Home लाईफ स्टाईल नववधू होणार असाल तर त्वचेसंबंधित ‘या’ चुका करणे टाळा
लाईफ स्टाईल

नववधू होणार असाल तर त्वचेसंबंधित ‘या’ चुका करणे टाळा

7
Monsoon Skin Care
Monsoon Skin Care

Skin Care Tips : लग्नाचा दिवस प्रत्येक मुलीसाठी खास असतो. यावेळी प्रत्येकाल सुंदर दिसावे असे वाटते. लग्नसोहळ्यावेळी त्वचा हेल्दी आणि सुंदर दिसण्यासाठी मुली लग्नाआधीच ब्युटी ट्रिटमेंट करण्यास सुरुवात करतात. यावेळी काही गोष्टींची काळजी घेणे अत्यावश्यक असते. अशातच तुम्ही लग्न करणार असल्यास अत्याधिक त्वचेची काळजी घेणे अत्यावश्यक आहे.

वारंवार एक्सफोलिट करू नका
चेहऱ्यावरील त्वचा स्क्रबच्या माध्यमातून एक्सफोलिएट केली जाते. जेणेकरुन त्वचेवरील डेड स्किन किंवा धूळ माती निघून जाईल. पण अत्याधिक स्क्रबिंगच्या माध्यमातून त्वचेला नुकसान पोहोचू शकते. यामुळे चेहऱ्यावर रॅशेज, इचिंग आणि ड्रायनेसची समस्या उद्भवू शकते. यावेळी अशा स्क्रबची निवड करा जो तुमच्या त्वचेला सूट होईल.

फेशिअल आणि वॅक्सिंग करणे
लग्नाआधी सातत्याने फेशिअल आणि वॅक्सिंग करण्याचा विचार करत असाल तर ही चूक करू नका. बहुतांशजणांना वॅक्सिंग केल्यानंतर रॅशेज, स्किन इरिटेशन सारखी समस्या उद्भवू शकते. ही समस्या ठिक होण्यासाठी काही वेळ लागू शकतो. खासकरुन सेंसिटिव्ह स्किन असणाऱ्यांनी त्वचेची खास काळजी घ्यावी.

ब्लीच करणार असाल तर काळजी घ्या
लग्नाआधी एक किंवा दोन दिवस आधी ब्लीच करणे टाळा. अन्यथा त्वचेला नुकसान पोहोचू शकते. यावेळी खास गोष्ट लक्षात ठेवा की, ब्लीच केल्यानंतर चेहऱ्यावर हळदीचा वापर करून नये. यामुळे त्वचेवर रिअॅक्शन होऊ शकते.

डीआयव्हाय हॅक्स वापरू नका
लग्नाआधी त्वचा अधिक सुंदर दिसण्यासाठी डीआयव्ह हॅक्स वापरू नका. याशिवाय नवे ब्युटी प्रोडक्ट्सही त्वचेवर वापरू नका. असे करणार असल्यास आधी पॅच टेस्ट जरुर करा. जेणेकरुन अॅलर्जीबद्दल कळेल. (Skin Care Tips)

लहान-लहान गोष्टींची काळजी घ्या
चेहरा चमकदार दिसण्यासाठी भरपूर पाणी प्या. दररोज सात ते आठ तासांची पुरेशी झोप घ्या. झोप पूर्ण न झाल्यास डोळ्यांखाली डार्क सर्कल येऊ शकतात. याव्यतिरिक्त डाएटमध्ये अधिक तेलकट पदार्थांचे सेवन करणे टाळा. अन्यथा चेहऱ्यावर पिंपल्सची समस्या उद्भवू शकते.


आणखी वाचा :
ओठांना मध लावण्याचे 5 आश्चर्यकारक फायदे
आरशामध्ये पाहून स्वत:शी संवाद करता का? जाणून घ्या फायदे

Recent Posts

Related Articles

Tourism
लाईफ स्टाईल

Tourism : स्लीप टुरिझम म्हणजे काय? काय आहे हा नवा ट्रेंड?

प्रत्येक व्यक्तीच्या उत्तम आरोग्यासाठी सकस आहार, उत्तम व्यायाम जेवढा आवश्यक आहे, तेवढीच...

Chaturthi
लाईफ स्टाईल

Chaturthi : नोव्हेंबर महिन्यातील संकष्टी चतुर्थी कधी आहे? जाणून घ्या चतुर्थीचे महत्त्व आणि पूजाविधी

आपल्या सर्वांचे आराध्य दैवत म्हणजे गणपती. या गणेशाची आपण कायमच आराधना करत...

Lord Shiv
लाईफ स्टाईल

Lord Shiv : का महादेवाने सर्वेश्वर अवतार घेत केले भगवान नरसिंहाशी युद्ध?

भगवान शिव आणि भगवान विष्णू यांची एकत्र पूजा करण्याचा आणि आराधना करण्याचा...

Indian Sweets | Top Marathi Headlines
लाईफ स्टाईल

Indian Sweets : मिठाईवर लावल्या जाणाऱ्या सोने, चांदीच्या वर्खची रंजक माहिती

आपल्या देशामध्ये कोणताच लहान मोठा सण, समारंभ, पूजा मिठाईशिवाय पूर्ण होत नाही....