भारताच्या स्वातंत्र्याचा इतिहास हा तर जग जाहिरच आहे. भारतातल्या अनेक क्रांतिकारकांनी खस्ता खाऊन, संघर्ष करून भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलय. पण आज जरी भारतातला प्रत्येक भाग स्वतंत्र असला तरी असा एक रेल्वेमार्ग आहे जो स्वतंत्र नाहीये आणि आजही तो ब्रिटिशांच्या ताब्यात आहे. हा रेल्वे मार्ग म्हणजे शकुंतला रेल्वे मार्ग ! ज्यावर फक्त एकच प्रवासी ट्रेन धावते आणि या रेल्वे मार्गावर ही ट्रेन चालवण्याच्या बदल्यात भारत सरकारला अंदाजे १.५ कोटी रुपये इतकी रक्कम दरवर्षी ब्रिटिशांना द्यावी लागते. पण असं नेमकं का ? काय आहे यामागची गोष्ट जाणून घेऊ.(Shakuntala Express)
आजवर तुम्ही भारतीय रेल्वेशी संबंधित अनेक चित्रविचित्र गोष्टी वाचल्या असतील, ऐकल्या असतील. पण तुम्ही कधी शकुंतला रेल्वेबद्दल ऐकलंय का ? तर मंडळी पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून यवतमाळची ओळख आहे. याच यवतमाळ- मूर्तिजापूर- अचलपूर दरम्यान ब्रिटिश राजवटीत बांधलेली ११४ किमी लांबीची एक नॅरोगेज रेल्वे लाईन आहे. तीच ही शकुंतला रेल्वे लाईन ! या मार्गावरून धावणारी एकमेव ट्रेन म्हणजे शकुंतला एक्सप्रेस !स्वातंत्र्यसैनिक श्रीमंत बळवंतराव देशमुख यांच्या पत्नी शकुंतलाबाई जाधव यांच्या नावावरूनच या गाडीला शकुंतला नाव पडल्याच सांगण्यात येत. शकुंतलाबाईंचे वडील रेल्वेत अधिकारी होते. त्यांनीच या ट्रेनला हे नाव दिलं असं सांगितलं जात. स्वातंत्र्यापूर्वी लग्न झाल्यावर त्या याच गाडीने पहिल्यांदा सासरी आल्या होत्या असाही एक किस्सा आहे. (Top Stories)
दरम्यान २५ डिसेंबर १९०३ रोजी सुरू झालेली शकुंतला रेल्वे ही अनेक वर्ष वऱ्हाडवासीयांची जीवनरेखा होती. क्लिक-निक्सन अँड कंपनी या एका ब्रिटिश खासगी कंपनीने या रेल्वेलाईनची उभारणी केली होती. वऱ्हाडात मुबलक पिकणारा कापूस मुंबईत आणि तेथून मँचेस्टरच्या सूतगिरण्यांना पुरविण्यासाठी या रेल्वेलाईनची उभारणी केली गेली होती. थोडक्यात त्यांनी त्यांच्या फायद्यासाठी ही लाईन उभारली.(Shakuntala Express)
त्यानंतर शकुंतला एक्सप्रेसला आज जवळपास सव्वाशे वर्ष होत आली आहेत. नॅरोगेज रेल्वे लाईनवर ही ट्रेन धावते. त्याचं ब्रॉडगेज मध्ये रूपांतर करण्यासाठी २०२४ मध्येही प्रयत्न करण्यात आले पण ही रेल्वेलाईन ज्या कंपनीच्या मालकीची आहे त्या कंपनीने म्हणजेच क्लिक-निक्सन अँड कंपनी जिचं आजचं नाव सेंट्रल प्रोव्हिन्स रेल्वे कंपनी असं आहे त्यांनी यावर दावा सांगितला. जर हि रेल्वेलाईन ताब्यात घ्यायची असेल तर १,८६५ कोटींची त्यांनी मागणी केली. याचं कारण म्हणजे १९०३ साली जेव्हा ही रेल्वे सुरु झालेली तेव्हा कंपनीने तत्कालीन ब्रिटिश सरकारबरोबर १०० वर्षांचा करार केला होता. खरं तर आता हा करार संपलाय पण ती कंपनी यावरचा अधिकार सोडायला तयार नाहीये. दरम्यान १९५१ मध्ये, भारतीय रेल्वेच राष्ट्रीयीकरण झाल, परंतु हा मार्ग भारत सरकारच्या नियंत्रणाखाली आला नाही. त्यामुळे आजही शकुंतला ज्यावरून धावते ते रूळ ब्रिटिश कंपनीच्या मालकीचे असल्यामुळे भारतीय रेल्वेलाच या विदेशी कंपनीला रॉयल्टी द्यावी लागते. (Top Stories)
