Home आरोग्य Alert: १८ वर्षांनंतर समोर आले दुर्मिळ ‘मंकीपॉक्स इन्फेक्शन’चे प्रकरण, सविस्तर जाणून घ्या त्याची लक्षणे आणि कारणे
आरोग्य

Alert: १८ वर्षांनंतर समोर आले दुर्मिळ ‘मंकीपॉक्स इन्फेक्शन’चे प्रकरण, सविस्तर जाणून घ्या त्याची लक्षणे आणि कारणे

10
monkey pox
monkey pox

जगभरातील सर्व देशांमध्ये कोरोना संसर्गाची प्रकरणे पुन्हा वाढत असताना, तिसऱ्या लाटेची भीती तीव्र झाली आहे. संपूर्ण जग अजूनही या भयंकर महामारीने हैराणच होते की, या सगळ्यामध्ये रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राने (CDC) लोकांची चिंता आणखी वाढवली आहे. सीडीसीनुसार, अमेरिकेतील टेक्सास शहरात ‘मंकीपॉक्स व्हायरस इन्फेक्शन’चे दुर्मिळ प्रकरण समोर आले आहे. यापूर्वी २००३ मध्ये अमेरिकेतील काही शहरांमध्ये मंकीपॉक्सचा उद्रेक झाला होता. सीडीसीने शेअर केलेल्या माहितीनुसार, ज्या व्यक्तीला मंकीपॉक्स झाल्याची पुष्टी झाली आहे, तो नुकताच नायजेरियातून अमेरिकेत गेला होता. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या इतर अनेक लोकांना देखील संसर्गाचा धोका असू शकतो. याचा अधिक तपास केला जात आहे.(monkey pox)

आरोग्य तज्ञांच्या मते, दुर्मिळ मंकीपॉक्स व्हायरस हा चिकनपॉक्स व्हायरस फॅमिलीशी संबंधित आहे. याचे संक्रमण देखील खूप गंभीर असू शकते. हा संसर्ग संक्रमित व्यक्तीच्या शरीरावरील मोठ्या फोडांच्या आधारे ओळखला जाऊ शकतो. या गंभीर आणि दुर्मिळ संसर्गाबद्दल सविस्तर जाणून घेऊया.(monkey pox)

काय आहे मंकीपॉक्स संसर्ग?

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार (WHO), १९७९ मध्ये मानवांमध्ये मंकीपॉक्स संसर्गाची प्रकरणे प्रथम नोंदवली गेली होती. तेव्हापासून ११ आफ्रिकन देशांमध्ये या संसर्गाची पुष्टी झाली. २००३ मध्ये आफ्रिकन देश सोडून अमेरिकेतही मंकीपॉक्सच्या संसर्गाची पुष्टी झाली होती. आता १८ वर्षांनंतर २०२१ मध्ये ही पहिली घटना समोर आली आहे. अहवालानुसार, २००३ मध्ये, घानामधून आयात केलेल्या पाळीव कुत्र्यांच्या संपर्कामुळे अमेरिकेत हा संसर्ग पसरला. मात्र, भारतासह आशियाई देशांमध्ये अशा प्रकरणांची पुष्टी अद्याप झालेली नाही.(monkey pox)

आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, मंकीपॉक्सचा संसर्ग संक्रमित प्राण्यांचे रक्त, शारीरिक द्रव किंवा त्यांच्या त्वचेच्या जखमांच्या संपर्काद्वारे मानवांमध्ये पसरतो. हा संसर्ग मुळात कोणत्या प्राण्याशी संबंधित आहे, हे शास्त्रज्ञांना स्पष्ट माहीत नाही.

मंकीपॉक्स संसर्गाची लक्षणे काय आहेत? 

डब्ल्यूएचओच्या मते, मंकीपॉक्स संसर्गाचा उष्मायन कालावधी सामान्यतः ६ ते १३ दिवसांचा असतो. मात्र काही लोकांमध्ये तो ५ ते २१ दिवसांपर्यंत असू शकतो. संसर्ग झालेल्या व्यक्तीला ताप, तीव्र डोकेदुखी, लिम्फॅडेनोपॅथी (लिम्फ नोड्सची सूज), पाठ आणि स्नायू दुखणे यासह अशक्तपणा येऊ शकतो. सूजलेल्या लिम्फ नोड्सची समस्या, हे सर्वात सामान्य लक्षण मानले जाते. याशिवाय रुग्णाच्या चेहऱ्यावर आणि हात-पायांवर मोठ्या आकाराचे पुरळ येऊ शकतात. काही गंभीर संक्रमणांमध्ये, हे पुरळ डोळ्याच्या कॉर्नियावर देखील परिणाम करू शकतात.

