Home मनोरंजन ‘सिंहासन’ची बदलेली ४४ वर्ष… जेव्हा शरद पवार प्रीमियर शो ला येतात
मनोरंजन

‘सिंहासन’ची बदलेली ४४ वर्ष… जेव्हा शरद पवार प्रीमियर शो ला येतात

10
sinhasan
sinhasan

मराठी सिनेसृष्टीतील ‘सिंहासन’ (Sinhasan) या सिनेमाला नुकतीच ४४ वर्ष पूर्ण झाली. याच कारणास्तव मुंबईत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या खास कार्यक्रमाला शरद पवार, सुप्रीया सुळे, नाना पाटेकर, जब्बार पटेल, मोहन आगाशे अशा मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. सिंहासन हा ७० च्या दशकातील सुपरहिट ठरलेला चित्रपट होता. जवळजवळ ४५ आठवडे हा सिनेमा सिनेमागृहात लागला होता. राजकीय विषयावर आधारित असलेला सिनेमा पाहण्याची शरद पवारांनी आवर्जुन उपस्थिती लावली होती.

याच दरम्यान जब्बार पटेल यांनी शरद पवार ज्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी मंत्रालयात शुटिंग करण्यासाठी कशी परवानगी दिली किंवा सिनेमाबद्दल यशवंतराव चव्हाण यांना कसे सांगितले असे विविध किस्से त्यांनी उघडले.

जब्बार पटेलांनी सांगितले किस्से
शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांची आणि माझी भेट झाल्याचे जब्बार पटेलांनी सांगितले. त्यांना सिनेमाबद्दल सांगितल्याने त्यांनी त्यांच्यासोबत नेले आणि तुम्हाला कुठे जायचे आहे तेथे सोडतो म्हणून सोबत घेऊन गेले. त्यांच्यासोबत निघाल्यानंतर शरद पवारांनी त्यांची कार ही थेट सांताक्रुज विमानतळावर नेली. येथे एक एअर इंडियाचे विमान आले आणि त्यामधून उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण उतरले. त्यांना पाहून आनंदाचा धक्काच बसल्याचे जब्बार यांनी म्हटले. ही भेट त्याच दिवशी झाली जेव्हा मंत्रालयात शुटिंग होणार होते.

या व्यतिरिक्त जब्बार पटेल यांनी असे ही म्हटले की, सिंहासन सिनेमाला एक वेगळाच राजकीय दृष्टीकोन आहे. त्यावेळी जनता पक्षाचा कार्यकाळ संपणार होता आणि निवडणूकांचे बिगुल वाजणार होत. त्यामुळे हा सिनेमा सेन्सॉर करण्यासाठी सर्वजण जब्बार पटेल यांच्या मागे लागले होते. अशातच त्यांच्या एका मित्राने त्यांना १० एडिटिंग रुम दिल्या. एका दिवसातच सिनेमाचे संपूर्ण एडिटिंग पूर्ण करत सेन्सॉरशिप ही मिळवली. परंतु वकील मित्राने सांगितले की, तो प्रदर्शित झालाच पाहिजे. येथे गोष्ट अशी की, चित्रपट पूर्ण रेकॉर्ड झाला नव्हता. हिंदमाता सिनेमागृहाचे मालक जब्बार पटेल यांचे खुप चांगले मित्र होते. त्यांना माझ्या सिनेमाचा शो लावण्याचा आग्रह केल्याचे जब्बार पटेलांनी या खास कार्यक्रमादरम्यान सांगितले.(Sinhasan)

हे देखील वाचा: गुलशन कुमार यांच्या ‘हनुमान चालीसा’ने YouTube वर केला नवा रेकार्ड; व्यूजमध्ये व्हिडिओ ठरला भारतात अव्वल!

शरद पवारांबद्दलचा खास किस्सा सांगताना जब्बार पटेल असे म्हणाले की, पहिल्या दिवशी सिनेमागृहात गेलो असता त्याच्या मालकाने सिनेमाचे आठवडाभरासाठी अॅडवान्स बुकिंग झाल्याचे सांगितले. याचवेळी पहिल्या शो ला कोण येणार असे विचारले. तेव्हा त्यांनी उत्तर देत म्हटले मुख्यमंत्री येणार आहेत. सिंहासन सिनेमाच्या प्रिमियर शो ला शरद पवारांनी आवर्जुन उपस्थिती लावली आणि त्यानंतर तब्बल ४४ आठवडे तो सिनेमा सिनेमागृहात चालला.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Sulakshana Pandit
मनोरंजन

Sulakshana Pandit : अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचे निधन, ‘या’ अभिनेत्यासाठी राहिल्या आजन्म अविवाहित

ऑक्टोबर महिन्यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी आपला निरोप घेतला. हा सिलसिला नोव्हेंबरमध्ये देखील...

Cricket
क्रीडामनोरंजन

Cricket : कोण आहे स्टार क्रिकेटपटू स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छल?

भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला आणि सगळीकडे एकच जल्लोष झाला. आधी...

Tejaswini Lonari
मनोरंजन

Tejaswini Lonari : अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने गुपचूप उरकला साखरपुडा; बड्या नेत्याची होणार सून

सध्या मराठी मनोरंजनविश्वामधे लग्नसराईचे दिन आल्याचे चित्र आहे. अनेक मराठी कलाकार साखरपुडा...

Asarani
मनोरंजन

Asarani : दिग्गज हिंदी चित्रपट अभिनेते असरानी यांचे दुःखद निधन

हिंदी सिनेमात असे खूप कमी कलाकार होऊन गेले किंवा आहेत ज्यांचे केवळ...