Home मनोरंजन साऊथ स्टार नागा चैतन्य याच्या ‘या’ घड्याळ्याचा किंमतीत येईल आलिशान फ्लॅट
मनोरंजन

साऊथ स्टार नागा चैतन्य याच्या ‘या’ घड्याळ्याचा किंमतीत येईल आलिशान फ्लॅट

9
South Movie Star
South Movie Star

साउथचा सुपरस्टार नागा चैतन्य (Naga Chaitanya) आपली वेब सीरिज ‘धूथा’ च्या कारणास्तव सातत्याने लाइमलाइटमध्ये आहे. या सीरिजच्या माध्यमातून नागाने आपला ओटीटी डेब्यू केला आहे. याशिवाय अभिनेता त्याचा आगामी सिनेमा ‘थंडेल’ मध्ये व्यस्त आहे. दिग्दर्शक चंदू मोंडेती यांच्या दिग्दर्शनाखाली हा सिनेमा तयार केला जात असून नागा चैतन्यसोबत साई पल्लवी मुख्य भूमिकेत दिसून येणार आहे. काही महिन्यांपूर्वी थंडेल सिनेमाची घोषणा करण्यात आली होती. याच दरम्यान, सोशल मीडियात नागा चैतन्यचा एक व्हिडीओ फार चर्चेत आहे. (South Movie Star)

सोशल मीडियात व्हायरल झालेल्या व्हिडीओत नागा चैतन्य चालताना दिसतोय. पण त्याच्यापेक्षा नागाच्या हातातल्या घड्याळ्याची अधिक चर्चा होतेय. खरंतर नागा चैतन्यने हातात जे घड्याळ घातले आहे त्याची किंमत ऐकून हैराण व्हाल. या घड्याळ्याची किंमतीत तुम्ही एखादे आलिशान घर खरेदी करू शकता. जाणून घेऊया नागा चैतन्यच्या या घड्याळाबद्दल अधिक…

नुकत्याच नागा चैतन्यने हैदराबाद येथे पाटेक फिलिप ब्रँडचे घड्याळ घातले होते. सर्वांचे लक्ष त्याच्या घड्याळ्याने वेधले. या लक्झरी घड्याळ्याची किंमत तब्बल 74.48 लाख रूपये असल्याचे सांगितले जात आहे. सिल्व्हर रंगाची घड्याळ्याची डाइल आणि काळ्या रंगाच्या बँडसोबत हे घड्याळ अतिशय क्लासिक दिसत आहे. पण याची किंमत ऐकून तुम्ही हैराण झाला असालच. (South Movie Star)

साउथ इंडस्ट्रीमध्ये सर्वाधिक फीस घेणाऱ्या अभिनेत्यापैकी एक नागा चैतन्य आहे. याची एकूण संपत्ती 154 कोटी रूपये आहे. नागा चैतन्य सुपरहिट सिनेमांव्यतिरिक्त जाहिरात आणि व्यवसायातून भरपूर कमाई करतो. आपल्या ऑन-स्क्रिन यशाव्यतिरिक्त नागा चैतन्य एक आलिशान आयुष्य जगतो. चैतन्यला बाइक आणि कार याचे फार वेड आहे. त्याच्याकडे महागड्या घड्याळांचे कलेक्शन देखील आहे.


आणखी वाचा: सरोज खानच्या नवऱ्याने मुलांना नाव देण्यास का दिला नकार?

Recent Posts

Related Articles

Sulakshana Pandit
मनोरंजन

Sulakshana Pandit : अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचे निधन, ‘या’ अभिनेत्यासाठी राहिल्या आजन्म अविवाहित

ऑक्टोबर महिन्यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी आपला निरोप घेतला. हा सिलसिला नोव्हेंबरमध्ये देखील...

Cricket
क्रीडामनोरंजन

Cricket : कोण आहे स्टार क्रिकेटपटू स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छल?

भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला आणि सगळीकडे एकच जल्लोष झाला. आधी...

Tejaswini Lonari
मनोरंजन

Tejaswini Lonari : अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने गुपचूप उरकला साखरपुडा; बड्या नेत्याची होणार सून

सध्या मराठी मनोरंजनविश्वामधे लग्नसराईचे दिन आल्याचे चित्र आहे. अनेक मराठी कलाकार साखरपुडा...

Asarani
मनोरंजन

Asarani : दिग्गज हिंदी चित्रपट अभिनेते असरानी यांचे दुःखद निधन

हिंदी सिनेमात असे खूप कमी कलाकार होऊन गेले किंवा आहेत ज्यांचे केवळ...