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, मंकीपॉक्समुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या ११ टक्क्यांपर्यंत असू शकते. संसर्ग झालेल्या लहान मुलांना मृत्यूचा धोका जास्त असतो.(monkey pox)

=====

हे देखील वाचा – कोरोना महामारी नंतर पसरतोय ‘हा’ संसर्गजन्य रोग,कशी घ्याल काळजी ?

=====

मंकीपॉक्स संसर्गाची कारणे काय आहेत? 

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, हा संसर्ग मंकीपॉक्स नावाच्या व्हायरसमुळे होतो. हा व्हायरस ऑर्थोपॉक्स व्हायरस गटाशी संबंधित आहे. डब्ल्यूएचओच्या मते, एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला मंकीपॉक्सचा संसर्ग होण्याची फारच कमी प्रकरणे आहेत. संक्रमित व्यक्तीचे शिंकणे आणि खोकल्यामुळे बाहेर पडणारे ड्रॉपलेट्स, संक्रमित व्यक्तीच्या त्वचेवरील फोडच्या संपर्कामुळे, इतर लोकांना संसर्ग होण्याची शक्यता असते.

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, मंकीपॉक्समुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या ११ टक्क्यांपर्यंत असू शकते. संसर्ग झालेल्या लहान मुलांना मृत्यूचा धोका जास्त असतो.

मंकीपॉक्स संसर्गाची कारणे काय आहेत? 

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, हा संसर्ग मंकीपॉक्स नावाच्या व्हायरसमुळे होतो. हा व्हायरस ऑर्थोपॉक्स व्हायरस गटाशी संबंधित आहे. डब्ल्यूएचओच्या मते, एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला मंकीपॉक्सचा संसर्ग होण्याची फारच कमी प्रकरणे आहेत. संक्रमित व्यक्तीचे शिंकणे आणि खोकल्यामुळे बाहेर पडणारे ड्रॉपलेट्स आणि संक्रमित व्यक्तीच्या त्वचेवरील फोडच्या संपर्कामुळे इतर लोकांना संसर्ग होण्याची शक्यता असते.

मंकीपॉक्सचा संसर्ग कसा टाळता येईल? 

डब्ल्यूएचओच्या मते, मंकीपॉक्स संसर्गाच्या जोखमीच्या घटकांबद्दल जागरूकता वाढवून जगभरातील संसर्ग रोखण्यात येऊ शकतो. मंकीपॉक्सच्या प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी लसींच्या वापरावर अनेक अभ्यास केले गेले आहेत, ज्यामध्ये त्या फायदेशीर असल्याचे आढळले आहे. जे लोक अलीकडच्या काळात विदेशी प्राण्यांच्या संपर्कात आले आहेत आणि त्यांच्यात मंकीपॉक्सची लक्षणे दिसत आहेत, त्यांनी याबाबत डॉक्टरांशी संपर्क साधावा.(monkey pox)

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Hair Care
आरोग्य

Hair Care : ‘हे’ उपाय करून घरच्या घरी पांढऱ्या केसांना करा काळे

आजच्या काळात चुकीच्या जीवन शैलीमुळे मनुष्याचे संपूर्ण दैनंदिन जीवनच बिघडून गेले आहे....

Health
आरोग्य

Health : ‘हे’ सोपे उपाय करा आणि हिवाळ्यात ओठांना कोरडे होण्यापासून वाचवा

हिवाळा म्हणजे सर्वांचाच आवडता ऋतू. छान गुलाबी थंडीमध्ये व्यायाम करायला, काम करायला...

Skin Care | Bollywood Life
आरोग्य

Skin Care : प्रायव्हेट पार्टवरील काळेपणा दूर करायचा…? मग करा ‘हे’ सोपे उपाय

आपल्या सर्वांनाच आपल्या शरीराची, आपल्या दिसण्याची खूपच काळजी असते. कमी अधिक प्रमाणात...

Health
आरोग्य

Health : नियमित पेरू खाल्ल्याने होतील अनेक आश्चर्यकारक फायदे

फळं खाणे नेहमीच आपल्या आरोग्याच्या दृष्टीने लाभदायक मानले गेले आहे. अनेकदा तर...