Home गाजावाजा स्पेशल अमेरिकेत दिला अनोख्या पद्धतीने मृत्यूदंड
गाजावाजा स्पेशल

अमेरिकेत दिला अनोख्या पद्धतीने मृत्यूदंड

10
America

काचेच्या खोलीमधील एका बेडवर दोरीनं बांधलेली व्यक्ती.  काही वेळातच त्या व्यक्तीला एका नळीवाटे विशिष्ट वायू दिला जातो.  हा वायू पोटात गेल्यावर काही सेकंदातच ती व्यक्ती झटके देऊ लागते. तिला मृत्यू समोर दिसू लागतो. शरीराला अनंत वेदना होतात.  पण तोंडाला लावलेल्या मास्कमुळे त्याचा आवाज बाहेर जात नाही की, हातपय घट्ट बांधल्यामुळे त्याला बेडवरुन उठता येत नाही.  तब्बल 22 मिनिटांपर्यंत ही झटपट केल्यावर अखेर त्या व्यक्तीचा मृत्यू होतो. एखाद्या चित्रपटासारखी वाटणारी ही कथा प्रत्यक्षात घडली आहे, ती अमेरिकेमध्ये. (America)

अमेरिकेमध्ये (America) 58 वय असलेल्या केनेथ यूजीन स्मिथला एका महिलेच्या हत्येवरुन दोषी ठरवण्यात आले होते.  या केनेथला मृत्यूदंडाची शिक्षा मिळाली.  मात्र हा त्याचा मृत्यू नायट्रोजन वायूच्या सहाय्यानं झाला.  नायट्रोजन वायूच्या प्रयोगानं अशा पद्धतीनं दिलेला हा अमेरिकेतील पहिला मृत्यूदंड होता.  त्यामुळेच अशा पद्धतीनं मरणा-या व्यक्तीला पाहण्यासाठी तिथे काही आमंत्रितांना बोलवण्यात आले होते.  त्यात धर्मगुरु आणि पत्रकार, वकिलही होते.  तसेच मृत्यूदंड झालेल्या केनेथची पत्नी आणि इतर नातेवाईकही होते. 

या सर्व प्रकारानं उपस्थितांच्या मनावर अतिशय वाईट परिणाम झाला आहे.  ही शिक्षा बघत असलेल्या धर्मगुरुंनी माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट गोष्ट असे वर्णन केले आहे.  तर केनेथच्या पत्नीलाही जबर धक्का बसला आहे.  विशेष म्हणजे, तिथे उपस्थित असलेल्या पोलीस अधिका-यांनाही ती 22 मिनिटे अतिशय तणावाची होती.  त्यामुळे या सर्व पद्धतीवर टिकेची झोड उठवण्यात येत आहे.  मानवाधिकार संघटना यासाठी पुढे आली असून ही मृत्यूदंडाची पद्धत बंद करावी अशी मागणी करण्यात आली आहे.  

अमेरिकेच्या (America) इतिहासात प्रथमच एका आरोपीला नायट्रोजन वायूच्या आधारानं मृत्यू द्यावा अशी शिक्षा सुनवण्यात आली.  ही शिक्षा दिल्यापासून अमेरिकेत यावर चर्चा सुरु झाली होती.  काहींनी अशा पद्धतीमध्ये कैद्याला कमीत कमी त्रास होऊन त्याचा मृत्यू होईल असा दावा केला होता.  तर काहींनी ही अमानवी पद्धत असल्याची टिका केली होती.  मात्र प्रत्यक्षात नायट्रोजन वायू दिल्यावर या व्यक्तिचा मृत्यू कसा होतो, हे जेव्हा तिथे उपस्थित असलेल्यांनी बघितले तेव्हा त्यांना कमालीचा धसका बसला आहे.  

अमेरिकेच्या अलाबामामध्ये केनेथ यूजीन स्मिथ याला नायट्रोजन वायू देऊन मृत्यूदंड देण्यात आला. केनेथ स्मिथला मृत्यूदंड देतांना घटनास्थळी धर्मगुरु, पत्रकार आणि त्याची बायकोही उपस्थित होती. या घटनेमुळे या सर्वांना जबर धक्का बसला आहे.  कारण मृत्यूच्या वेळी केनेथला प्रचंड वेदना झाल्या.  धर्मगुरु जेफ हूड  यांनी ही आपल्या आयुष्यातील सर्वात भयानक घटना असल्याचे सांगितले आहे.  तो क्षण  मी कधीच विसरणार नाही.  केनेथला नायट्रोजन वायू दिल्यावर त्याचा काही क्षणात मृत्यू होईल असे उपस्थित अधिका-यांनी सांगितले होते. मात्र ते साफ खोटं होतं.  केनेथ पाण्याबाहेर आलेल्या एखाद्या माशासारखा तडफडत होता.  त्याला प्रचंड वेदना होत असल्याचे धर्मगुरुंनी सांगितले.  पत्रकार चॅंडलर यांनीही ही अमानवी पद्धत असल्याचे सांगितले.  

