दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत आज आपल्यात नाही, पण त्याच्या आठवणी चाहत्यांच्या हृदयात कायम जिवंत राहतील. टेलिव्हिजन आणि बॉलिवूड अभिनेता म्हणून आपली जगभर ओळख तयार केली. सुशांतची लोकप्रियता अफाट होती, म्हणूनच जेव्हा त्याच्या निधनाची बातमी समोर आली तेव्हा संपूर्ण इंडस्ट्री आणि सामान्य जनता देखील हादरली. १४ जून २०२० रोजी सुशांतच्या आकस्मिक निधनाने देशभरातील त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. सुशांतच्या निधनानंतर त्याच्या मृत्यूबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले, जे आजही अनुत्तरित आहे. आजही सुशांतच्या मृत्यू एक मोठे कोडे बनले आहे. काहींना वाटते की, त्याने आत्महत्या केली, तर काहींना वाटते की, त्याचा खून झाला. मात्र सुशांतच्या मृत्यूचे खरे कारण आद्यपही समोर आलेले नाही. (Sushant singh rajput)
आज सुशांतला जाऊन ५ वर्ष पूर्ण झाली तरीही त्याच्या आठवणी सगळ्यांच्याच मनात ताज्या आहेत. सोशल मीडियावर देखील त्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्याचे चाहते आजही अभिनेत्याला विसरु शकलेले नाहीत. आजही सुशांतच्या आठवणीत त्याचे सिनेमे चाहते ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहत असतात. आज सुशांतच्या पुण्यतिथी दिनी जाणून घेऊया सुशांबद्दल काही रंजक माहिती. (Marathi Trending News)
सुशांतचा जन्म २१ जानेवारी १९८६ रोजी बिहारच्या पाटणा शहरात झाला. सुशांत हा चार बहिणींचा एकुलता एक भाऊ होता. सुशांतला सुरुवातीपासूनच चित्रपटसृष्टीत काम करायचे होतं. चित्रपटसृष्टीत कुठलाही गॉडफादर नसताना त्यानं त्यांच स्वप्न पूर्ण केलं. तो एक यशस्वी अभिनेता झाला. ‘पवित्र रिश्ता’ या लोकप्रिय टीव्ही मालिकेतून त्याची घराघरात ओळख झाली. २०१३ मध्ये ‘काई पो चे’ या चित्रपटातून त्यानं आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. या सिनेमानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. (Marathi News)

सुशांत AIEEE (All India Engineering Entrance)मध्ये शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थी आहे. संपूर्ण देशातून तो सातव्या रँकवर आला होता. दिल्लीच्या एका मोठ्या महाविद्यालयात त्याला प्रवेशसुध्दा मिळाला होता. त्याने शामक दावरच्या डान्स अकॅडमीमध्ये प्रवेश घेतला. त्याने अनेक डान्स शो केले. त्यानंतर तो अभिनयाकडे वळला. सुशांतने बॅकग्राउंड डान्सर म्हणून त्याच्या करिअरची सुरुवात केली. त्याला डान्सची खूप आवड होती. तो २००६ ला कॉमनवेल्थ गेम्सच्या समारोपाच्या कार्यक्रमात पहिल्यांदाच बॅकग्राउंड डान्सर म्हणून समोर आला होता. इतकंच नाही तर ‘धूम 2’ मध्येही तो ह्रतिक रोशनसोबत बॅकग्राउंड डान्सर म्हणून काम करताना दिसला. (Todays Top Headline)
