Home गाजावाजा Madhya Pradesh : साप चावला आणि ४७ माणसं २७९ वेळा मेली..
गाजावाजासामाजिक

Madhya Pradesh : साप चावला आणि ४७ माणसं २७९ वेळा मेली..

14
Madhya Pradesh

मध्यप्रदेश मधलं सिवनी जिल्ह्यातील केवलारी तालुक्यातली ही गोष्ट आहे. तिथल्या एका बाईला साप चावला जिचं नाव होतं द्वारका बाई आणि साप चावल्यावर ती मेली. मेल्यावर तिचा नैसर्गिक मृत्यू झाला म्हणून तिच्या फॅमिलीला सरकारी मदत मिळाली. नंतर ती परत जिवंत झाली. पुन्हा तिला साप चावला. ती पुन्हा मेली. मग ती पुन्हा जिवंत झाली. असं एकूण २९ वेळा घडलं. जेव्हा जेव्हा ती मेली तेव्हा प्रत्येक वेळेस तिला सरकारी मदत मिळाली. आता हे फक्त तिच्या बाबतीत नाही घडलं तर अशीच एकूण ४७ माणसं २७९ वेळा मेली आणि तब्बल तीन वर्षांनी उघडकीस आलं मध्यप्रदेशातलं ‘स्नेक बाइट स्कॅम.’ काय आहे हे स्नेक बाइट स्कॅम? ज्यासाठी लोकं मरून पुन्हा जीवंत होतं होती. हे जाणून घेऊ. (Madhya Pradesh)

Madhya Pradesh

मध्यप्रदेशातला (Madhya Pradesh) बराचसा ग्रामीण भाग हा दाट जंगलांनी वेढलेला आहे. सिवनी जिल्ह्यातलं केवलारी तालुका तर जणू जंगलाच्या मधोमध वसलंय. इथे सापांचं प्रमाण इतकं आहे, की दरवर्षी जवळपास हजार लोक सापाच्या चाव्याने मरतात. याच गोष्टीचा विचार करून मध्यप्रदेश सरकारने १९९० साली एक योजना आणली. जर कोणाला साप चावल्याने, पाण्यात बुडून किंवा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला, तर त्याच्या कुटुंबाला ४ लाख रुपये मदत म्हणून मिळतात.( Social News / Updates)

आता प्रश्न पडेल की सुरुवातीला सांगितलेली गोष्ट आणि या योजनेचा काय संबंध? तर संबंध असा आहे की, २०१८ साली या योजनेचा गैरवापर करायला काही लोकांनी सुरुवात केली. सुरुवातीला आपण ज्या द्वारका बाई बद्दल ऐकलं, मुळात अशा नावाची कोणतीच बाई त्या गावात अस्तित्वात नाही. तरी सुद्धा ती कागदोपत्री मरत होती आणि पुन्हा जीवंत होतं होती. असं चक्क २९ वेळा घडलं ! आणि फक्त द्वारका बाईच नाही, तर ४७ लोकांनी असंच २७९ वेळा ‘मृत्यू’ अनुभवला. प्रत्येकवेळी त्यांच्या खात्यात ४ लाख रुपये जमा होत गेले. २०१८ ते २०२२ या कालावधीत खोटे कागदपत्र दाखवून एकूण ११ करोड २६ लाख रुपयांचा घोटाळा केला गेला. ही रक्कम वेगवेगळ्या खात्यात जमा झाली.(Madhya Pradesh)

============

हे देखील वाचा : Osama Bin Laden’s House : पाकिस्तानातील एबटाबादमध्ये राहणाऱ्या लादेनच्या घराचे काय झाले? घ्या जाणून

============

आता हे सगळं घडवून कोण आणत होतं. तर या घोटाळ्याचा मास्टरमाइंड होता सिवनीच्या तहसील कार्यालयातला एक क्लार्क, सचिन दहायत. त्याने खोटी कागदपत्रं तयार केली, बनावट मृत्यू दाखवले आणि ४७ लोकांच्या नावाने २७९ वेळा सरकारी मदत घेतली. ही रक्कम त्याने आपल्या नातेवाईक आणि ओळखीच्या लोकांच्या खात्यात ट्रान्सफर केली. उदाहरणच द्यायचं तर, द्वारका बाईच्या नावाने २९ वेळा आणि एका श्रीराम नावाच्या व्यक्तीच्या नावाने २८ वेळा पैसे ट्रान्सफर झाले. (Top Stories)

२०२२ च्या नोव्हेंबरमध्ये काही गोष्टी संशयास्पद वाटायला लागल्या. गावकऱ्यांशी बोललं, तेव्हा कळलं की द्वारका बाई किंवा श्रीराम नावाचं कोणीच त्या गावात राहत नाही. तपासात एकही खरं डेथ सर्टिफिकेट मिळालं नाही. सगळी कागदपत्रं खोटी होती! सचिन दहायतने सरकारी यंत्रणेचा गैरफायदा घेऊन हा सगळा खेळ रचला होता. त्याला तात्काळ सस्पेंड करण्यात आलं आणि ज्यांच्या खात्यात पैसे गेले, त्यांच्यावरही कारवाई आता कारवाई सुरू आहे. तर भ्रष्ट कर्मचाऱ्यांमुळे snake बाईटची जी गरिबांसाठी योजना होती ती एका scam मध्ये बदलली.

ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कोममेंट्स करून नक्की सांगा.

Recent Posts

Related Articles

Johran Mamdani
आंतरराष्ट्रीयगाजावाजा

Johran Mamdani : ममदानींचा मागचा चेहरा…रामा दुवाजी !

न्यू यॉर्कचे नवे महापौर जोहरान ममदानी यांच्या विजयामागे असलेला खरा चेहरा त्यांच्या...

Pak Vs Afghan
आंतरराष्ट्रीयगाजावाजा

Pak Vs Afghan : ग्रेटर अफगाणिस्तानच्या नकाशामुळे पाकिस्तानमध्ये पळापळ !

अफगाणिस्तान आणि पाकिस्तामधील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. आता या तणावात आणखी भर...

Devark Mandir
सामाजिक

Devark Mandir : या सूर्यमंदिरापुढे औरंगजेबानंही मानली हार !

देशभर सध्या छटपूजा उत्साहात सुरु आहे. छठ पूजेचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे...

Prince Andrew
आंतरराष्ट्रीयगाजावाजा

Prince Andrew : एक राजकुमार अखेर जमिनीवर आला !

ब्रिटीश राजे चार्ल्स तिसरे यांचे धाकटे भाऊ प्रिन्स अँड्र्यू यांना अखेर जमिनीवर...