1980 मध्ये फ्रान्समध्ये इतकं ट्रॅफिक जाम झाला की तब्बल 175 किलोमीटरपर्यंत गाड्या अडकल्या होत्या. 2010 मध्ये बीजिंगच्या हायवेवर असंच ट्रॅफिक जाम झालं होतं की 50 लेनचा हायवे सुद्धा पुरता चोक झाला होता, तब्बल १२ दिवस हे ट्राफिक जाम झालं होतं. पण तुम्हाला माहिती आहे का जगातलं सर्वात जास्त वेळ चालणार ट्रॅफिक जाम किती काळ चाललं होतं? हे ट्रॅफिक जॅम दिवस, आठवडे किंवा महिन्यांचं नाही तर पूर्ण आठ वर्षांचं होतं. याचं ट्राफिक जॅमबद्दल जाणून घेऊ. (Stuck for 8 Years)
तर ही गोष्ट आहे 1967 सालाची १५ कार्गो शिप्स मेडिटेरेनियन सीकडून सुएझ कॅनालमध्ये शिरल्या. नॉर्मली हे कॅनाल पार करायला फक्त १२ तास लागतात. पण त्यांना काय माहिती, की हा १२ तासांचा प्रवास ८ वर्षं लांबेल!
सुएझ कॅनाल हा रूट शिपिंग आणि ट्रेडिंग इंडस्ट्रीचा कणा मानला जातो. 1869 च्या आधी, जेव्हा शिपिंग इंडस्ट्रीकडे स्विस कॅनॉल सारखा रूट नव्हता, तेव्हा युरोपातून आशियात आणि vice vaersa जाणारी जहाजं आफ्रिकन खंडाला वळसा घालून युरोप आणि आशियाला जायची. स्विस कॅनॉलमुळे हा महिन्यांचा प्रवास काही दिवसांवर आला आणि आता युरोपातून जहाजं मेडिटरेनियन समुद्रातून थेट रेड सीमार्गे आशियाई खंडात पोहोचू लागली. या मार्गामुळे प्रत्येक जहाज जवळपास 10,000 किलोमीटरचं अंतर वाचवतं. हाच शिपिंग इंडस्ट्रीसाठी वरदान असणारा रूट त्या १५ जहाजांसाठी श्राप ठरला होता. (Top Stories)

तर 5 जून 1967 च्या सकाळी 15 कार्गो शिप्स सुएझ कॅनॉलच्या मेडिटरेनियन बाजूने आत शिरले. साधारणपणे या कॅनॉलमधून जायला 12 तास लागतात, पण तेव्हा काळ असा होता की इजिप्त आणि इस्रायल यांच्यात आधीपासूनच काही तणाव होता आणि दोन्ही शेजारी देश एकमेकांविरुद्ध युद्धाच्या तयारीत होते. नकाशावर पाहिलं तर इजिप्त आणि इस्रायलची बॉर्डर सुएझ कॅनॉलपासून जवळपास 200 किलोमीटर दूर आहे. आणि मधला संपूर्ण भाग हा सिनाई पेनिन्सुला म्हणून ओळखला जातो. कॅनॉल बॉर्डरपासून बरंच दूर असल्यामुळे इजिप्तला आणि त्या 15 जहाजांना इस्रायलशी वाढत्या तणावाची फारशी काळजी नव्हती. पण त्या दिवशी असं काही घडलं की आणि अचानक युद्ध सुरू झालं. इस्रायली सैन्याने इजिप्तवर अचानक हल्ला केला. अवघ्या एका तासात सुएझ कॅनॉलच्या आजूबाजूला अनेक रॉकेट्स आणि विमानं कोसळली. परिस्थिती इतकी बिकट झाली की इजिप्शियन सैन्याने तात्काळ सुएझ कॅनॉल दोन्ही बाजूंनी बंद केलं.(Stuck for 8 Years)
