भगवान मुरुगनच्या भक्तांसाठी अत्यंत पवित्र दिवस असलेला थाईपुसम वर्षी रविवार, १ फेब्रुवारी रोजी साजरा केला जाईल. थाई पुसम, थाईपुयम किंवा थाईपुयम म्हणूनही हा सण ओळखला जातो. हा पवित्र सण तमिळ समुदायात आध्यात्मिकदृष्टाय महत्त्वाचा मानला जातो. या सणासाठी भारतातील तमिळ भाषिक जेवढे वाट बघतात, तेवढीच प्रतीक्षा परदेशात रहाणारे नागरिकही करतात. कारण भगवान मुरुगन यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी थाईपुसम उत्सव सर्वात मोठा असतो. भगवान मुरुगन यांना समर्पित या पवित्र दिवसासाठी अवघ्या तामिळनाडूमध्ये तयारी सुरु झाली आहे. थाईपुसम, या तमिळ सणाचे आध्यात्मिक महत्त्व मोठे आहे. ( Thaipusam )

थाईपुसम सण हा भगवान मुरगन यांना समर्पित आहे. मुरुगन हे नाव ‘मुरुकु’ पासून आले आहे, ज्याचा अर्थ ‘तरुण्य’ आणि ‘सौंदर्य’ असा होतो. भगवान मुरुगन, यांनाच कार्तिकेय, सुब्रमण्य किंवा स्कंद या नावांनेही ओळखले जाते. भगवान मुरगन हे भगवान शंकर आणि देवी पार्वती यांचे ज्येष्ठ पुत्र आणि भगवान गणेशाचे भाऊ आहेत. तमिळ हिंदू प्रामुख्याने भगवान मुरगन यांना रक्षक देवता मानतात. भगवान मुरगन यांची ज्ञान, धैर्य आणि युद्धाचे देव म्हणून पूजा होते. त्यांचे वाहन मोर असून मुख्य शस्त्र भाला आहे.
भगवान मुरगन यांना मानणारा मोठा वर्ग दक्षिण भारतासह श्रीलंका, मलेशिया आणि सिंगापूरमध्ये आढळून येतो. अज्ञानांचा नाश करणारा देव म्हणूनही त्यांची पूजा होते. त्यांच्यासोबत त्यांच्या देवसेना आणि वल्ली या दोन पत्नींचीही पूजा होते. तामिळनाडूमध्ये भगवान मुरुगन यांची सहा सर्वात प्रसिद्ध मंदिरे आहेत. या मंदिरांना ‘अरुपादाई वीडू’ म्हणून ओळखण्यात येते. याच सर्व मंदिरांमध्ये आता थाईपुसम उत्सवासाठी तयारी सुरु झाली आहे. तमिळ समुदयासाठी हा वर्षातील सर्वात मोठा सण मानला जातो. त्यानिमित्तानं अनेक तमिळ लोकं आपल्या मुळ गावी येतात, आणि भगवान मुरगन यांच्या धार्मिक कार्यात स्वतःला वाहून घेतात. ( Thaipusam )
थाईपुसम हा तमिळ सौर थाई महिन्यात साजरा केला जातो. हा सण हिंदू कॅलेंडरमध्ये मकर महिन्याशी संबंधित आहे. पौर्णिमा पुसम नक्षत्राशी जुळते तेव्हा हा सण साजरा केला जातो. हा एक दुर्मिळ खगोलीय संयोग आणि आध्यात्मिक ऊर्जा वाढवणारा दिवसही मानला जातो. देवी पार्वतीने भगवान मुरुगनला दिव्य भाला देऊन आशीर्वाद दिला. यामुळेच भगवान मुरगन यांनी सूर्यपदम राक्षसावर विजय मिळवला आणि आणि विश्वात संतुलन निर्माण झाले. त्यामुळेच थाईपुसम हा सण विजयाचा तसेच शक्तीचा म्हणूनही साजरा होतो.