या रेल्वे ट्रॅकवर शकुंतला एक्सप्रेस नावाची फक्त एकच प्रवासी ट्रेन धावते. या एक्सप्रेसबद्दल सांगायचं झालं तर १०० वर्ष जुनी ५ डब्यांची ही ट्रेन ७० वर्ष वाफेच्या इंजिनने खेचली जात होती. हे इंजिन १९२१ मध्ये युकेमधील मँचेस्टर इथे तयार करण्यात आलं होत. त्यानंतर १९९४ मध्ये शकुंतला एक्सप्रेसच स्टीम इंजिन डिझेल इंजिनमध्ये बदलण्यात आल. या रेल्वे मार्गावर बसवलेले सिग्नल अजूनही ब्रिटिश काळातील आहेत. पूर्वी मालवाहतुकीसाठी तयार करण्यात आलेली ही ट्रेन नंतर पॅसेंजर ट्रेनमध्ये कन्व्हर्ट झाली. अत्यंत कमी भाड्यामुळे ही गरिबांना परवडणारी असली तरी हिचा वेग कायम थट्टेचा विषय राहिला आहे. यवतमाळपर्यंतचे अंतर कापायला शकुंतला सहा ते सात तास घेते.(Shakuntala Express)
===============
हे देखील वाचा : Michael Rockefeller : आदिवासींनी खरंच त्याला खाऊन टाकलं होतं ?
===============
त्यामुळे चालत्या गाडीतून उतरून बाजूच्या शेतातला हरबरा उपटून पुन्हा गाडी पकडता येत असे, असे जुने प्रवासी सांगतात. त्यामुळे शकुंतला धावत नाही तर रांगते, असे लोक गमतीने म्हणत. या रेल्वे मार्गाच्या बदल्यात, भारत सरकार त्या ब्रिटिश कंपनीला दरवर्षी १ कोटी २० लाख रुपयांची रॉयल्टी द्यावी लागत होती. दरम्यान सध्या उत्पन्न कमी असल्यामुळे रॉयल्टी दिली जात नाहिये. पण हा ट्रॅक आजही ब्रिटिश कंपनीच्या ताब्यातच आहे. दरम्यान दरवर्षी पैसे देऊनही, या ट्रॅकची अवस्था खूपच वाईट आहे. गेल्या ६० वर्षांपासून त्याची दुरुस्ती झालेली नाही, अस रेल्वेशी संबंधित अधिकाऱ्यांचं म्हणण आहे. दरम्यान या ट्रॅकवरून धावणारी शकुंतला एक्सप्रेस पहिल्यांदा २०१४ मध्ये आणि दुसऱ्यांदा एप्रिल २०१६ मध्ये बंद करण्यात आली होती.(Shakuntala Express)
सध्या ही ट्रेन बंदच आहे पण ऐतिहासिक असा वारसा लाभलेली आणी जनसामान्यांना परवडणारी जीवनवाहिनी म्हणून ही ट्रेन लवकरात लवकर सुरु व्हावी असं इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे. तुम्हाला या शकुंतला बद्दल माहिती होती का आम्हला कंमेंट करून नक्की सांगा !
- british tax on india
- colonial legacy
- freight legacy
- legacy of railways
- legacy trains
- rail memorabilia
- railroad collectibles
- railroad memories
- railway archives
- railway collectibles
- railway exhibits
- railway legacy
- railway memorabilia
- railway nostalgia
- railway preservation
- shakuntala rail
- shakuntala rail india
- timeless journeys
- timeless railways
- train artifacts
- train collectibles
- train history preservation
- train memorabilia
- train preservation