Home गाजावाजा स्पेशल नासलेलं दुध फेकून नका देऊ, ‘या’ खाद्यपदार्थांमध्ये करू शकता प्रभावी वापर 
गाजावाजा स्पेशल

नासलेलं दुध फेकून नका देऊ, ‘या’ खाद्यपदार्थांमध्ये करू शकता प्रभावी वापर 

9
Spoiled milk Recipes
Spoiled milk Recipes: नासलेलं दुध फेकून नका देऊ, या खाद्यपदार्थांमध्ये करू शकता प्रभावी वापर

उन्हाळा येताच खाण्यापिण्याबाबत विशेष काळजी घ्यावी लागते. थोड्याशा निष्काळजीपणामुळे अनेक वेळा स्वयंपाकघरात ठेवलेले खाद्यपदार्थ खराब होतात. कधी कधी दुधासोबतही असे होते. दूध हा आपल्या आहाराचा मुख्य घटक आहे. (Spoiled milk Recipes)

पूर्वीच्या काळापासून भारतीय संस्कृतीत दुधाला महत्त्व दिले जाते. दूध आणि दुधाचे पदार्थ हे सर्व पूजा- नैवेद्य यामध्ये वापरले जातात. आहारशास्त्रात दूध आणि दुधाच्या पदार्थांना ‘संपूर्ण आहार’ असे म्हणतात. नवजात शिशू आपल्या आयुष्याचे पहिले सहा महिने फक्त दुधावरच अवलंबून असतो. 

दूध आणि दुधाचे पदार्थ शाकाहारी अन्नातील मुख्य घटक आहेत. पण जेव्हा आपण ते फ्रीजमध्ये ठेवायला किंवा वेळेवर उकळून घ्यायला विसरतो, तेव्हा ते दूध नासते. जे बहुतेकजण फेकून देतात. जर तुम्हीही नासलेलं दूध खराब म्हणून फेकून देत असाल, तर या टिप्स नक्कीच वाचा. 

Spoiled milk

नासलेलं दूध अनेक पदार्थांमध्ये वापरून, त्यांची लज्जत वाढवता येते. चला तर मग जाणून घेऊया नासलेल्या दुधाचा कशा प्रकारे उपयोग करायचा. (Spoiled milk Recipes)

पनीर बनवणे

उन्हाळ्यात दूध नासले, तर ते फेकून देऊ नका. त्यापेक्षा या दुधापासून पनीर बनवा. फक्त सुती कापडात नासलेलं दूध गुंडाळा आणि त्यावर जड वस्तू ठेवा. असे केल्याने दुधाचे पाणी निघून जाईल आणि तुमच्या पनीरला छान आकार मिळेल.

सूपमध्ये टाका

जर तुम्हाला सूप प्यायला आवडत असेल, तर नासलेलं दूध सूपमध्ये टाका. असे केल्याने सूपची चव वाढेल आणि ते शरीराला देखील फायदेशीर ठरेल. 

दही आणि ताक बनवणे

Spoiled milk

नासलेल्या दुधात थोडे दही घालून, दही देखील बनवू शकता. या दुधापासून बनवलेले दहीही खूप चवदार असते. हे दही तुम्ही भाज्यांच्या ग्रेव्हीमध्ये किंवा करीमध्ये वापरू शकता. यानंतर हेच दही फेटून ताक बनवा आणि हिंग जिऱ्याचा तडका लावून त्याला उन्हाळ्यात पिऊ शकता.

केकमध्ये टाका

नासलेलं दुध केकच्या पिठात घालून शिजवले तर ते खूप चविष्ट बनते. हे फुटलेले दूध केकमध्ये बेकिंग सोडा म्हणून काम करते आणि केक बिघडत नाही.

====

हे देखील वाचा – ‘या’ नैसर्गिक गोष्टीच्या साहाय्याने करा बद्धकोष्टता आणि अपचनावर मात!

====

स्मूदी बनवण्यासाठी वापरा

नासलेलं दुध तुम्ही स्मूदी बनवण्यासाठीही वापरू शकता. आइस्क्रीम ऐवजी, स्मूदीमध्ये फुटलेले दूध घाला. असे केल्याने स्मूदी आणखी मऊ आणि चवदार होईल.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Sade Sati
गाजावाजा स्पेशल

Sade Sati : जाणून घ्या नक्की शनीची साडेसाती म्हणजे काय?

भारतात ज्योतिषशास्त्राचे मोठे महत्त्व आहे. ज्योतिष्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची संख्या भारतात सर्वाधिक...

Vande Mataram
गाजावाजा स्पेशल

Vande Mataram : ‘वंदे मातरम्’ गीताला १५० वर्षे पूर्ण

भारत जगातील सर्वात लोकप्रिय देश. आज भारताचा संपूर्ण जगामध्ये डंका वाजत आहे. ...

Royal Stories
गाजावाजा स्पेशल

Royal Stories : 365 राण्या आणि न्यूड पार्टी करणारा भारतीय राजा!

एक असा राजा ज्याच्या वर्षात जितके दिवस असतात तितक्या राण्या होत्या, त्याच्यासोबत...

Ganpati
गाजावाजा स्पेशल

Ganpati : ‘या’ गावात भाद्रपदात नाही तर चक्क लक्ष्मीपूजनाला होते गणेशाची स्थापना

भाद्रपद महिना जवळ येऊ लागला की, सगळ्यांना वेध लागतात ते गणेश चतुर्थीचे....