या सणासाठी पुसम नक्षत्र महत्त्वाचे असते. हे पुसम नक्षत्र १ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ०१:३४ वाजता सुरू होते आणि १ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री ११:५८ वाजता संपते. याच पुसम नक्षत्रामध्ये भगवान मुरगन यांची पुजा केली जाते आणि थाईपुसम सण साजरा होतो. वाईटावर चांगल्याचा विजय आणि जीवनातील अज्ञान, अहंकार आणि नकारात्मक शक्तींचा अंत यांचे प्रतीक म्हणून हा थाईपुसम साजरा होतो. थाईपुसमच्या दिवशी, भाविक सकाळी लवकर उठतात, स्नान करतात आणि नंतर भगवान मुरुगनची पूजा करण्यासाठी मंदिरांना भेट देतात. ( Thaipusam )
=======
हे देखील वाचा : Ravi Pushya Yog : रवि पुष्य योग म्हणजे काय? याचे महत्त्व काय?
=======
दूध, मध, चंदन आणि पवित्र पाण्याचा वापर करून एक विशेष अभिषेक कऱण्यात येतो. थाईपुसमची सुरुवात होण्याआधी काही दिवस काही भक्त बरेच दिवस उपवास करतात आणि सात्विक जीवनशैली स्विकारतात. या काळात भाविक शाकाहारी जेवण घेतात, तर काही भाविक फक्त फळे खातात. थाईपुरम हा सण शक्तीचा असतो, त्यामुळे काही भाविक भाले किंवा सुयांनी त्यांच्या शरीरावर टोचून घेतात आणि मिरवणुकीमध्ये सहभागी होतात. मुरुगन मंदिरांमध्ये मिरवणुकीत दुधानं भरलेल्या कवडी खांद्यावर घेऊन जातात.
आता या सणासाठी तामिळनाडूमधील भगवान मुरगन यांच्या मंदिरामध्ये मोठी तयारी सुरु झाली आहे. भगवान मुरुगनची सहा प्रसिद्ध मंदिरे आहेत. त्यात पलानी दंडयुथापाणी स्वामी मंदिर हे सर्वात प्रसिद्ध टेकडीवरील मंदिरांपैकी एक आहे. तिरुचेंदूर सुब्रमण्य स्वामी मंदिर हे समुद्रकिनाऱ्यावर वसलेले मंदिरही अतिशय पवित्र मानले जाते. थिरुपरकुंद्रम हे सुब्रमण्यम स्वामी मंदिर मदुराईजवळ स्थित असून ते पौराणिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण मानले जाते. स्वामीमलाई सुब्रमण्यस्वामी मंदिर हे कुंभकोणम जवळ असून येथे मुरुगनची पूजा भगवान शंकराचे गुरु म्हणून केली जाते. तिरुत्तानी सुब्रमण्यस्वामी मंदिर हे मंदिर चेन्नई जवळ आहे. पाझमुदिरचोलाई मुरुगन मंदिर हे मदुराई जवळील टेकड्यांमध्ये स्थित असून हे मंदिर त्याच्या नयनरम्य दृश्यांसाठी ओळखले जाते. या सर्व मंदिरांमध्ये आता उत्सवाचे वातावरण असून मोठ्या संख्येनं भाविक येथे जमा होत आहेत. ( Thaipusam )
सई बने
- abhishekam
- Arulmigu Subramaniya Swamy Temple
- Arupadai Veedu
- body piercing practice
- devotion rituals
- divine spear (vel)
- fasting and vows
- full moon alignment
- honey and sandal paste
- kavadi procession
- Lord Murugan
- milk offering
- Palani Dhandayuthapani Swamy Temple
- Pazhamudircholai Murugan Temple.
- Pusam nakshatra
- spiritual significance
- Swamimalai Murugan Temple
- Tamil festival
- Tamil Nadu celebrations
- temple worship
- Thaipusam
- Thiruparankundram Murugan Temple
- Thiruthani Murugan Temple
- Tiruchendur
- vegetarian diet
- victory over evil