पण तोपर्यंत इस्रायली सैन्याने संपूर्ण सिनाई पेनिन्सुलावर ताबा मिळवला होता. आता इस्रायल आणि इजिप्तची नवी बॉर्डर तयार झाली सुएझ कॅनॉल. फक्त तेचं दोन्ही देशांना एकमेकांपासून वेगळं करत होतं. इजिप्तसाठी हा खूप मोठा पराभव होता. इस्रायली सैन्याने कॅनॉल ओलांडून पुढे जाऊ नये म्हणून इजिप्तने कॅनॉलच्या दोन्ही बाजूंना आपली जहाज उभी केली, आणि स्वतःचे पूल उद्ध्वस्त केले आणि कॅनॉलमध्ये ठिकठिकाणी माइन्स लावल्या. यामागचं एकमेव कारण होतं की कॅनॉलचा वापर इस्रायलसह कुणीही करू नये. याच दरम्यान, 15 कार्गो शिप्स ग्रेट बिटर लेकमध्ये अडकून पडल्या होत्या. त्यांच्या पश्चिमेला इजिप्शियन सैन्य आणि पूर्वेला इस्रायली सैन्य होतं. या जहाजांना ना मेडिटरेनियनला परत जाता येत होतं, ना रेड सीला. थोडक्यात, त्यांच्याकडे तिथेच थांबून वाट पाहण्याशिवाय पर्याय नव्हता. याशिवाय शेकडो इतर जहाजं मेडिटरेनियन आणि रेड सीमध्ये थांबवली गेली होती, सगळे जहाजं या आशेवर होते की कदाचित हा वाद मिटेल. पण परिस्थिती आणखी गंभीर होत गेली. दिवस, आठवडे, आणि मग महिने गेले, पण इजिप्त आणि इस्रायलमधला तणाव कमी झाला नाही. याचा फटका सगळ्या जगाला बसला.(Top Stories)
शिपमेंट्स उशिरा होऊ लागली, आणि जाहाजांच्या वाहतुकीचा खर्च कित्येक पटींनी वाढला. ज्या जहाजांना आधी सुएझ कॅनॉल वापरून युरोपातून मिडल ईस्ट आणि आशियाला जाता यायचं, त्यांना आता आफ्रिकन खंडाला वळसा घालून जावं लागत होतं. पण सर्वात जास्त फटका बसला त्या पंधरा जहाजांना, जी ट्रॅफिक जाममध्ये अडकली होती.ही जहाजं आणि त्यातले क्रू मेंबर्स आपापल्या संकटात सापडले होते. यात ब्रिटिश, जर्मन, स्वीडिश, पोलिश, फ्रेंच, बल्गेरियन, चेकोस्लोव्हाकियन आणि अमेरिकन जहाजांचा समावेश होता. काही महिन्यांनंतर जेव्हा स्पष्ट झालं की हा वाद लवकर संपणार नाही, तेव्हा शिपिंग कंपन्यांनी बऱ्याचशा क्रू मेंबर्सना परत बोलावलं आणि प्रत्येक जहाजावर फक्त 10 लोक मेंटेनन्ससाठी ठेवले. दर दोन-तीन महिन्यांनी हे दहा जण बदलून नव्या टिमला पाठवलं जायचं, या आशेने की कधीतरी ही अडकलेली जहाजं बाहेर काढता येतील.(Stuck for 8 Years)
पण या सगळ्या गोंधळात एक मजेशीर गोष्ट घडली. इतका वेळ एकत्र राहिल्याने या पंधरा जहाजांच्या क्रूमध्ये जबरदस्त मैत्री झाली. मग काय, त्यांनी कंटाळा घालवायला काही मजेदार गोष्टी सुरू केल्या. जर्मन जहाजावर एक छोटंसं चर्च उघडलं, जिथे दर रविवारी सगळे ख्रिश्चन मंडळी जमायची. बल्गेरियन जहाजावर रात्री मूव्ही नाइट्स व्हायच्या. स्वीडिश जहाजावर पूल पार्टीजचा जल्लोष असायचा, तर ब्रिटिश जहाजावर फुटबॉल मॅच रंगायच्या. एवढंच नाही, तर या मंडळींनी चक्क बिटर लेकच्या मधोमध ऑलिम्पिक गेम्सचं आयोजन केलं! नाव ठेवलं ‘बिटर लेक ऑलिम्पिक्स 1968’.
