Home प्रेस रिलीझ पाच भारतीय भाषांमध्ये घुमणार शिवगर्जना ‘हर हर महादेव’
प्रेस रिलीझ

पाच भारतीय भाषांमध्ये घुमणार शिवगर्जना ‘हर हर महादेव’

9
Har Har Mahadev

केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशभरात आणि जगात कुठेही असणाऱ्या मराठी माणसाला सतत प्रेरणा देणारं, ऊर्जा देणारं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि या अखंड उर्जेला सतत प्रवाही ठेवणारी गोष्ट म्हणजे ‘हर हर महादेव’ (Har Har Mahadev) ही शिवगर्जना ! शिवाजी महाराजांचं कार्य त्यांची थोरवी याचं आकर्षण, कुतूहल आजही अनेकांच्या चर्चेचा, अभ्यासाचा विषय असतो. केवळ महाराष्ट्रातच नाही तर इतर भारतीय भाषिकही महाराजांच्या कार्यावर संशोधन करतात.

महाराजांचा हाच महिमा भव्य दिव्य स्वरूपात सर्वांसमोर येणार आहे ‘हर हर महादेव’ या चित्रपटातून. आणि हा महिमा सर्वदूर पोहचावा यासाठीच या चित्रपटाची निर्मिती संस्था असलेल्या झी स्टुडिओजने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ‘हर हर महादेव’ हा चित्रपट मराठीसह हिंदी, तामिळ, तेलगू आणि कन्नड या भाषांमध्ये एकाच दिवशी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

मराठी चित्रपटांच्या इतिहासात आजवर कधीही न घडलेली अशी ही घटना हर हर महादेवच्या निमित्ताने घडणार आहे. अभिजित देशपांडे यांच्या लेखन आणि दिग्दर्शनाने सजलेला हा चित्रपट दिवाळीमध्ये सर्वांच्या भेटीस येणार आहे.

दक्षिणेकडील सिनेमाचं दैदीप्यमान यश, हिंदी भाषेत डब (भाषांतरीत) होऊन सर्वदूर पोहोचलेला दक्षिण सिनेमा आज सर्वांवर गारुड करण्यात यशस्वी झालाय. आपला मराठी सिनेमा असा भव्य दिव्य कधी बनणार ? तो इतर भाषांमध्ये कधी प्रदर्शित होणार ? याबद्दलच्या चर्चा आपण नेहमी करतो किंवा ऐकतो. या प्रश्नांना आणि चर्चांना आता एक सकारात्मक उत्तर मिळणार आहे ‘हर हर महादेव’ चित्रपटाच्या माध्यमातून.

याबद्दल बोलताना झी स्टुडिओजचे व्यवसाय प्रमुख मंगेश कुलकर्णी म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्यच इतकं महान आणि भव्य आहे की ते फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित राहू शकत नाही. महाराजांची युद्धनीती ,संघटन कौशल्य जगभरात अभ्यासलं जातं. आज इतर भाषांमधील काल्पनिक गोष्टी आपल्याला मोहवून टाकत आहेत त्यामुळे आपला खरा, प्रेरणादायी आणि देदीप्यमान असा इतिहास तेवढ्याच भव्यतेने जगासमोर आलाच पाहिजे ही भावना आमच्या मनात होती.

====

हे देखील वाचा: बॉलिवूडमधील रोमँटिक गाण्यांसाठी प्रसिद्ध होते बालसुब्रमण्यम, जाणून घ्या त्यांच्याबद्दल

====

या भावनेतूनच आम्ही हर हर महादेव सर्व भारतात पाच भाषांमध्ये प्रदर्शित करायचं ठरवलं आहे. या चित्रपटाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे याची व्हिएफएक्स टीम. अनेक हॉलिवूडपटांवर काम करणारे व्हिएफएक्स तंत्रज्ञ यावर काम करत असून तब्बल ४०० हुन अधिक तंत्रज्ञांचा यात समावेश आहे.” सुनील फडतरे यांच्या श्री गणेश मार्केटिंग आणि झी स्टुडिओजची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन अभिजित देशपांडे यांचं आहे. येत्या दिवाळीत हा चित्रपट सर्व प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Mohanlal
प्रेस रिलीझ

Mohanlal : मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांना ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ जाहीर

नुकताच दादासाहेब फाळके पुरस्काराची घोषणा करण्यात आली. यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जेष्ठ...

Ghibli
प्रेस रिलीझलाईफ स्टाईलव्यक्ती विशेष

Ghibli : घिबली आर्ट म्हणजे काय? कोण आहे Ghibli ॲनिमेशनचे जनक?

सध्या सोशल मीडिया उघडल्या उघडल्या आपले स्वागत करतात ते आपल्याच लोकांचे अतिशय...

Vijay Sethupathi
प्रेस रिलीझ

शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटात ‘या’ अभिनेत्याची होणार खास एन्ट्री

बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानने (Shah Rukh Khan) 2023 मध्ये आपले नाव कोरले...

Vitthala Tuch
प्रेस रिलीझ

प्रेमाचा आविष्कार घेऊन ‘विठ्ठला तूच’ चित्रपट लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीस

विठ्ठला तूच हे ऐकताच आपल्याला आठवण येते ती आपल्या भगवान विठ्ठलाची. सर्वांच्या...