Home मनोरंजन उदरनिर्वाहासाठी केली होती टुथपेस्टच्या रिकाम्या डब्याची विक्री… आज आहे टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री
मनोरंजन

उदरनिर्वाहासाठी केली होती टुथपेस्टच्या रिकाम्या डब्याची विक्री… आज आहे टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री

18
Television
Television

Television : टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी लवकरच सोनी लिव्हवरील बेव सीरिज ‘अदृश्यम -द इनविजिबल हीरोज’ मध्ये झळकणार आहे. या सीरिजमध्ये दिव्यांकासोबत जवान फेम अभिनेता एजाज खानही दिसून येणार आहे. ‘ये हैं मोहब्बते’ ते ‘खतरो के खिलाडी’ मधील अनेक मालिकांमध्ये दिव्यांकाने काम केले आहे. कोणाच्याही मदतीशिवाय अभिनेत्री आयुष्यात आज यशाच्या शिखरावर पोहोचली आहे.

अभिनेत्रीने सांगितले आयुष्यातील संघर्षात्मक किस्से
अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीने आपल्या आयुष्यातील संघर्षात्मक किस्स्यांचा खुलासा केला आहे. दिव्यांकाने म्हटले की, आयुष्यात यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी फार मेहनत केली आहे. पण नेहमीच माझे ध्येय पूर्ण करण्याकडे लक्ष दिले. आयुष्यात एक वेळ अशीही आली की, मला स्वत:ला उदरनिर्वाह करण्यासाठी काम करावे लागत होते. माझी नेहमीच प्रयत्न असायचा की, मला एखादे काम मिळावे. याच्या माध्यमातून दोन ते पाच हजार रुपयांपर्यंत कमाई होऊ शकते. यामुळे दैनंदिन आयुष्य जगता येईल. (Television)

पैसे कमावण्यासाठी शोधला होता मार्ग
पैसे कमावण्यासाठी वेगवेगळे मार्ग नेहमीच शोधत राहिल्याचे दिव्यांकाने म्हटले. दिव्यांकाने टूथपेस्टचे रिकामे डबे विक्री करायची. त्याच्यामाध्यमातून एक रुपया मिळायचा. अशाप्रकारे डबे एकत्रित करून विक्री करायची. जेणेकरुन रिकामे डबे विक्री करून पैसे येतील. पण ज्यावेळी बनू मै तेरी दुल्हनिया मालिका मिळाली त्यावेळी पैसे मिळू लागले. दिव्यांकाने रिअॅलिटी शो ‘सिनेस्टार की खोज’च्या माध्यमातून आपल्या करियरची सुरूवात केली होती.

(अशाच मनोरंजनासंबंधितच्या अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.)

आणखी वाचा :
वर्ष 1977 मधील ‘या’ ब्लॉकबस्टर सिनेमाने बॉक्स ऑफिसच नव्हे तर परदेशातही केली होती जबरदस्त कमाई
राजेश खन्ना यांचा हा सिनेमा पाहिल्यानंतर एका वृद्ध दांपत्याने बदलले होते मृत्युपत्र, मुलांकडून हिरावले होते मालकी हक्क
अनिल कपूर यांच्यासोबत असलेल्या वादावर बोनी कपूर यांनी सोडले मौन, म्हणाले…

Recent Posts

Related Articles

Sulakshana Pandit
मनोरंजन

Sulakshana Pandit : अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचे निधन, ‘या’ अभिनेत्यासाठी राहिल्या आजन्म अविवाहित

ऑक्टोबर महिन्यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी आपला निरोप घेतला. हा सिलसिला नोव्हेंबरमध्ये देखील...

Cricket
क्रीडामनोरंजन

Cricket : कोण आहे स्टार क्रिकेटपटू स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छल?

भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला आणि सगळीकडे एकच जल्लोष झाला. आधी...

Tejaswini Lonari
मनोरंजन

Tejaswini Lonari : अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने गुपचूप उरकला साखरपुडा; बड्या नेत्याची होणार सून

सध्या मराठी मनोरंजनविश्वामधे लग्नसराईचे दिन आल्याचे चित्र आहे. अनेक मराठी कलाकार साखरपुडा...

Asarani
मनोरंजन

Asarani : दिग्गज हिंदी चित्रपट अभिनेते असरानी यांचे दुःखद निधन

हिंदी सिनेमात असे खूप कमी कलाकार होऊन गेले किंवा आहेत ज्यांचे केवळ...