Home आरोग्य Hair Care : घामामुळे चिकट होणाऱ्या केसांसाठी सोप्या टिप्स
आरोग्यलाईफ स्टाईल

Hair Care : घामामुळे चिकट होणाऱ्या केसांसाठी सोप्या टिप्स

13
Hair Care

उन्हाचा सर्वात जास्त परिणाम हा आपल्या त्वचेवर आणि केसांवर होत असतो. सतत येणाऱ्या घामामुळे आपले केस आणि त्वचा निस्तेज होऊन जाते. घाम येणे तर नैसर्गिक आहे. आपण घाम येऊ नये असे काही करू शकत नाही. कारण घाम हा आपल्या शरीराचे तापमान संतुलित करण्याचे काम करतो. त्यामुळे तो आलाच पाहिजे. प्रत्येकाला घाम हा कमी जास्त प्रमाणात येतच असतो. याच घामाचा त्रास आपल्या केसांना जास्त होतो. (Hair Care)

केसांमध्ये सतत घाम येऊन केस चिकट होतात आणि त्यांना खाज सुटते, केसांमधून दुर्गंध येतो. उन्हाळ्यात घामामुळे केस अधिक गळतात असे देखील सांगितले जाते. जर आपण याची वेळीच काळजी घेतली नाही तर घाम केसांची पूर्णपणे वाट लावू शकतो. मग या घामापासून आपण आपले केस कसे वाचवू शकतो? यासाठी काही उपाय आहेत आहेत का? हेच आपण या लेखातून जाणून घेऊया. (Beauty Tips)

मेथी पेस्ट

मेथीची पेस्ट लावल्याने घामामुळे केसांमधला चिकटपणा दूर होण्यास मदत होते. यासाठी एका छोट्या भांड्यात मेथीचे दाणे रात्रभर भिजवावे. दुसऱ्या दिवशी ते नीट धुवून त्याची पेस्ट बनवा. आता ती पेस्ट केसांना लावा आणि १० ते १५ मिनिटे राहू द्या आणि नंतर केस स्वच्छ पाण्याने धुवा. (Marathi)

चहा पावडरचे पाणी

चहा पावडरच्या पाण्यामध्ये नैसर्गिक आम्लाचे गुणधर्म असतात. केस धुताना चहा पावडरच्या पाण्याचा वापर केल्यास केस चमकदार होण्यासोबतच मजबूत देखील होतात. शिवाय केसांमध्ये घामामुळे येणार वास देखील दूर होतो. (Marathi Latest News)

=========

हे देखील वाचा : Mumbai : या सुट्ट्यांमध्ये भेट द्या मुंबईतील या ऐतिहासिक किल्ल्यांना

==========

Hair Care

दही आणि बेसन

घामामुळे केसांच्या होणाऱ्या नुकसानीपासून वाचण्यासाठी दही आणि बेसनाचा पॅक केसांना लावणे देखील फायदेशीर ठरते. हा पॅक करण्यासाठी एक कप दह्यात २ चमचे बेचन मिसळून पॅक बनवा. पॅक सर्व केसांना नीट लावा आणि १० मिनिटांनंतर पाण्याने केस धुवा. यामुळे घामाचा दुर्गंध दूर होईल आणि केस मजबूत होतील. (Marathi Trending News)

टोमॅटो मास्क

टोमॅटो मास्क केसांना लावल्याने त्वचेचा पीएच स्तर संतुलित ठेवण्यास मदत होते. पूर्ण पिकलेल्या एका टोमॅटोमध्ये एक चमचा मुलतानी माती मिसळून मिश्रण चांगले फेटून घ्या. हे मिश्रण केसाच्या मुळाशी लावा. अर्ध्या तासाने कोमट पाण्याने केस धुवा.

