इस्रायल-इराण युद्धामध्ये इराणमधून पळून गेलेल्या पहलवी या राजघराण्याची चर्चा पुन्हा चर्चा सुरु झाली आहे. यात सर्वात अधिक चर्चा होत आहे, ती इराणची शेवटची सम्राज्ञी असलेल्या फराह पहलवी हिची. 87 वर्षाच्या फराह पहलवी आता अमेरिका आणि फ्रान्समध्ये आपल्या नातींसोबत रहात आहेत. फराहचं आयुष्य एखाद्या कथेसारखं आहे. समृद्ध इराणी घरात तिचा जन्म झाला. पण वडिलांच्या मृत्यूनंतर घरावर हलाखीचे दिवस आले. अशात समाजसेवी संस्थेच्या मदतीनं तिचे शिक्षण झाले. अनेक परकीय भाषांमध्ये बोलणारी फराह दिसायला अत्यंत सुंदर होती. पॅरिसमधील विद्यापीठात ती वास्तुकलेचा अभ्यास करीत होती. (Farah Pahlavi)

सोबत इराणी दूतावासात ती कामही करत होती. इथेच तिची भेट तिच्यापेक्षा वीस वर्षांनी मोठ्या असलेल्या इराणच्या शाहबरोबर झाली. शाहंच्या आधी दोन पत्नी होत्या. पण त्यांना गादीचा वारस मिळाला नव्हता. 1959 मध्ये या दोघांचेही लग्न झाले. तेव्हा फराहने युरोपमधील प्रसिद्ध ड्रेस डिझायरनं तयार केलेले आधुनिक कपडे घातले होते. तिचा मुकुटही करोडोंचे हिरे लावलेला होता. परिकथेतील विवाह, म्हणून या विवाहाची अनेक महिने चर्चा झाली. फराह सम्राज्ञी झाली आणि तिनं गादीला वारसही दिला. या शाही दांम्पत्याला चार मुलं झाली. इराणची साम्राज्ञी म्हणून फराहनं अनेक समाजोपयोगी उपक्रम सुरु केले. शिक्षण संस्था सुरु केल्या. मुलींसाठी विज्ञान आणि वैद्यकीय संस्था सुरु केल्या. सोबतच तिची शाही रहाणी आणि महागडे आधुनिक कपडे अधिक चर्चेत आले.
यातच शाह यांनी 1971 मध्ये एक शाही पार्टी दिली. त्यात फराहच्या ड्रेसला सोन्याची कलाकुसर होती. नंतर याच पार्टीमुळे राजपरिवाराला स्वतःच्या देशात रहाणे मुश्किल झाले. शेवटी 1979 मध्ये मृत्युदंडाच्या भीतीमुळे या कुटुंबानं इराण सोडला. इजिप्तनं या राजपरिवाराला आसरा दिला. इथेच इराणच्या शाहचा मृत्यू झाला. शाहंच्या निधनानंतर इराणची शेवटची साम्राज्ञी धर्मादाय संस्थांमध्ये व्यस्त झाली. वॉशिंग्टन आणि पॅरिसमध्ये सध्या फराह पहलवी रहात आहे. वयाच्या 87 टप्प्यावर असलेल्या या साम्राज्ञीला आजही आपल्या देशात परत जाण्याची आशा आहे. इराणमधील खामेनींची सत्ता उलथून टाकण्यासाठी ही वयोवृद्ध साम्राज्ञीही आपल्या जनतेला आवाहन करत आहे. सध्या अमेरिकेच्या वॉशिंग्टनमध्ये रहात असलेल्या फराह पहलवी या इराणच्या माजी सम्राज्ञीची चर्चा सध्या सुरु आहे. गेल्या आठवड्यापासून ही साम्राज्ञी आपल्या देशातील अस्थिरता सोशल मिडिया आणि बातम्यांमधून बघत आहे. इराणच्या या साम्राज्ञीनं सुरु केलेल्या अनेक संस्था आजही आहेत. (Farah Pahlavi)
सोबतच साम्राज्ञीनं महिलांसाठी केलेल्या कार्याचा उल्लेख आजही इराणमध्ये गौरवानं करण्यात येतो. फराह दिबा यांचा जन्म 14 ऑक्टोबर 1938 रोजी तेहरानमध्ये एका उच्चवर्गीय कुटुंबात झाला. वडिलांच्या मृत्यूनंतर मात्र मोठा व्हिला सोडून साध्या घरामध्ये फराहचे कुटुंब राहू लागले. तेहरानमधील इटालियन शाळेत तिचे शिक्षण झाले. फराह शाळेच्या बास्केटबॉल संघाची कर्णधार होती. त्यानंतर शिष्यवृत्तीवर ती पॅरिसमधील डी’आर्किटेक्चरमध्ये वास्तुकलेचे शिक्षण घेण्यासाठी दाखल झाली. पॅरिसमध्येच तिची आणि इराणचे राजे, मोहम्मद रजा पहलवी यांची भेट झाली. त्यानंतर काही महिन्यातच 21 वर्षाच्या फराहचे 21 डिसेंबर 1959 रोजी 41 वर्षीय शाह मोहम्मद रझा यांच्याबरोबर लग्न झाले. जगभरातील राजघराण्याचे सदस्य या लग्नाला उपस्थित होते. आपल्या तिस-या लग्नात शाह मोहम्मद यांनी अरबो रुपये खर्च केले. फराहला युवराज रेझा पहलवी, राजकुमारी नूर पहलवी, राजकुमारी इमान पहलवी, राजकुमारी फराह पहलवी अशी चार मुलं झाली. (International News)
