Home मनोरंजन अभिनयाआधी एकेकाळी कॉफी शॉपमध्ये काम करायची श्रद्धा कपूर
मनोरंजन

अभिनयाआधी एकेकाळी कॉफी शॉपमध्ये काम करायची श्रद्धा कपूर

8
Shraddha Kapoor
Shraddha Kapoor

Shraddha Kapoor Work Life : श्रद्धा कपूरची ओखळ बॉलिवूडमधील हिट अभिनेत्रींपैकी एक होते. सध्या श्रद्धा आणि राजकुमार राव यांचा स्री-2 सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. याआधी आलेला स्री सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस पडला होता. अभिनेत्रीने आपल्या करियरमध्ये एकापेक्षा एक उत्तम सिनेमे दिले आहेत. याशिवाय अभिनेत्रीची जबरदस्त फॅन फॉलोइंग देखील आहे. श्रद्धा कपूर शक्ती कपूर यांची लेक असून आपल्या साधेपणासाठी ओखळली जाते. पण तुम्हाला माहितेय का, एकेकाळी श्रद्धाला सलमान खानसोबतचा एक सिनेमा करण्यासाठी विचारण्यात आले होते. यासाठी श्रद्धाने नकार दिला होता. त्यावेळी श्रद्धा कपूर एका कॉफी शॉपमध्ये काम करायची.

कॉफी शॉपमध्ये काम करायची श्रद्धा कपूर
श्रद्धा कपूरच्या परिवारातील काही मंडळींचे सिनेसृष्टीसोबत संबंध राहिलेले आहेत. शक्ती कपूर बी-टाउनमध्ये विलेनची भूमिका सिनेमांमध्ये साकारण्यासाठी प्रसिद्ध आहेत. याशिवाय श्रद्धाची आई शिवांगी कपूर या पद्मिनी कोल्हापुरे यांची बहिण आहे. श्रद्धा कपूर, लता मंगेशकर, आशा भोसले आणि हृदयनाथ मंगेशकर यांची पणतू आहे. अभिनेत्रीला अभिनयासह गायनाची देखील आवड आहे. श्रद्धाने आपले शिक्षण परदेशातून पुर्ण केले आहे. यावेळी श्रद्धाने आपला खर्च करण्यासाठी एका कॉफी शॉपमध्ये काम देखील केले आहे. वयाच्या 16 व्या वर्षी श्रद्धा कपूरला सलमान खानसोबत काम करण्याची ऑफर मिळाली होती. पण श्रद्धाने नकार दिला होता. खरंतर, श्रद्धाला त्यावेळी पूर्णपणे शिक्षणात लक्ष द्यायचे होते. श्रद्धाच्या आई-वडिलांनी तिने डॉक्टर व्हावे असे वाटत होते. पण श्रद्धाने अभिनयाचे क्षेत्र निवडले. (Shraddha Kapoor Work Life)

श्रद्धाचे हिट सिनेमे
श्रद्धा कपूरने बॉलिवूडमध्ये ‘तीन पत्ती’ सिनेमातून पदार्पण केले होते. याशिवाय श्रद्धाने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये काम केले आहे. यापैकी काही सिनेमे हिट राहिले आहेत. वर्ष 2013 मध्ये अभिनेत्रीने आदित्य रॉय कपूरसोबत ‘आशिकी-2’ सिनेमात काम केले होते. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. यानंतर ‘एक विलेन’, ‘हैदर’, ‘एबीसीडी-2’, ‘बागी’ आणि ‘स्री’ अशा देखील सुपरहिट सिनेमांमध्ये श्रद्धाने काम केले आहे.


आणखी वाचा :
‘मी जिवंत आहे’ श्रेयस तळपदेने केली संतापजनक पोस्ट
कोलकाता घटनेवर किरण मानेंची सणसणीत पोस्ट

Recent Posts

Related Articles

Sulakshana Pandit
मनोरंजन

Sulakshana Pandit : अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचे निधन, ‘या’ अभिनेत्यासाठी राहिल्या आजन्म अविवाहित

ऑक्टोबर महिन्यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी आपला निरोप घेतला. हा सिलसिला नोव्हेंबरमध्ये देखील...

Cricket
क्रीडामनोरंजन

Cricket : कोण आहे स्टार क्रिकेटपटू स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छल?

भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला आणि सगळीकडे एकच जल्लोष झाला. आधी...

Tejaswini Lonari
मनोरंजन

Tejaswini Lonari : अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने गुपचूप उरकला साखरपुडा; बड्या नेत्याची होणार सून

सध्या मराठी मनोरंजनविश्वामधे लग्नसराईचे दिन आल्याचे चित्र आहे. अनेक मराठी कलाकार साखरपुडा...

Asarani
मनोरंजन

Asarani : दिग्गज हिंदी चित्रपट अभिनेते असरानी यांचे दुःखद निधन

हिंदी सिनेमात असे खूप कमी कलाकार होऊन गेले किंवा आहेत ज्यांचे केवळ...