Home मनोरंजन सोनू निगम सोबत सेल्फी काढण्यासाठी धक्काबुक्की, शिवसेना आमदाराच्या मुलावर गुन्हा दाखल
मनोरंजन

सोनू निगम सोबत सेल्फी काढण्यासाठी धक्काबुक्की, शिवसेना आमदाराच्या मुलावर गुन्हा दाखल

8
Sonu Nigam Attack
Sonu Nigam Attack

मुंबईतील चेंबूर परिसरात लाइव्ह कॉन्सर्ट दरम्यान गायक सोनू निगम याला धक्काबुक्की करण्यात आल्याची घटना घडली आहे. खरंतर ही घटना सोनू सोबत सेल्फी काढण्यावरुन झाली आहे. आरोप हा उद्धव ठाकरे यांच्या गटातील आमदार प्रकाश फटरपेकर याच्यावर लावण्यात आला आहे. घटनेनंतर सोनू निगमने पोलिसात आरोपीच्या विरोधात एफआयआर दाखल केला आहे. यामध्ये इजा पोहचवणे, चुकीच्या पद्धतीने अडवणे अशी तक्रार केली आहे. आता पर्यंत आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. (Sonu Nigam Attack)

हा प्रकार खरंतर चेंबूर फेस्टिवलमध्ये फिनालेदरम्यान घडला. सोनू निगम परफॉर्म करत होता. पोलिसांकडे दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, आमदार प्रकाश यांच्या मुलाने तर प्रथम सोनू निगम यांची मॅनेजर सायरा संग हिच्या सोबत चुकीचे वर्तन केले. त्यानंतर जेव्हा सोनू निगम स्टेजवरुन खाली येत होते तेव्हा सोनूच्या बॉडीगार्डला धक्का दिला आणि त्यानंतर सोनू निगमला धक्का दिला. डीसीपी हेमराज सिंह राजपूत यांच्या मते, आरोपीचे नाव स्वप्निल फटरपेकर असे आहे.

सोनूने असे म्हटले की, कॉन्सर्ट नंतर स्टेजवरुन खाली येताना स्वप्निलने मला पकडले. त्याने हरि आणि रब्बानी यांना सुद्धा धक्काबुक्की केली जे माझा बचाव करण्यासाठी आले होते. मी पायऱ्यांवरुन खाली पडल. मी तक्रार दाखल केली आहे. जेणेकरुन लोक जबरदस्तीने सेल्फी आणि मारहाण करण्याबद्दल विचार करु शकणार नाहीत. जर काही लोखंडाचे रॉड असते तर रब्बानी याचा मृत्यू झाला असता. त्याने अशा प्रकारे धक्काबुक्की केली जी व्हायरल झालेल्या व्हिडिओत स्पष्ट दिसून येत आहे.

डीसीपी काय म्हणाले?
डीसीपी राजपूत यांनी असे म्हटले की, मी सोनू निगम याच्याशी बातचीत केली आहे. आम्हाला अद्याप असे काही पुरावे मिळाले नाहीत ज्यामुळे कळू शकते की, खरंच आरोपीला सेल्फी घ्यायचा होता की आणखी काही कारण आहे. आम्ही याचा अधिक तपास करत आहोत. (Sonu Nigam Attack)

हे देखील वाचा- ९० च्या दशकातील ‘ह्या’ होत्या बॉलिवूड मधील कॉन्ट्रोवर्शियल रिलेशनशिप

प्रियंका चतुर्वेदी काय म्हणाल्या?
शिवसेना नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी एएनआय यांच्यासोबत बातचीत करताना म्हटले की, हा हल्ला नव्हे. स्थानिक आमदाराचा मुलगा सोनू निगम याच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी जात होता. मात्र सोनूच्या बॉडीगार्डने त्याला ओळखले नसल्याने अडवले. यामुळे त्यांच्यामध्ये वाद झाला. याच कारणास्तव एक-दोनजण स्टेजवरुन खाली पडले.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Sulakshana Pandit
मनोरंजन

Sulakshana Pandit : अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचे निधन, ‘या’ अभिनेत्यासाठी राहिल्या आजन्म अविवाहित

ऑक्टोबर महिन्यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी आपला निरोप घेतला. हा सिलसिला नोव्हेंबरमध्ये देखील...

Cricket
क्रीडामनोरंजन

Cricket : कोण आहे स्टार क्रिकेटपटू स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छल?

भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला आणि सगळीकडे एकच जल्लोष झाला. आधी...

Tejaswini Lonari
मनोरंजन

Tejaswini Lonari : अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने गुपचूप उरकला साखरपुडा; बड्या नेत्याची होणार सून

सध्या मराठी मनोरंजनविश्वामधे लग्नसराईचे दिन आल्याचे चित्र आहे. अनेक मराठी कलाकार साखरपुडा...

Asarani
मनोरंजन

Asarani : दिग्गज हिंदी चित्रपट अभिनेते असरानी यांचे दुःखद निधन

हिंदी सिनेमात असे खूप कमी कलाकार होऊन गेले किंवा आहेत ज्यांचे केवळ...