इराणध्ये 1979 मध्ये इस्लामिक क्रांती झाली. तोपर्यंत फराह पहलवीने इऱाणमध्ये मोठे समाजकार्य केले होते. शिक्षण आणि आरोग्य-सेवा संस्थांमध्ये तिचा मोठा वाटा होता. पहलवी विद्यापीठ ज्याचे नाव बदलून आता शिराज विद्यापीठ ठेवण्यात आले आहे, त्याची स्थापना फराहच्या पुढाकारानं झाली. हे इराणमधील पहिले अमेरिकन-शैलीचे विद्यापीठ होते. याशिवाय कुटुंब कल्याण संघटना, मुलींसाठी व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र, रक्त संक्रमण संघटना, र्करोगाविरुद्ध लढण्यासाठी संघटना, मुलांच्या बौद्धिक विकासासाठी, इराणी लोकगीत संघटना, विज्ञान अकादमी, राष्ट्रीय संग्रहालय आदी अनेक संस्थांची स्थापना फराह पहलवी यांनीच इराणमध्ये केली. त्यातील अनेक संस्था आजही दिमाखानं सुरु आहेत. (Farah Pahlavi)

फराह साम्राज्ञी असली तरी ती सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत आपल्या या सर्व संस्थांच्या कार्यात व्यस्त असायची. या काळात इराणच्या अतीदुर्गम भागातही तिनं प्रवास केला. एका राणी म्हणून फराहला जेवढी लोकप्रियता लाभली तेवढी तिथल्या कुठल्या राजालाही लाभली नाही. 1967 मध्ये शाह मोहम्मद यांनी तिला साम्राज्ञीपद बहाल केले आणि तिचे हिरेजडीत मुकुट परिधान केलेले फोटो जनतेसमोर आले. त्यावेळी फराहच्या सौंदर्यापुढे सर्वच सौंदर्यसम्राज्ञी फिक्या वाटत होत्या. इराणध्ये राजेशाहीविरोधात आंदोलन सुरु झाले तरी, फराह पहलवीबद्दल इराणी नागरिकांमध्ये विशेषतः महिलांमध्ये आत्मियता होती. राजकुटुंबाला 1979 मध्ये इजिप्तनं आपल्या देशात रहाण्याची परवानगी दिली. इजिप्तमध्येच 27 जुलै 1980 रोजी शाह मोहम्मद यांचा मृत्यू झाला. त्यानंतर फराह आपल्या मोठ्या मुलासह अमेरिकेत निर्वासीत म्हणून राहू लागली. (International News)
================
हे देखील वाचा : Charlie Chaplin : आणि चार्ली चॅपलिनची डेड बॉडीच किडनॅप झाली !
Israel And Iran : पक्के मित्र असलेले इस्रायल आणि इराण शत्रू का झाले !
================
आता ती पॅरिसमधील अल्झायमर रोगासाठी आंतरराष्ट्रीय निधी उभारणीसाठी मदत करते. 2003 मध्ये फराहने मोहम्मद शाहबरोबर झालेल्या तिच्या लग्नाबद्दल ‘अॅन एंड्युरिंग लव्ह: माय लाइफ विथ द शाह’ हे पुस्तक लिहिले. हे युरोपमध्ये सर्वाधिक विक्री होणारे पुस्तक ठरले. 2009 मध्ये, पर्शियन-स्वीडिश दिग्दर्शक नाहिद पर्सन सर्वेस्तानी यांनी फराह पहलवीच्या जीवनावर द क्वीन अँड आय चित्रपट काढला. फराह आत्ताही दरवर्षी इजिप्तचा दौरा करते. शाह मोहम्मद यांच्या कबरीजवळ जाऊन प्रार्थना करते, आणि आपल्या मुळ देशात परत जाण्याचा निर्धार व्यक्त करते. सध्या इराणमध्ये खामेनीविरोधात जो असंतोष आहे, त्याला आधार देत, तिनं इराणी जनतेला आंदोलन छेडण्याचे आवाहन केले आहे. 87 वर्षाच्या या इराणच्या शेवटच्या साम्राज्ञीला आपल्या आयुष्यात एकदातरी पुन्हा इराणमध्ये जायचे आहे. तिची इच्छा पूर्ण होते का हे लवकरच समजणार आहे. (Farah Pahlavi)
सई बने
- Academy of Sciences
- America
- BJP
- Blood Transfusion Organization
- china
- congress
- cricket
- eknath shinde
- Entertainment
- Family Welfare Organization
- For the Intellectual Development of Children
- india
- information
- International news
- iran
- iran israel war
- iran israel war 2025
- iran israel war trending news
- Iranian Folk Song Organization
- israel
- Latest International News
- latest marathi news
- latest marathi updates
- latest social updates
- Maharashtra
- maharashtra politics
- Marathi News
- Mumbai
- Nahid Persson Sarvestani
- Narendra Modi
- National Museum
- News
- No Enduring Love: My Life with the Shah
- Organization for Fighting Diseases
- Pakistan
- Political News
- political updates
- Politician
- Politics
- Prince Reza Pahlavi
- Princess Farah Pahlavi
- Princess Iman Pahlavi
- Princess Noor Pahlavi
- Social News
- Social Updates
- todays marathi headlines
- Todays Marathi News
- Top Stories
- Uddhav Thackery
- Vocational Training Center for Girls
- राजकारण