Home प्रेस रिलीझ तगडी स्टारकास्ट असलेल्या “मीडियम स्पाइसी” मध्ये दिसणार स्पृहा जोशी
प्रेस रिलीझ

तगडी स्टारकास्ट असलेल्या “मीडियम स्पाइसी” मध्ये दिसणार स्पृहा जोशी

9
Spruha Joshi

“मीडियम स्पाइसी” चित्रपटाच्या ट्रेलर मधून जेष्ठ अभिनेत्री अरुंधती नाग बऱ्याच काळाने मराठी चित्रपटात दिसणार असल्याचे स्पष्ट झाले होते आणि आता चित्रपटाच्या टीमने सोशल मीडियावर जाहीर केल्याप्रमाणे स्पृहा जोशीच्या अभिनयाचा फ्लेवर रसिकांना या चित्रपटातून अनुभवता येणार आहे. आशयघन चित्रपटातून आपल्या अभिनयाची छाप उमटवणारी नव्या पिढीतील एक हरहुन्नरी कलाकार म्हणजे स्पृहा जोशी. (Spruha Joshi)

चित्रपट, रंगभूमी आणि टेलिव्हिजनवर लीलया वावरणारी आणि अभिनयाबरोबरच लेखन, सूत्रसंचालन, कविता या माध्यमातून रसिकांचे मनोरंजन करणारी स्पृहा “मीडियम स्पाइसी”मध्ये कृष्णा नावाच्या एका छोट्याशा पण वैशिष्ट्यपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.

कृष्णा नक्की कोण आहे? याचा अजून खुलासा झालेला नसला तरी जेवणाच्या थाळीत विविध फ्लेवर्स असल्यावर जसे जेवण परिपूर्ण होते तसेच स्पृहा जोशीच्या कृष्णा या पात्राच्या फ्लेवरमुळे “मीडियम स्पाइसी” चित्रपटातील पात्रांच्या विविध फ्लेवर्सने सजलेली लज्जतदार थाळी परिपूर्ण होणार आहे.

Photo Credit – Instagram

====

हे देखील वाचा: झोलझाल चित्रपटातील विनोदी भूमिकेतून अभिनेता अमोल कागणे येतोय रसिक प्रेक्षकांच्या भेटीला

====

लॅन्डमार्क फिल्म्स प्रस्तुत, विधि कासलीवाल निर्मित, इरावती कर्णिक लिखित आणि मोहित टाकळकर दिग्दर्शित आणि ललित प्रभाकर, सई ताम्हणकर, पर्ण पेठे, सागर देशमुख, नेहा जोशी, पुष्कराज चिरपुटकर, इप्शिता या तरुण कलाकारांसह ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुळकर्णी, अरुंधती नाग आणि अभिनेते रवींद्र मंकणी यांच्या सहज सुंदर अभिनयाने सजलेलया “मीडियम स्पाइसी” ची लज्जतदार डिश १७ जून २०२२ पासून संपूर्ण महाराष्ट्रात रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Mohanlal
प्रेस रिलीझ

Mohanlal : मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांना ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ जाहीर

नुकताच दादासाहेब फाळके पुरस्काराची घोषणा करण्यात आली. यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जेष्ठ...

Ghibli
प्रेस रिलीझलाईफ स्टाईलव्यक्ती विशेष

Ghibli : घिबली आर्ट म्हणजे काय? कोण आहे Ghibli ॲनिमेशनचे जनक?

सध्या सोशल मीडिया उघडल्या उघडल्या आपले स्वागत करतात ते आपल्याच लोकांचे अतिशय...

Vijay Sethupathi
प्रेस रिलीझ

शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटात ‘या’ अभिनेत्याची होणार खास एन्ट्री

बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानने (Shah Rukh Khan) 2023 मध्ये आपले नाव कोरले...

Vitthala Tuch
प्रेस रिलीझ

प्रेमाचा आविष्कार घेऊन ‘विठ्ठला तूच’ चित्रपट लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीस

विठ्ठला तूच हे ऐकताच आपल्याला आठवण येते ती आपल्या भगवान विठ्ठलाची. सर्वांच्या...