शारदीय नवरात्र हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे. देवी दुर्गा आणि तिच्या नऊ रूपांना समर्पित हा उत्सव स्त्री शक्तीचा विजय म्हणूनही साजरा केला जातो. अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून नवमी तिथीपर्यंत हा सण साजरा केला जातो आणि दशमी तिथी विजयादशमी म्हणजेच दस-याला या उत्सवाची समाप्ती होते. यावर्षी शारदीय नवरात्रीची सुरुवात 22 सप्टेंबरला रोजी होत असून 2 ऑक्टोबरपर्यंत हा मातेचा उत्सव साजरा होणार आहे. यावर्षा 24 आणि 25 सप्टेंबर रोजी तृतीया तिथी असल्यामुळे नवरात्र उत्सव 10 दिवसांचा असणार आहे. यावर्षीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, यावर्षी मातेचा स्वारी ही हत्तीवरुन असणार आहे. हिंदू धर्मात हत्तीला सौभाग्याचे प्रतिक मानले जाते. त्यामुळे देवीच्या भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. (Sharadiya Navratri)

शारदीय नवरात्र हा हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक आहे. आश्विन महिन्यातील या उत्सवाच्या काळात देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. यात माता शैलपुत्री, माता ब्रह्मचारिणी, माता चंद्रघंटा, माता कुष्मांडा, माता स्कंदमाता, माता कात्यायनी, माता कालरात्री, माता महागौरी आणि माता सिद्धिदात्री यांची पूजा केली जाते. हिंदू पौराणिक ग्रंथांमध्ये माता दुर्गेची पूजा करण्याचा सर्वोत्तम काळ म्हणून नवरात्र उत्सवाच्या नऊ दिवसांचा उल्लेख आहे. नवरात्रीचा प्रत्येक दिवस देवीच्या विशिष्ट रूपाला समर्पित असतो आणि त्याचे वेगळे महत्त्व असते. स्त्री शक्तीचा हा उत्सव यावर्षी 9 ऐवजी 10 दिवस असणार आहे. (Social News)
यावेळी तृतीया तिथी वाढली आहे. ही तृतीया तिथी 24 आणि 25 सप्टेंबर रोजी असेल. यामुळे, शारदीय नवरात्र 2 ऑक्टोबर रोजी संपेल आणि दसरा देखील त्याच दिवशी साजरा केला जाईल. 2024 मध्ये देखील 10 दिवसांचा शारदीय नवरात्र साजरा झाला होता. आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाची प्रतिपदा 21 सप्टेंबरच्या मध्यरात्री 1.24 वाजता सुरू होईल. 22 रोजी हस्त नक्षत्र सकाळी 11.55 पासून असल्यानं नवरात्रात घटस्थापनेसाठी हा शुभ काळ असणार आहे. मुख्य म्हणजे, यावर्षी सोमवारपासून शारदीय नवरात्र सुरू होत आहे. म्हणून, देवीचे वाहन हत्ती असेल. हत्ती हे वाहन शुभ मानले जाते. असे मानले जाते की, हत्तीवर आईचे आगमन असल्यामुळे सुख, शांती आणि जनतेच्या कल्याणाचा संदेश यातून दिला जाणार आहे. शिवाय या वर्षी देशात शेती चांगली होऊन अन्नधान्याचा साठा वाढेल, असा संदेशही यामध्ये असल्याचे सांगण्यात येते. (Sharadiya Navratri)

वैदिक कॅलेंडरनुसार, शारदीय नवरात्रामध्ये घट बसवले जातात. या घटांच्या रुपानं माता दुर्गेची प्रतिष्ठापना केली जाते. यासाठी 22 रोजी अमृत मुहूर्त सकाळी 6.19 ते 7.49 हा असणार आहे. तर शुभ मुहूर्त, सकाळी 9.14 ते 10.49 असा असणार आहे. अभिजित मुहूर्त हा सकाळी 11.55 ते दुपारी 12.43 पर्यंत असेल. शारदीय नवरात्रीच्या पूजाही प्रत्येक दिवसाप्रमाणे असतील. 22 सप्टेंबर रोजी प्रतिपदा तिथी, 23 सप्टेंबर, रोजी द्वितीया तिथी, 24 सप्टेंबर रोजी तृतीया तिथी, 25 सप्टेंबर रोजी तृतीया तिथी, 26 सप्टेंबर रोजी चतुर्थी तिथी, 27 सप्टेंबर रोजी पंचमी तिथी, 28 सप्टेंबर रोजी षष्ठी तिथी, 29 सप्टेंबर रोजी सप्तमी तिथी, 30 सप्टेंबर रोजी अष्टमी तिथी, 1 ऑक्टोबर रोजी नवमी तिथी, 2 ऑक्टोबर रोजी दसरा अशा स्वरुपात नवरात्र उत्सव साजरा होणार आहे. (Social News)
=========
Ashtavinayak : अष्टविनायकांमधील दुसरा गणपती- थेऊरचा चिंतामणी
Radha : राधा अष्टमीचे व्रत म्हणजे काय? कधी केले जाते हे व्रत?
=========
शारदीय नवरात्र उत्सवासाठी भारतभरातील देवीच्या सगळ्याच मंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी होते. यासोबतच देवीच्या 51 शक्तीपीठांमध्ये या नवरात्र उत्सव काळात मोठी गर्दी असते. शक्तीपीठे ही पवित्र स्थाने आहेत जिथे माता सतीच्या शरीराचे अवयव पडले होते. ही तीर्थक्षेत्रे भारतासह भारतीय उपखंडात तसेच पाकिस्तान, नेपाळ आणि बांगलादेश सारख्या देशांमध्ये आहेत. हिंदू धर्मात या शक्तीपीठांचे अत्यंत पवित्र असे स्थान आहे. या सर्वच शक्तीपीठांमध्ये नवरात्र उत्सवामध्ये देवीच्या नामाचा जप आणि मोठे होम केले जातात. या सर्व उत्सवासाठी मंदिरांमध्ये भारतासह परदेशातूनही मोठ्या संख्येनं भाविक येतात. (Sharadiya Navratri)
सई बने
- America
- Bangladesh
- BJP
- china
- congress
- cricket
- donald trump
- eknath shinde
- Entertainment
- india
- International news
- Latest International News
- latest marathi news
- latest marathi updates
- latest social updates
- Maharashtra
- maharashtra politics
- Marathi News
- Mata Brahmacharini
- Mata Chandraghanta
- Mata Kalratri
- Mata Katyayani
- Mata Kushmanda
- Mata Mahagauri
- Mata Siddhidatri
- Mata Skandamata
- Mumbai
- Narendra Modi
- Nepal
- News
- Political News
- political updates
- Politician
- Politics
- Shailaputri
- Sharadiya Navratri
- Social News
- Social Updates
- todays marathi headlines
- Todays Marathi News
- Top Marathi Headlines
- Top Stories
- राजकारण