Home लाईफ स्टाईल कृष्ण जन्माष्टमीची माहिती आणि पूजा मुहूर्त
लाईफ स्टाईल

कृष्ण जन्माष्टमीची माहिती आणि पूजा मुहूर्त

11
Krishna Janmashtami 2024

हिंदू धर्मात विष्णू देवाला सृष्टीचे पालन करणारा देव मानले गेले आहे. धर्माच्या रक्षणासाठी हिंदू धर्मग्रंथ भागवतपुराणानुसार सतयुग ते कलीयुगापर्यंत विष्णूने २४ अवतार घेतले आहेत. त्यामधील दहा प्रमुख अवतार ‘दशावतार’ स्वरुपात प्रसिध्द आहेत. यातलाच आठवा अवतार म्हणजे ‘श्रीकृष्ण अवतार’. १६ कला अवगत असलेला पूर्ण रूपातील अवतार म्हणून श्रीकृष्णाला ओळखले जाते.

पृथ्वीवर जेव्हा-जेव्हा पाप आणि अधर्म वाढला तेव्हा-तेव्हा श्रीहरी विष्णू यांनी पृथ्वीवर अवतार घेतला आहे. श्रीहरी विष्णू यांचे अनेक अवतार असून त्यापैकी एक म्हणजे श्रीकृष्ण अवतार. मथुरेच्या राजकन्या आणि कंसाची बहीण असलेल्या देवकी आणि वासुदेव यांचे आठवे अपत्य म्हणून श्रीकृष्णाचा जन्म झाला. कंसाच्या अत्याचाराने संपूर्ण समाजाला त्रासून सोडले होते. आपल्या मामाचा वध करण्यासाठी श्रीकृष्ण यांनी अवतार घेतला. कान्हाचे बालपण गोकुळात आई यशोदेच्या कुशीत गेले. श्रीकृष्णाने त्यांच्या जन्मापासूनच आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर चमत्कार दाखवले.

श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर श्रीकृष्णाचा जन्म झाला. त्यामुळे त्या अष्टमीला हा जन्मदिवस उत्साहाने साजरा होतो. महाराष्ट्रात त्या दिवशी श्रावण वद्य अष्टमी असते, उत्तरेकडे तो दिवस भाद्रपद वद्य अष्टमीचा असतो. श्रीकृष्णांचा जन्माष्टमी उत्सव भारतभर साजरा केला जातो. मथुरेमध्ये या सणाला जास्त महत्व आहे. महाराष्ट्रात देखील रात्री कृष्णजन्म मोठ्या उत्साहाने साजरा होतो.

Krishna Janmashtami 2024

आपल्या पुराणानुसार, हिंदू धर्मात ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. यातील ब्रह्मा निर्माता, विष्णू पालनहार तर शिवाला संहारक मानले जाते. श्री कृष्ण हा विष्णूचा आठवा अवतार आहे. श्रीकृष्णाची जन्म तिथी. जन्माष्टमी म्हणून ओळखली जाते. मान्यतेनुसार, या दिवशी लोक व्रत करतात आणि मध्यरात्री श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करतात. या दिवशी मंदिरे विशेष सजवली जातात. तर महाराष्ट्रासह काही ठिकाणी दहीहंडीही साजरी केली जाते.

यावर्षी २६ ऑगस्ट सोमवार रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे. भगवान श्रीकृष्णाची जन्मतिथी जन्माष्टमी म्हणून साजरी केली जाते. या दिवशी अनेक लोक उपवास करतात आणि भगवान श्रीकृष्णाच्या भक्तीत तल्लीन होतात. जन्माष्टमीच्या दिवशी गोपाळ कृष्णाला सुंदर सजवलेल्या पाळण्यामध्ये ठेवले जाते. कृष्ण जन्माष्टमीची तारीख, पूजा पद्धत, शुभ वेळ आणि कथा जाणून घेऊया.

अष्टमी तिथी प्रारंभ – २६ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ३ वाजून ३९ मिनिटे.

अष्टमी तिथी समाप्ती – २७ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी २ वाजून १९ मिनिटे.

रोहिणी नक्षत्र प्रारंभ – २६ ऑगस्ट २०२४ दुपारी ३ वाजून ५५ मिनिटे.

रोहिणी नक्षत्र समाप्ती – २७ ऑगस्ट २०२४ दुपारी ३ वाजून ३८ मिनिटे.

कृष्ण जन्माष्टमीचा शुभ मुहूर्त

पूजेची वेळ – २६ ऑगस्ट, पहाटे १२ वाजून ६ मिनिटे ते १२ वाजून ५१ मिनिटे.

पूजा कालावधी – ०० तास ४५ मिनिटे

चंद्रोदय वेळ – रात्री ११ वाजून २० मिनिटे.

यावर्षी एक दुर्मिळ आणि मोठा योग जन्माष्टमीच्या दिवशी जुळून आला आहे. यंदा जन्माष्टमी आणि अष्टमी तिथी एकाच दिवशी आल्या आहेत.

======

हे देखील वाचा : चमत्कारी नागवासुकी मंदिर

======

कृष्ण जन्माष्टमीच्या पूजेची पद्धत

या दिवशी सकाळी लवकर उठून नित्यकर्म आवरून आंघोळ करून शुचिर्भूत व्हा. तुमच्या घरातील देवघर स्वच्छ करा. बाळकृष्णाचा पाळणा सजवून, श्रीकृष्णाला पंचामृत, गंगाजल आणि दुधाने अभिषेक करा. त्यांनतर पुन्हा स्वच्छ पाण्याने अभिषेक करा. पुढे बाळकृष्णाला स्वच्छ वस्त्राने पुसून कपडे, दागिने, मुकुट आणि फुलांच्या माळा घाला. श्रीकृष्णाला त्यांच्या पाळण्याला फुलांनी सजवा. नंतर बाळकृष्णाला पाळणामध्ये बसवून त्यांना झुला द्या. तुपाचा दिवा लावून देवाची आरती करा. लोणी आणि साखरेची मिठाई अर्पण करा. अनेक ठिकाणी दहीपोहे, पेठे, फराळ आदी अनेक गोष्टींचा नैवेद्य देवाला दाखवला जातो.

Recent Posts

Related Articles

Tourism
लाईफ स्टाईल

Tourism : स्लीप टुरिझम म्हणजे काय? काय आहे हा नवा ट्रेंड?

प्रत्येक व्यक्तीच्या उत्तम आरोग्यासाठी सकस आहार, उत्तम व्यायाम जेवढा आवश्यक आहे, तेवढीच...

Chaturthi
लाईफ स्टाईल

Chaturthi : नोव्हेंबर महिन्यातील संकष्टी चतुर्थी कधी आहे? जाणून घ्या चतुर्थीचे महत्त्व आणि पूजाविधी

आपल्या सर्वांचे आराध्य दैवत म्हणजे गणपती. या गणेशाची आपण कायमच आराधना करत...

Lord Shiv
लाईफ स्टाईल

Lord Shiv : का महादेवाने सर्वेश्वर अवतार घेत केले भगवान नरसिंहाशी युद्ध?

भगवान शिव आणि भगवान विष्णू यांची एकत्र पूजा करण्याचा आणि आराधना करण्याचा...

Indian Sweets | Top Marathi Headlines
लाईफ स्टाईल

Indian Sweets : मिठाईवर लावल्या जाणाऱ्या सोने, चांदीच्या वर्खची रंजक माहिती

आपल्या देशामध्ये कोणताच लहान मोठा सण, समारंभ, पूजा मिठाईशिवाय पूर्ण होत नाही....