शिक्षेच्यावेळी केनेथला एका काचेच्या खोलीमध्ये ठेवण्यात आले होते.  त्या खोलीला चारही बाजुनं पडदे होते. केनेथला त्या खोलीत ठेवल्यावर हे पडदे उघडण्यात आले.  तेव्हा  त्याच्यावर पांढरी चादर पांघरलेली होती. निळ्या रंगाच्या रेस्पिरेटर मास्कने त्याचा चेहरा कपाळापासून हनुवटीपर्यंत झाकलेला होता. या मास्कमध्ये फेस शील्ड आणि प्लास्टिकची नळी होती जी एका छिद्रातून जवळच्या कंट्रोल रूमला जोडलेली होती. काही क्षणात केनेथच्या मृत्यूचे वॉरंट वाचण्यात आले. केनथला बोलण्याची संधी देण्यात आली. (America)

============

हे देखील वाचा : वॉटर फास्टिंगमुळे खरंच वजन कमी होते…?

============

मानवतेला एक पाऊल मागे घेऊन जात असलेला दिवस हे वाक्य केनेथ बोलला आणि उपस्थित असलेल्या आपल्या कुटुंबियांकडे आय लव्ह यू असे चिन्ह केले.  त्यानंतर केनेथला मास्कद्वारे नायट्रोजन वायू देण्यात आला.  हा वायू पोटात गेल्यावर सेकंदाच त्याचे शरीर झटके देऊ लागले.  साधारण 22 मिनिटे ही त्याची तडफड झाल्याची माहिती आहे.  हा सर्व प्रकार समोर बघणारी केनेथची पत्नी जोरजोरत ओरडत होती.  तर तेथील अधिकारीही अस्वस्थ झाले होते.  प्रत्यक्षात केनेथचा मृत्यू काही सेकंदातच होईल अशी अपेक्षा होती,  मात्र त्याच्या मृत्यूला 22 मिनिटे लागली. त्यामुळे उपस्थितांना मोठा तणाव सहन करावा लागला.  हा सर्व प्रकार प्रत्यक्ष पहाणा-यांवर आता मानसिक परिणाम झाला आहे.  (America)

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार, युरोपियन युनियन यांनी नायट्रोजन वायूचा वापर करून कैद्याला फाशी दिल्याचा निषेध केला आहे.  दुसरीकडे, अलाबामाच्या अधिकाऱ्यांनी नायट्रोजन वापरून अंमलबजावणी करण्याच्या पद्धतीचा बचाव केला.  अमेरिकेत 1982 पासून फाशीच्या गुन्ह्यांना विष टोचून मारण्याची पद्धत सुरू करण्यात आली. मृत्यूदंड देण्यासाठी ही पद्धत अमेरिकेत आजही अवलंबली जाते.  त्यात आता नायट्रोजन श्वास घेत मृत्यूदंड देण्याच्या पद्धतीची भर पडली आहे.

सई बने

Recent Posts

Related Articles

Sade Sati
गाजावाजा स्पेशल

Sade Sati : जाणून घ्या नक्की शनीची साडेसाती म्हणजे काय?

भारतात ज्योतिषशास्त्राचे मोठे महत्त्व आहे. ज्योतिष्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची संख्या भारतात सर्वाधिक...

Vande Mataram
गाजावाजा स्पेशल

Vande Mataram : ‘वंदे मातरम्’ गीताला १५० वर्षे पूर्ण

भारत जगातील सर्वात लोकप्रिय देश. आज भारताचा संपूर्ण जगामध्ये डंका वाजत आहे. ...

Royal Stories
गाजावाजा स्पेशल

Royal Stories : 365 राण्या आणि न्यूड पार्टी करणारा भारतीय राजा!

एक असा राजा ज्याच्या वर्षात जितके दिवस असतात तितक्या राण्या होत्या, त्याच्यासोबत...

Ganpati
गाजावाजा स्पेशल

Ganpati : ‘या’ गावात भाद्रपदात नाही तर चक्क लक्ष्मीपूजनाला होते गणेशाची स्थापना

भाद्रपद महिना जवळ येऊ लागला की, सगळ्यांना वेध लागतात ते गणेश चतुर्थीचे....