्याला शिकवतो की खरा धन म्हणजे आरोग्य आणि तेच सर्वात मोठं सुख आहे.(The Mystery of Dhanatrayodashi)

Latest Marathi News | News in Marathi |  Live news Updates in Marathi on Trending Topics

Recent Posts

Related Articles

Tourism
लाईफ स्टाईल

Tourism : स्लीप टुरिझम म्हणजे काय? काय आहे हा नवा ट्रेंड?

प्रत्येक व्यक्तीच्या उत्तम आरोग्यासाठी सकस आहार, उत्तम व्यायाम जेवढा आवश्यक आहे, तेवढीच...

Chaturthi
लाईफ स्टाईल

Chaturthi : नोव्हेंबर महिन्यातील संकष्टी चतुर्थी कधी आहे? जाणून घ्या चतुर्थीचे महत्त्व आणि पूजाविधी

आपल्या सर्वांचे आराध्य दैवत म्हणजे गणपती. या गणेशाची आपण कायमच आराधना करत...

Lord Shiv
लाईफ स्टाईल

Lord Shiv : का महादेवाने सर्वेश्वर अवतार घेत केले भगवान नरसिंहाशी युद्ध?

भगवान शिव आणि भगवान विष्णू यांची एकत्र पूजा करण्याचा आणि आराधना करण्याचा...

Indian Sweets | Top Marathi Headlines
लाईफ स्टाईल

Indian Sweets : मिठाईवर लावल्या जाणाऱ्या सोने, चांदीच्या वर्खची रंजक माहिती

आपल्या देशामध्ये कोणताच लहान मोठा सण, समारंभ, पूजा मिठाईशिवाय पूर्ण होत नाही....