Home मनोरंजन खान…बच्चन…कपूर…घराण्याची पुढची पिढी..
मनोरंजन

खान…बच्चन…कपूर…घराण्याची पुढची पिढी..

10
Suhana Khan, Agastya Nanda and Khushi Kapoor
खान...बच्चन...कपूर...घराण्याची पुढची पिढी...

सुहाना खान, अगस्त्या नंदा आणि खुशी कपूर हे स्टारकीड त्रिकुट लवकरच मोठ्या पडद्यावर येत आहेत.  बॉलिवूडच्या बड्या घराण्यातील या युवा पिढीला घेऊन प्रसिद्ध दिग्दर्शिका आणि लेखिका झोया अख्तर ‘द आर्चीज’ नावाचा चित्रपट घेऊन येतेय. डेहराडून येथे ‘द आर्चीज’ चित्रपटाचं शूटिंग सुरु झालं असून झोयाच्या दिग्दर्शनाखाली हे युवा स्टार काम करत आहेत.  

‘लक बाय चान्स’, ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’, ‘बॉम्बे टॉकिज’, ‘दिल धडकने दो’, ‘तलाश’, ‘गली बॉय’ यासारखे हिट चित्रपट देणारी झोया अख्तर आता ‘द आर्चीज’ या आगामी चित्रपटाच्या तयारीत आहे. यशस्वी आणि प्रयोगशील दिग्दर्शक म्हणून झोयाचा बॉलिवूडमध्ये उल्लेख केला जातो. ती उत्तम लेखिकाही असून ‘तलाश’ या चित्रपटाची पटकथाही तिनं लिहीली होती.  

गेल्या काही वर्षापासून आपल्या कॉलेज जीवनातील कथेला चित्रपट स्वरुपात आणण्यासाठी झोया प्रयत्नशील होती. तिच कथा तिनं ‘द आर्चीज’मध्ये गुंफल्याची चर्चा आहे. यामध्ये तिने शाहरुख खानची मुलगी सहाना खान, अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा आणि बोनी कपूरची धाकटी लेक, खुशी कपूरला संधी दिली आहे. 

वास्तविक या तिघांच्या डेब्युसाठी बॉलिवूडचे दिग्गज दिग्दर्शक स्पर्धेत होते. करण जोहर आणि संजय भन्साली यांचाही यात समावेश होता. करण जोहर आणि शाहरुख खान यांची मैत्री बघता सुहाना खान करण जोहरच्या चित्रपटामधूनच बॉलिवूडमध्ये एन्ट्री करेल अशी अटकळ होती. मात्र या सर्वात झोयानं बाजी मारली असून या नव्या टीमला ती आपल्या द आर्चीजमधून बॉलिवूडमध्ये घेऊन येत आहे.  

सुहाना खान आणि अगस्त्य नंदा यांचे शिक्षण परदेशात झाले असून ते दोघंही एकमेकांचे चांगले मित्र आहेत. मध्यंतरी एका क्रुजवर झालेल्या पार्टीमधले दोघांचेही फोटो सोशल मिडीयावर चांगलेच गाजले.  बोनी कपूर आणि श्रीदेवीची धाकटी लेक खुशी कपूरही आपल्या वडिलांच्याच चित्रपटामधून डेब्यु करेल अशी शक्यता होती. मात्र खुशीनं आपल्या वडीलांऐवजी झोयाला संधी दिल्यानं ती सुद्धा चर्चेत आहे.  

‘द आर्चीज’ची निर्मिती रिमा कागती असून तिनं नुकताच सुहाना, अगस्त्य आणि खुशीचा एकत्र असा फोटो शेअर केला आहे. हलकी फुलकी प्रेम कथा असलेला ‘द आर्चीज’ आता या नव्या कलाकारांसाठी आणि त्यांच्या मातब्बर कुटुंबियांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.  

=====

हे देखील वाचा – ग्लॅमरपासूर दूर असणारी कपूर गर्ल… 

=====

अगस्त्य या चित्रपटात आर्ची एंड्रयुज या भूमिकेत असेल तर खुशी आणि सुहाना, बेट्टी कूपर आणि वेरोनिका लॉज यांच्या भूमिकेत असतील. अर्थात ‘द आर्चीज’मध्ये प्रेमाचा त्रिकोण असेल अशी शक्यता आहे.  झोयानं आपल्या कॉलेज लाईफमधील आलेल्या अनुभवावर या चित्रपटाची कथा असल्याची माहिती दिली आहे.  गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यातच झोयानं ‘द आर्चीज’ची घोषणा केली होती. तेव्हापासून ती नव्या चेहऱ्यांच्या धात होती.  

ऊटी, डेहरादून आणि हिल स्टेशन परिसरात चित्रपटाचे शुटींग होणार आहे. वर्षअखेरीस द आर्चीज रिलीज होण्याची शक्यता आहे. आता या तीन मोठ्या कुटुंबातील पुढची पिढी अभिनयात कशी आहे, हे तेव्हाच स्पष्ट होईल…

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Sulakshana Pandit
मनोरंजन

Sulakshana Pandit : अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचे निधन, ‘या’ अभिनेत्यासाठी राहिल्या आजन्म अविवाहित

ऑक्टोबर महिन्यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी आपला निरोप घेतला. हा सिलसिला नोव्हेंबरमध्ये देखील...

Cricket
क्रीडामनोरंजन

Cricket : कोण आहे स्टार क्रिकेटपटू स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छल?

भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला आणि सगळीकडे एकच जल्लोष झाला. आधी...

Tejaswini Lonari
मनोरंजन

Tejaswini Lonari : अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने गुपचूप उरकला साखरपुडा; बड्या नेत्याची होणार सून

सध्या मराठी मनोरंजनविश्वामधे लग्नसराईचे दिन आल्याचे चित्र आहे. अनेक मराठी कलाकार साखरपुडा...

Asarani
मनोरंजन

Asarani : दिग्गज हिंदी चित्रपट अभिनेते असरानी यांचे दुःखद निधन

हिंदी सिनेमात असे खूप कमी कलाकार होऊन गेले किंवा आहेत ज्यांचे केवळ...