Home गाजावाजा स्पेशल आपल्या देशातच आहे ‘या’ ठिकाणी स्विझरलॅंड….
गाजावाजा स्पेशल

आपल्या देशातच आहे ‘या’ ठिकाणी स्विझरलॅंड….

5
Switzerland
Switzerland is in our country at 'this' place....marathi info

14 फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईन डे साजरा होतोय.  कुठलाही दिवस का असेना तो फक्त साजरा करण्याचं  आणि त्यानिमित्तानं फिरायला जाण्याचं कारणचं मिळतं. अशावेळी कुठे फिरायला जायचं याचा शोध सरु होतो. असाच जर शोध तुम्ही घेत असाल तर तुमच्यासाठी स्विझरलॅंड (Switzerland) हा चांगला पर्याय आहे. अर्थात हे स्विझरलॅंड कुठे भारता बाहेर नाही तर आपल्या देशातच आहे. राजस्थानमध्ये असलेले हे स्विझरलॅंड सध्या व्हॅलेंटाईन डे साजरे करण्यासाठीचे सर्वात आवडते ठिकाण ठरत आहे. यासोबतच प्री-वेडींग फोटो शुटसाठीही या राजस्थानमधील स्विझरलॅंडची लोकप्रियता वाढत आहे. 

स्विझरॅंलडला (Switzerland) जायचे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. हिंदी चित्रपटात अनेकवेळा दाखवण्यात येणा-या या स्विझरलॅंडला फिरायला जाणे हे प्रत्येकालाच शक्य होत नाही. पण याच स्विझरलॅंडला (Switzerland) फिरायला गेल्याचे समाधान मात्र मिळवायचे असेल तर राजस्थान नक्कीच गाठायला हवे.  राजस्थानच्या या पर्यटनस्थळावर बर्फ नाही…पण बर्फ असल्यासारखे दृश्य आहे. विशेषतः ज्या जोडप्यांना फोटो काढायचे आहेत, त्यांच्यासाठी तर हुबेहुब स्विझरलॅंडचा आभास होईल इतके हे पर्यटन स्थळ सुंदर आहे. हे राजस्थानमधील स्विझरलॅंड म्हणजे, किशनगड इथली डम्पिंग यार्ड आहे.  

किशनगढ डंपिंग यार्ड राजस्थानच्या अजमेर जिल्ह्यातील किशनगड शहरात आहे. किशनगढ डंपिंग यार्ड त्याच्या सौंदर्यासाठी आणि अत्यंत सुंदर दृश्यासाठी प्रसिद्ध आहे. ही दृश्य पाहण्यासाठी पर्यटक येतात. अगदी परदेशी पर्यटकांचीही येथे मोठ्या प्रमाणात गर्दी असते.  या ठिकाणाला स्थानिक, बर्फाची खाण असेही म्हणतात.  या संपूर्ण डंपिंग यार्डमध्ये आपल्याला सर्वत्र बर्फाच्या ढिगासारखे दिसणारे पांढरे शुभ्र ढिग आपल्याला दिसतात. पण गम्मत अशी की, पांढरे शुभ्र ढिग बर्फाचे नसून संगमरवर कापल्यावर जी पावडर बाहेर फेकली जाते, त्या पावडरचे हे ढिग झालेले आहेत.  या सर्व भागात संगमरवर मोठ्या प्रमाणात निघतो. हा संगमरवर कापल्यावर जी बारीक पावडर बाहेर पडते, त्या पावडरला या डंपिंग यार्डमध्ये टाकण्यात येते.  हळूहळू या पावडरचे ढिग डोंगर व्हायला लागते आणि मग या डंपिंग यार्डचे फोटो प्रसिद्ध झाल्यावर त्यातील कल्पकता पर्यटकांना आवडायला लागली. पर्यायानं हे डंपिंग यार्ड पर्यटकांसाठी मिनी स्विझरलॅंड (Switzerland) म्हणून प्रसिद्ध झाले आहेत. या डंपिंग यार्डमध्ये फोटोशूटचा आनंदही घेता येतो.  अनेक नवविवाहित दांम्पत्ये येथे फोटोशुटसाठी गर्दी करतात. फोटोशूटसाठी हे डंपिंग यार्ड सर्वात आवडते ठिकाण आहे. या यार्डच्या  चारी बाजूला असणारे शुभ्र ढिग आणि मध्ये असणारे निळ्या रंगाचे पाणी, यामुळे हे डंपिंग यार्ड एखाद्या आईसलॅंडसारखे भासते. त्यामुळेच व्हॅलेंटाईन डे चा मुहूर्त साधत अनेक जण येथे फोटोशुट करण्यासाठी गर्दी करतात.   पावसाळ्यात तर येथील दृश्य स्विझरलॅंडच्या (Switzerland) बर्फाच्छादित मैदानासारखी दिसतात. किशनगढ डम्पिंग यार्ड हे बॉलिवूड चित्रपट आणि गाण्यांच्या शूटिंगसाठीही प्रसिद्ध आहे. आतापर्यंत अनेक मोठ्या कलाकारांनी येथे चित्रपट शूट केले आहेत. अनिल कपूरच्या ‘थर’ या चित्रपटाचे चित्रीकरणही येथेच झाले आहे. कॉमेडियन कपिल शर्माच्या ‘किस किससे प्यार करूं’  या चित्रपटाचे शूटिंगही किशनगढ डंपिंग यार्डमध्ये झाले आहे. याशिवाय सोनाक्षी सिन्हा, प्रभू देवा, सपना चौधरी सह अनेक कलाकारांनी येथे अल्बम शूट केले आहेत.   