कोरफडीचा गर

केसांमधला घामाचा वास दूर करण्यासाठी कोरफड उत्तम पर्याय आहे. आठवड्यातून दोनदा कोरफडचा गर लावून केस धुतल्याने केस चमकदार होतील आणि केसांमधील दुर्गंधी दूर होईल. हा गर शॅम्पू करण्यापूर्वी केसांच्या मुळांवर लावा आणि १५ मिनिटे ठेवा. नंतर तो धुऊन टाका. (Marathi Top News)

गुलाबपाणी

केसांचा चिकटपणा आणि घामाचा वास दूर करण्यासाठी गुलाबपाणी देखील उपयुक्त आहे. यासाठी आंघोळ करताना दोन कप पाण्यात थोडे गुलाबजल टाका. यामुळे तुमच्या केसांना दिवसभर वास येत राहील आणि घाम येणेही कमी होईल.

Hair Care

बेकिंग सोडा

बेकिंग सोडा तेलकट, चिकट केसांपासून मुक्ती मिळवण्यासाठी सोपा आणि रामबाण उपाय आहे. यासाठी एक चमचा बेकिंग सोडा पाणी अथवा तेलात मिसळून केसांच्या मुळाशी मालिश करा. थोड्या वेळानंतर सौम्य शाम्पू वापरून केस धुवा. (Social News)

* यासोबतच उन्हाळ्यात केस मोकळे सोडणे टाळा. कारण रोज केस मोकळे सोडल्यास, त्यावर धूळ, माती साचून आणि प्रदूषणाने अधिक केस अधिकच चिकट होतील. त्यासाठी तुम्ही नियमित सैल साधी केसांची हेअरस्टाईल करा.

* कितीही घाम आला तरीही सतत केस धुतल्यास, नैसर्गिक तेल निघून जाते. आठवड्यातून केवळ २ ते ३ वेळा केस धुवा. इतर दिवशी तुम्ही ड्राय शाम्पू किंवा कोरफड जेलचा वापर करून केसांची निगा घेऊ शकता.

=========

हे देखील वाचा : Electricity : ‘या’ सोप्या टिप्स वापरून कमी करा विजेचे बिल

==========

* शाम्पू आणि कंडिशनिंगनंतर केसांना हायड्रेट करणे गरजेचे आहे. केस ओले असतानाच तुम्ही केसांवर हेअर हायड्रेटिंग स्प्रे चा वापर करा. हा स्प्रे तयार करण्यासाठी पाणी, कोरफड रस, अवाकाडो तेल मिक्स करा आणि स्प्रे बाटलीत भरून केस धुतल्यावर केसांवर फवारा.

* उन्हामुळे कोरडे आणि निस्तेज दिसू लागतात. यासाठी केसांचे सनस्क्रिन वापरावे. सनस्क्रिन हेअर स्प्रे चा वापर करून केसांची काळजी घ्या.उन्हाळा,

Recent Posts

Related Articles

Hair Care
आरोग्य

Hair Care : ‘हे’ उपाय करून घरच्या घरी पांढऱ्या केसांना करा काळे

आजच्या काळात चुकीच्या जीवन शैलीमुळे मनुष्याचे संपूर्ण दैनंदिन जीवनच बिघडून गेले आहे....

Tourism
लाईफ स्टाईल

Tourism : स्लीप टुरिझम म्हणजे काय? काय आहे हा नवा ट्रेंड?

प्रत्येक व्यक्तीच्या उत्तम आरोग्यासाठी सकस आहार, उत्तम व्यायाम जेवढा आवश्यक आहे, तेवढीच...

Chaturthi
लाईफ स्टाईल

Chaturthi : नोव्हेंबर महिन्यातील संकष्टी चतुर्थी कधी आहे? जाणून घ्या चतुर्थीचे महत्त्व आणि पूजाविधी

आपल्या सर्वांचे आराध्य दैवत म्हणजे गणपती. या गणेशाची आपण कायमच आराधना करत...

Health
आरोग्य

Health : ‘हे’ सोपे उपाय करा आणि हिवाळ्यात ओठांना कोरडे होण्यापासून वाचवा

हिवाळा म्हणजे सर्वांचाच आवडता ऋतू. छान गुलाबी थंडीमध्ये व्यायाम करायला, काम करायला...