सुशांत अभ्यासात अत्यंत हुशार होता. त्याने मॅकेनिकल इंजिनीअरिंगचं शिक्षण घेतलं होते. त्याने फक्त ३ वर्ष हा कोर्स केला. अभिनयासाठी त्याने शिक्षण मध्येच सोडलं. तो फिजिक्स नॅशनल ऑलम्पियाडचा विजेता होता. सुशांतने ‘किस देश में है मेरा दिल’ या मालिकेतून त्याच्या अभिनयाच्या करियरला सुरुवात केली. या मालिकेत त्याची सहाय्यक भूमिका होती. मात्र या मालिकेनंतर तो एकता कपूरच्या ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेपासून त्याला अफाट लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळाली. ‘पवित्र रिश्ता’मध्ये त्याने पहिल्यांदाच लीड रोलसाठी काम केलं. या मालिकेमुळे सुशांत प्रसिद्ध झाला. सुशांत आणि अंकिताच्या जोडीमधली केमिस्ट्री अनेकांना आवडली. हे दोघंही या मालिकेमुळे लोकप्रिय झाले.(Marathi Latest NEws)
या शोनंतर सुशांतने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. अभिनेत्याने ‘काय पो चे’ सिनेमानंतर ‘एमएस धोनी: अनटोल्ड स्टोरी’, ‘राबता’, ‘केदारनाथ’, ‘छिछोरे’ यांसारखे हीट सिनेमे बॉलिवूडला दिले. सुशांतचे काम, सिनेमे पाहून त्याच्या चाहत्यांना इंडस्ट्रीमधल्या लोकांना देखील एक गोष्ट जाणवली की, सुशांत हा लांबी रेस का घोडा आहे. तो या क्षेत्रात नक्की पुढे जाऊन सुपरस्टार कलाकारांच्या यादीत स्थान मिळणार. (Top Marathi Headline)

‘एमएस धोनी द अनटोल्ड’ स्टोरी हा चित्रपट त्याचा करिअर टर्निंग पॉइंट ठरला. हा चित्रपट क्रिकेटर महेंद्रसिंग धोनीच्या जीवनावर आधारित होता. या चित्रपटानं रुपेरी पडद्यावर 250 कोटींहून अधिक कमाई केली आहे. पीके चित्रपटातील 15 मिनिटांच्या भूमिकेसाठी त्यानं राजकुमार हिराणी यांच्याकडून एकही पैसा घेतला नाही. मात्र, हिराणी यांनी त्याला 21 रुपये भेट म्हणून दिले. सुशांतनं ते आनंदाने स्वीकारले. (Top Stories)
==========
हे देखील वाचा : Jagannath Rathyatra : कधी आहे जग्गनाथ रथयात्रा? जाणून घ्या यात्रेची संपूर्ण माहिती
==========
सुशांत सिंह राजपूतला खगोलशास्त्रामध्ये खूप रस होता. त्याच्याकडे अनेक दुर्बिणी होत्या. या दुर्बिणींच्या सहाय्याने तो चंद्र आणि तारे बघायचा. चंद्रावर जमीन खरेदी करणारा तो एकमेव अभिनेता होता. त्याला कायम नवीन गोष्टी शोधायला आवडत असे. तो एका डायरीमध्ये त्याची स्वप्न लिहायचा. त्याने एकूण 50 स्वप्ने लिहिली होती. त्यातले ११ स्वप्न त्याने पूर्ण देखील केले होते, मात्र उरलेली ३९ स्वप्ने पूर्ण करण्याच्या आधीच सुशांतने या जगाचा निरोप घेतला. सर्वच गोष्टी अपूर्ण राहिल्या. सुशांतच्या शेवटच्या सिनेमाचं नाव ‘दिल बेचारा’ होतं. अभिनेच्याच्या मृत्यूनंतर सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आला. (Social News)
- Bollywood
- dil bechara
- justice
- justice for ssr
- justice for sushant singh rajput
- ssr
- sushant
- Sushant Singh Rajput
- sushant singh rajput death anniversary
- sushant singh rajput deatils
- sushant singh rajput facts
- sushant singh rajput fans
- sushant singh rajput info
- sushant singh rajput intresting facts
- sushant singh rajput marathi
- sushant singh rajput news
- warriors
- सुशांत सिंग राजपूत
- सुशांत सिंग राजपूत तथ्ये
- सुशांत सिंग राजपूत पुण्यतिथी
- सुशांत सिंग राजपूत माहिती
- सुशांत सिंग राजपूत रंजक फॅक्टस