Home मनोरंजन बॉडीशेमिंग करणाऱ्याला अभिनेत्री अक्षया नाईकचे सणसणीत उत्तर
मनोरंजन

बॉडीशेमिंग करणाऱ्याला अभिनेत्री अक्षया नाईकचे सणसणीत उत्तर

9
Akshaya Naik

कलाविश्वात काम करणाऱ्या कलाकारांना नेहमीच स्वतःची सर्वात जास्त काळजी घ्यावी लागते. आपले दिसणे, वागणे, चालणे, बसणे आदी सर्वच गोष्टी त्यांना सांभाळून कराव्या लागतात. कारण ते जेव्हा सार्वजनिक ठिकाणी असतात तेव्हा त्यांच्यावर अनेक कॅमेरे लक्ष ठेऊन असतात. त्यामुळे त्यांच्या छोट्या छोट्या दिवशी देखील हे कॅमेरे टिपतात. त्यांच्या या चुकीच्या किंवा वेगळ्या गोष्टींवरून त्यांना लोकांच्या टीकेचा मोठ्या प्रमाणावर सामना करावा लागतो.

या सर्वांमध्ये कलाकरांना सर्वात जास्त त्यांच्या शरीरावरुन होणाऱ्या टीकेचा जास्त सामना करावा लागतो. खासकरून अभिनेत्रींना याचा जास्त त्रास होतो. जाड अभिनेत्री लोकांना कधीच मान्य नसते. कोणी किती अभिनेत्रींच्या शरीरापेक्षा त्यांच्या प्रतिभेबद्दल जास्त महत्व असते आदी अनेक व्यक्तव्य केले तरी लोकांना बारीक चुणचुणीतच अभिनेत्री पचनी पडते. काम न करणाऱ्या अभिनेत्री जरी जाड झाल्या तरी त्यांना ट्रोल केले जाते. अशातच आता मराठीमधील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिला एका व्यक्तीने तिच्या तब्येतीवरून ट्रोल केले आहे.

Akshaya Naik

‘सुंदरा मनामध्ये भरली’ फेम अक्षया नाईकला तिच्या लठ्ठ शरीरावरुन एक व्यक्ती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर ट्रोल करत आहे. त्या व्यक्तीला अक्षयाने आता एक पोस्ट शेअर करत त्याला सडेतोड उत्तर दिले आहे. सध्या अक्षयाची ती पोस्ट कमालीची व्हायरल होत आहे.

अक्षया नाईकला ट्रोल करणाऱ्या व्यक्तीने सतत अक्षयाच्या विविध पोस्टवर तिच्या लठ्ठपणावरून कमेंट्स केल्या आहेत. ती व्यक्ती इथेच नाही थांबली तर तिने अक्षयाच्या कुटुंबियातील सदस्यांचा देखील स्वतःच्या कमेंट्समध्ये उल्लेख केला. हे पाहून अक्षया संतापली. तिने थेट सोशल मीडियावर राग व्यक्त करत मुंबई पोलिसांना टॅग करत तिची पोस्ट केली आहे. सोबतच तिने संबंधित व्यक्तीने केलेल्या कमेंटचे स्क्रीनशॉर्ट आणि अकाऊंटची माहिती दिली आहे.

Akshaya Naik

अक्षयाने तिच्या पोस्टमध्ये लिहिले, “मी खूप भाग्यवान आहे की मी सोशल मीडियावर बॉडी शेमिंग / ट्रोलिंगचा सामना केला नाही. कधीतरी, होय नक्कीच; पण मी अनेकदा त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं आहे. त्यांना इतकं महत्त्व द्यावं असं कधी वाटलं नव्हतं. पण यावेळी मला त्या व्यक्तीला बोलावेसे वाटते कारण टिपण्या / बॉडी शेमिंगमध्ये माझ्या कुटुंबातील सदस्यांचाही उल्लेख आहे. आणि हे मी सहन करू शकत नाही.”

पुढे अभिनेत्री म्हणाली, “तसंच, ही व्यक्ती इतकी रिकामटेकडी आहे की ते २०१९मध्ये अपलोड केलेल्या पोस्ट खोदून कमेंट करत आहेत. आणि त्या अकाउंटवर त्यांचे कोणतेही फॉलोअर्स किंवा पोस्ट नाहीत. हे हेट अकाउंट खास माझ्यासाठी बनवलं आहे, असं दिसतं…बरं हे त्यांचं अकाउंट आहे. जमल्यास रिपोर्ट/ स्पॅम / रिपोर्ट ब्लॉक करा. @vikashsagwan208 पुढे त्यांच्या कमेंटचे स्क्रीनशॉट अपलोड करत आहे.”

========

हे देखील वाचा : महाराष्ट्रातल्या जागृत साडे शक्तिपीठांची माहिती

========

दरम्यान अक्षयाच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास तिने अनेक हिंदी, मराठी मालिकांमध्ये काम केले आहे. मात्र तिला खरी ओळख आणि प्रसिद्धी कलर्स मराठीवरील ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेने मिळवून दिली. यासोबतच ती ‘चूक भूल द्यावी घ्यावी’ या नाटकामध्ये देखील झळकत आहे. या नाटकातील तिच्या अभिनयाचे आणि पात्राचे कमालीचे कौतुक होत आहे. या नाटकात ती जय जय स्वामी समर्थ फेम अक्षय मुडावदकरसोबत दिसत आहे.

Recent Posts

Related Articles

Sulakshana Pandit
मनोरंजन

Sulakshana Pandit : अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचे निधन, ‘या’ अभिनेत्यासाठी राहिल्या आजन्म अविवाहित

ऑक्टोबर महिन्यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी आपला निरोप घेतला. हा सिलसिला नोव्हेंबरमध्ये देखील...

Cricket
क्रीडामनोरंजन

Cricket : कोण आहे स्टार क्रिकेटपटू स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छल?

भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला आणि सगळीकडे एकच जल्लोष झाला. आधी...

Tejaswini Lonari
मनोरंजन

Tejaswini Lonari : अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने गुपचूप उरकला साखरपुडा; बड्या नेत्याची होणार सून

सध्या मराठी मनोरंजनविश्वामधे लग्नसराईचे दिन आल्याचे चित्र आहे. अनेक मराठी कलाकार साखरपुडा...

Asarani
मनोरंजन

Asarani : दिग्गज हिंदी चित्रपट अभिनेते असरानी यांचे दुःखद निधन

हिंदी सिनेमात असे खूप कमी कलाकार होऊन गेले किंवा आहेत ज्यांचे केवळ...