Home मनोरंजन नोरा फतेही आणि टेरेन्स लुईस यांचं सुरू आहे अफेअर?
मनोरंजन

नोरा फतेही आणि टेरेन्स लुईस यांचं सुरू आहे अफेअर?

6
Nora Fatehi Terence Lewis Affair
Nora Fatehi Terence Lewis Affair

बॉलिवूडमधील कलाकारांच्या रिलेशनशिप स्टेटसबद्दल मीडियामध्ये, सोशल मीडियावर आणि फॅन्समध्ये चर्चा रंगताना दिसतात. सामान्य लोकं आपल्या आवडत्या सेलिब्रिटीच्या वैयक्तिक गोष्टी जाणून घेण्यासाठी खूपच उत्सुक दिसून येतात. कलाकार आणि त्यांचे रिलेशनशीप स्टेटस नेहमीच कलाकरांना तुफान पब्लिसिटी मिळवून देतात. याशिवाय मीडियामध्ये देखील कलाकारांच्या लिंकअप्सबद्दल अनेक बातम्या, अफवा येतच असतात. त्या किती सत्य आणि असत्य याची खात्री न करता कलाकारांचे नाव नेहमीच विविध लोकांसोबत जोडले जाते. मीडियामधील अशा अफेअरच्या बातम्यांबद्दल कलाकारांना देखील विचारले जाते. सध्या बॉलिवूडच्या गल्ल्यांमध्ये लोकप्रिय अभिनेत्री आणि डान्सर असलेली नोरा फतेही आणि कोरिओग्राफर असलेला टेरेन्स लुईस (Nora Fatehi Terence Lewis Affair) यांच्याबद्दल आणि त्यांच्या रिलेशनशिपबद्दल खूपच वावड्या उठताना दिसत आहे. मात्र या दोघांकडून अजूनही यावर काही अधिकृत वक्तव्य आले नाही. (Nora Fatehi Terence Lewis Affair)

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये टेरेन्स लुईसला त्याच्या आणि नोरा फतेहीच्या रिलेशनशिपबद्दल प्रश्न विचारला गेला, त्यावर त्याने जे उत्तर दिले ते सध्या खूपच चर्चेत आले आहे. या प्रश्नावर उत्तर देताना टेरेन्स म्हणाला, “गुपित आहे गुपितच राहू द्या. मी तुम्हाला ऑफ कॅमेरा सांगेल.” पुढे टेरेन्स म्हणाला की, “आम्ही फक्त चांगले मित्र आहोत. यापेक्षा जास्त काही नाही. मला वाटते की आमची स्क्रीनवर केमेस्ट्री खूपच चांगली आणि उठावदार दिसते. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे नोरा एक वेगळी स्वतंत्र व्यक्ती आहे. मला तिची एनर्जी खूपच आवडते. ती एक उत्तम डान्सर असल्याने मला समजू शकते. नोरा खूपच मेहनती व्यक्ती आहे. स्वतःला या क्षेत्रात स्थापित करण्यासाठी तिने खूपच मेहनत घेतली आहे.”  (Nora Fatehi Terence Lewis Affair)

=========

हे देखील वाचा – नेहा धुपियाच्या लग्नानंतर तिला तब्बल ६०० मेसेज आले मात्र एकही नव्हता शुभेच्छांचा, मग कोणते होते मेसेज घ्या जाणून

=========

टेरेन्सने पुढे नोराचे कौतुक करताना म्हटले की, “ती खूपच खरी आहे. जे तिच्या डोक्यात आणि मनात येत ते ती बोलते. त्यातही कोणतेही फिल्टर नसते. कधी कधी ती काहीही बोलते आणि त्यानंतर मी तिला सांगतो तू असे नव्हते बोलायला पाहिजे. यावर ती म्हणते आता मी बोलली. नोरा अशीच आहे. मात्र हीच बाब तिच्याकडे सर्वांना आकर्षित करून घेते. ती खूपच प्रेमळ आहे. हो आम्ही चांगले मित्र आहोत. मी असे नाही म्हणत की, आम्ही खूपच चांगले मित्र आहोत. कारण आम्ही काही रोज भेटत नाही, बोलत नाही. मात्र आमच्यात एक सामान्य नाते आहे.” (Nora Fatehi Terence Lewis Affair)

तत्पूर्वी नोरा फतेही सध्याच्या घडीला बॉलिवूडमधील मोठे नाव बनली आहे. तिची लोकप्रियता पाहून प्रत्येक सिनेमात तिचे एक तरी गाणे ठेवलेच जाते. तर टेरेन्स लुईस हा बॉलिवूडमधील प्रसिद्ध कोरिओग्राफर असून तो अनेक रियॅलिटी शोचे परीक्षण करताना दिसतो. (Nora Fatehi Terence Lewis Affair)

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Sulakshana Pandit
मनोरंजन

Sulakshana Pandit : अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचे निधन, ‘या’ अभिनेत्यासाठी राहिल्या आजन्म अविवाहित

ऑक्टोबर महिन्यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी आपला निरोप घेतला. हा सिलसिला नोव्हेंबरमध्ये देखील...

Cricket
क्रीडामनोरंजन

Cricket : कोण आहे स्टार क्रिकेटपटू स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छल?

भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला आणि सगळीकडे एकच जल्लोष झाला. आधी...

Tejaswini Lonari
मनोरंजन

Tejaswini Lonari : अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने गुपचूप उरकला साखरपुडा; बड्या नेत्याची होणार सून

सध्या मराठी मनोरंजनविश्वामधे लग्नसराईचे दिन आल्याचे चित्र आहे. अनेक मराठी कलाकार साखरपुडा...

Asarani
मनोरंजन

Asarani : दिग्गज हिंदी चित्रपट अभिनेते असरानी यांचे दुःखद निधन

हिंदी सिनेमात असे खूप कमी कलाकार होऊन गेले किंवा आहेत ज्यांचे केवळ...