===============
हे देखील वाचा : Israel : इस्रायलचा पॅटर्न आणि मोसादचे प्लॅनिंग !
===============
एकामागून एक वर्ष निघून गेली, पण ही जहाजं तिथेच अडकून होती. शेवटी तर त्यांच्यावर धूळ-मातीचा थरच जमा झाला! या जहाजांचा युद्धाशी काही संबध नव्हता, म्हणून इस्रायल आणि इजिप्तला त्यांना खाण्यापिण्याचा पुरवठा देण्यात काहीच प्रॉब्लेम नव्हता. पण सहा वर्षं उलटली आणि 1973 मध्ये हे युद्ध आणखी तीव्र झालं. यावेळी इजिप्तने जोरदार हल्ला चढवला. त्यांनी सिनाई पेनिन्सुलात घुसून इस्रायली सैन्याला चांगलंच मागे ढकललं. दोन्ही बाजूंनी जोरदार लढाया झाल्या, पण या गडबडीत एक इस्रायली रॉकेट चुकून अडकलेल्या अमेरिकन जहाजावर पडलं आणि ते पुरतं उद्ध्वस्त होऊन बुडालं. शेवटी 24 ऑक्टोबर 1973 ला दोन्ही देशांनी हात मिळवले आणि सीजफायर करार केला. आणि आपापलं सैन्य मागे घ्यायला सुरुवात केली.(Stuck for 8 Years)
सहा वर्ष चाललेलं युद्ध आता संपलं होतं, पण अडकलेल्या जहाजांचं युद्ध जणू अजूनही सुरू होतं. या सहा वर्षांत सुएझ कॅनॉलमध्ये बोटी, जहाजं, विमानं आणि रॉकेट्सचा ढिगारा जमा झाला होता. शिवाय, इजिप्तने तिथे माइन्सही लावल्या होत्या, त्यामुळे जहाजांना तिथून बाहेर पडणं जवळपास अशक्यच होतं. सुएझ कॅनॉल पूर्णपणे स्वच्छ करण्यात इजिप्तला आणखी दोन वर्ष लागली. 5 जून 1975 ला त्या सगळ्या जहाजांसाठी सुटकेचा क्षण आला.तब्बल आठ वर्षांनंतर सुएझ कॅनॉल पुन्हा उघडलं गेलं! या चौदा जहाजांना आता आपापल्या देशात परतायची वेळ आली होती. जेव्हा ती जहाजं आपापल्या देशात पोहोचली, तेव्हा लोकांनी त्यांचं जंगी स्वागत केलं. आठ वर्ष बंद राहिल्यावर सुएझ कॅनॉलपुन्हा सुरू झालं. . इतका मोठा ट्रॅफिक जाम इतिहासात यापूर्वी कधीच झाला नव्हता आणि त्यानंतरही आजपर्यंत झाला नाही.
- beijing jam
- car gridlock
- carmageddon
- carmageddon events
- commute chronicles
- commuter chaos
- commuter life
- commuter nightmares
- commuter stories
- commuter struggles
- france commute
- France Traffic Jam
- Global Curiosities
- gridlock facts
- horrific traffic
- metro gridlock
- nightmare commute
- road woes
- rush hour blues
- traffic curiosities
- traffic gridlock
- Traffic Nightmare
- traffic trivia
- traffic woes
- travel frustrations
- travel gridlock