Home मनोरंजन नववर्षात ‘हे’ स्टारकिड्स झळकणार मोठ्या पडद्यावर…
मनोरंजन

नववर्षात ‘हे’ स्टारकिड्स झळकणार मोठ्या पडद्यावर…

6
स्टारकिड्स

स्टारकिड्स हे नेहमी चर्चेचे विषय असतात. त्यांच्यावर कितीही टिका झाली तरी त्यांची क्रेझ कायम असते. सध्या बॉलिवूडच्या काही अभिनेत्यांच्या मुलांवर सोशल मिडीयावर टीका होत असली तरी त्यांचे फॅनफॉलोअर्स काही कमी नाहीत. उलट या नव्या वर्षात कोणते स्टारकिड्स मोठ्या पडद्यावर झळकणार आहेत, याचीच चर्चा रंगली आहे. त्यामध्ये श्रीदेवीची धाकटी लेक खुशी, संजय कपूरची लेक शनाया कपूर आणि छोटे नबाब अर्थात सैफ अली खानचा मुलगा इमरान खान यांच्या नावाची अधिक चर्चा आहे.  

सोशल मिडीयावर सर्वाधिक चर्चेत असणारी संजय कपूरची मुलगी शनाया कपूर, करण जोहरच्या आगामी चित्रपटातून डेब्यू करीत आहे. अभिनेता म्हणून संजय कपूर फार छाप पाडू शकले नाहीत.  मात्र शनाया माझ्यापेक्षा अधिक यशस्वी होईल, असा विश्वास संजय कपूर यांनी व्यक्त केला आहे. धर्मा प्रॉडक्शनच्या अनाम चित्रपाटासाठी आता २१ वर्षाची शनाया मेहनत घेतेय.  

श्रीदेवीची मुलगी, जान्हवीनं बॉलीवूडमध्ये आपली ओळख निर्माण केली आहे. आता तिची धाकटी बहिण, खुशी चित्रपटसृष्टीत नाव कमवण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यासाठी खुशीनं अमेरिकेमेध्ये अभिनयाचा अभ्यासक्रमही पूर्ण केला आहे. मात्र याशिवाय खुशी जास्त चर्चेत आली ती तिच्या मेकओव्हरमुळे. 

आपल्या आईसारखा, श्रीदेवीसारखा लूक येण्यासाठी खुशीनं चेहऱ्यावर प्लॅस्टीक सर्जरी केल्याची बातमी आहे. काही वर्षांपूर्वी जाडजूड असणारी खुशी आता स्लीमट्रीम झाली असून, आईसारखी दिसू लागली आहे. या तिच्या लूकबाबत तिला ट्रोलही व्हावे लागले असले तरी खुशीनं या टिकेकडे दुर्लक्ष करीत आपल्या डेब्युसाठी प्रयत्न सुरु ठेवले आहेत.

या सर्वात लक्षवेधी ठरतोय तो सैफ अली खानचा मुलगा इब्राहीम खान. मोठी बहिण साराच्या पाठोपाठ इब्राहीमसुद्धा बॉलिवूडमध्ये अभिनेता म्हणून दाखल होतोय. अर्थात सध्या इब्राहीम करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या आगामी चित्रपटाचा असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम सांभाळत आहे. ‘मिस वर्ल्ड २०१७’ मानुषी छिल्लर’, पृथ्वीराज या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करीत आहे. अक्षयकुमार यात प्रमुख भूमिकेत असून, या ऐतिहासिक चित्रपटासाठी मानुषीनं खास प्रशिक्षण घेतले आहे.  

अभिनेता गोविंदा यांचा मुलगा यशवर्धनही लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. यशवर्धनच्या बॉलिवूड प्रवेशासाठी त्याची आई, सुनीता आहूजा प्रयत्नशील आहे. याशिवाय काजोल आणि अजय देवगण यांची लेक न्यासाही सध्या चर्चेत आली आहे. 

Rare and unseen photo of Ajay Devgn-Kajol's daughter Nysa Devgan goes  VIRAL, leaves fans in awe

सिंगापूर येथे शिकणारी न्यासा बॉलिवूड पार्टी कल्चरपासून दूर होती. मात्र सावळ्या रंगाच्या न्यासाला सोशल मिडीयावर खूप चांगले फॅनफॉलअर्स आहेत. हीच न्यासा काही दिवसांपूर्वी एका बॉलिवूड पार्टीमध्ये दिसली ती चक्क वेगळ्या रंगात. सावळी न्यासा पार गोरी झाली होती. तिचा हा बदललेला ‘स्कीनटोन’ पाहता देवगण घराण्याची ही तिसरी पिढी बॉलिवूडमध्ये लवकरच प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.  

हे देखील वाचा: तेजश्री प्रधानचा कौतुकास्पद निर्णय (Tejashri Pradhan)

2021 मध्ये भारतीय लोकांनी गुगलवर सर्वात जास्त काय सर्च केलं ?

या स्टारकीडसोबत युट्यूबर कॅरी मिनाटीही बॉलीवूड डेब्यूसाठी तयार आहे. कॅरी मिनाटी हा चेहरा तरुणांमध्ये लोकप्रिय असा चेहरा आहे. अमिताभ बच्चन आणि अजय देवगण यांच्यासोबत कॅरी ‘रनवे 36’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर झळकणार असल्यामुळे कॅरीच्या चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे.  

सई बने

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Sulakshana Pandit
मनोरंजन

Sulakshana Pandit : अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचे निधन, ‘या’ अभिनेत्यासाठी राहिल्या आजन्म अविवाहित

ऑक्टोबर महिन्यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी आपला निरोप घेतला. हा सिलसिला नोव्हेंबरमध्ये देखील...

Cricket
क्रीडामनोरंजन

Cricket : कोण आहे स्टार क्रिकेटपटू स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छल?

भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला आणि सगळीकडे एकच जल्लोष झाला. आधी...

Tejaswini Lonari
मनोरंजन

Tejaswini Lonari : अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने गुपचूप उरकला साखरपुडा; बड्या नेत्याची होणार सून

सध्या मराठी मनोरंजनविश्वामधे लग्नसराईचे दिन आल्याचे चित्र आहे. अनेक मराठी कलाकार साखरपुडा...

Asarani
मनोरंजन

Asarani : दिग्गज हिंदी चित्रपट अभिनेते असरानी यांचे दुःखद निधन

हिंदी सिनेमात असे खूप कमी कलाकार होऊन गेले किंवा आहेत ज्यांचे केवळ...