किशनगड डम्पिंग यार्डमध्ये राजस्थानसह अन्य राज्यातूनही पर्यटक आवर्जून भेट देतात. हे ठिकाण सध्या प्री-वेडिंग फोटोशूटसाठी खूप प्रसिद्ध आहे. या डंपिंग यार्डला भेट द्यायची असेल तर त्यासाठी वेळेचे बंधनही पाळायला लागते. हे डंपिंग यार्ड सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत उघडे असते. या डंपिंग यार्डमध्ये फोटोशुट करायचे असेल तर प्रत्येक ऋतूप्रमाणे आपल्या वेळेचे नियोजन करावे लागते. राजस्थानच्या अजमेर जिल्ह्यातील किशनगड डम्पिंग यार्ड म्हणजे  जपळपास 302 एकरचा परिसर आहे. डंपिंग यार्ड संगमरवरी स्लरीपासून म्हणजेच संगमरवराच्या पावडर पासून  बनवले आहे.  किशनगड मार्बल असोसिएशनने मार्बल स्लरी टाकण्यासाठी नवीन आणि जुन्या डम्पिंग यार्डची जागा निश्चित केली आहे. भारत सरकारच्या केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करत हा संगमरवर कापल्यावर निघणारा कचरा ठराविक ठिकाणी दररोज टाकला जातो आणि त्यापासूनच असे सुंदर पर्यटन स्थळ तयार झाले आहे.  

=====

हे देखील वाचा : बांबूची झाडं लावून कमवू शकता लाखो रुपये, खर्च ही कमी येतो

=====

किशनगड ही आशियातील सर्वात मोठी संगमरवरी बाजारपेठ आहे. संगमरवरी आणि ग्रॅनाइट कापल्यावर निघणाऱ्या स्लरीमुळे वायू प्रदूषण वाढते आणि शेतीयोग्य जमीन प्रदूषित होते.  म्हणूनच ही स्लरी ठराविक डम्पिंग यार्डमध्येच टाकली जाते.  2009 च्या सुमारास ही स्लरी म्हणजेच संगमरवराची पावडर टाकण्यास सुरुवात झाली. त्यापासून असे सुंदर ठिकाण तयार होऊ शकेल याचा विचारही तेव्हा झाला नाही.  मात्र आता हे डंपिंग ग्राऊंड परदेशी पर्यटकांनाही आकर्षित करीत आहेत.  त्यामुळे तेथे जाण्यासाठी काही नियम करण्यात आले आहेत.  किशनगड डम्पिंग यार्डमध्ये प्रवेश करण्यासाठी किशनगड मार्बल असोसिएशनची परवानगी घ्यावी लागते. डम्पिंग यार्डमध्ये सर्व प्रकारच्या हलक्या वाहनांना परवानगी आहे.  किशनगड डम्पिंग यार्डमध्ये कॅमेरा आणि ड्रोन कॅमेरा चालवण्यासाठी परवानगी घ्यावी लागते.  मात्र मोबाईल फोनद्वारे शुटींग करण्यास परवानगीची गरज लागत नाही. अर्थात, या डम्पिंग यार्डमध्ये प्रवेश पूर्णपणे मोफत आहे. किशनगड हे राजस्थानच्या अजमेर जिल्ह्यात असून जयपूरपासून 100 किमी अंतरावर आहे.  ट्रेन, बस किंवा फ्लाइटने जयपूरला जाऊन किशनगडला जाता येते. अजमेरच्या मुख्य शहरापासून हे डंपिंग यार्ड  27 किमी अंतरावर आहे. आता जी मंडळी व्हॅलेंटाईन डे किंवा प्री वेडींग शुटसाठी चांगले स्थळ शोधत आहेत, त्यांच्यासाठी या डंपिंग ग्राऊंडचा चांगला पर्यांय उपलब्ध आहे.  

सई बने

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Sade Sati
गाजावाजा स्पेशल

Sade Sati : जाणून घ्या नक्की शनीची साडेसाती म्हणजे काय?

भारतात ज्योतिषशास्त्राचे मोठे महत्त्व आहे. ज्योतिष्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची संख्या भारतात सर्वाधिक...

Vande Mataram
गाजावाजा स्पेशल

Vande Mataram : ‘वंदे मातरम्’ गीताला १५० वर्षे पूर्ण

भारत जगातील सर्वात लोकप्रिय देश. आज भारताचा संपूर्ण जगामध्ये डंका वाजत आहे. ...

Royal Stories
गाजावाजा स्पेशल

Royal Stories : 365 राण्या आणि न्यूड पार्टी करणारा भारतीय राजा!

एक असा राजा ज्याच्या वर्षात जितके दिवस असतात तितक्या राण्या होत्या, त्याच्यासोबत...

Ganpati
गाजावाजा स्पेशल

Ganpati : ‘या’ गावात भाद्रपदात नाही तर चक्क लक्ष्मीपूजनाला होते गणेशाची स्थापना

भाद्रपद महिना जवळ येऊ लागला की, सगळ्यांना वेध लागतात ते गणेश चतुर्थीचे....