Home प्रेस रिलीझ ‘तमाशा लाईव्ह’चे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला
प्रेस रिलीझ

‘तमाशा लाईव्ह’चे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला

8
Kadak Lakshmi

‘तमाशा लाईव्ह’ चित्रपटातील गाण्यांना संगीतप्रेमी चांगलाच प्रतिसाद देत आहेत. आता नुकतेच शेफाली अर्थात सोनाली कुलकर्णी हिचे ‘कडक लक्ष्मी’ (Kadak Lakshmi) हे गाणे सोशल मीडियावर झळकले असून या गाण्याला क्षितीज पटवर्धन यांनी शब्दबद्ध केले आहे. तर या गाण्याला पंकज पडघन यांनी संगीत दिले असून विशेष बाब म्हणजे हे गाणे सोनाली कुलकर्णी हिनेच गायले आहे. या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन उमेश जाधव यांनी केले आहे. यात सोनाली कुलकर्णी आक्रमक स्वरूपात तिची व्यथा व्यक्त करत आहे. गाण्याचे नाव ‘कडक लक्ष्मी’ असून नावाप्रमणेच या गाण्याचे बोल आहेत.

‘कडक लक्ष्मी’ गाण्याबद्दल गीतकार क्षितीज पटवर्धन म्हणतात, ” हे गाणे मी शब्दबद्ध केले असले तरी सोनालीने अगदी उत्तमरित्या ते सादर केले आहे. मुळात हे गाणे ती स्वतः गायली आहे. त्यामुळे या गाण्यातील भावना या तिच्या चेहऱ्यावर आपसुकच दिसून येत आहेत.’’

‘ प्लॅनेट मराठी’चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ” संगीतातून कथा सांगणारा ‘तमाशा लाईव्ह’ हा पहिला मराठी चित्रपट आहे. संजय जाधव यांनी या चित्रपटाच्या माध्यमातून एक आगळावेगळा प्रयोग सादर केला आहे. या गाण्यांना मिळणाऱ्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया पाहून संजय जाधव यांचा हा प्रयोग नक्कीच यशस्वी होईल याची मला खात्री आहे.”

====

हे देखील वाचा: ‘राजी-नामा’त दिसणार ‘खुर्ची’साठीचे राजकीय युद्ध

====

प्लॅनेट मराठी, माऊली प्रॉडक्शन, एटीएट पिक्चर्स प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती अक्षय बर्दापूरकर यांनी केली आहे. सौम्या विळेकर, डॉ. मनीषा तोलमारे, समीर केळकर, अजय उपर्वात सहनिर्मित या चित्रपटाची कथा मनीष कदम यांची असून संवाद अरविंद जगताप यांचे आहेत. ‘तमाशा लाईव्ह’ चित्रपट येत्या १५ जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Mohanlal
प्रेस रिलीझ

Mohanlal : मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांना ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ जाहीर

नुकताच दादासाहेब फाळके पुरस्काराची घोषणा करण्यात आली. यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जेष्ठ...

Ghibli
प्रेस रिलीझलाईफ स्टाईलव्यक्ती विशेष

Ghibli : घिबली आर्ट म्हणजे काय? कोण आहे Ghibli ॲनिमेशनचे जनक?

सध्या सोशल मीडिया उघडल्या उघडल्या आपले स्वागत करतात ते आपल्याच लोकांचे अतिशय...

Vijay Sethupathi
प्रेस रिलीझ

शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटात ‘या’ अभिनेत्याची होणार खास एन्ट्री

बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानने (Shah Rukh Khan) 2023 मध्ये आपले नाव कोरले...

Vitthala Tuch
प्रेस रिलीझ

प्रेमाचा आविष्कार घेऊन ‘विठ्ठला तूच’ चित्रपट लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीस

विठ्ठला तूच हे ऐकताच आपल्याला आठवण येते ती आपल्या भगवान विठ्ठलाची. सर्वांच्या...